जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या बँकेच्या अध्यक्ष पदाची निवड जाहीर !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक अशी ओळख असलेल्या गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय कारभारी आगवन यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी दिली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  सदर प्रसंगी संजय कारभारी आगवन यांची अध्यक्ष पदाची सूचना बाबुराव थोरात यांनी आणली त्या सूचनेस बापूसाहेब वक्ते यांनी अनुमोदन दिले.यावेळी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे संजय कारभारी आगवन यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी केली आहे.नूतन अध्यक्ष संजय आगवन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गौतम सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुधाकर दंडवते यांचे काही महिन्यांपूर्वी अकस्मात निधन झाल्यामुळे रिक्त असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गौतम सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सभा सोमवार दि.१४ रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाली आहे.

सदर प्रसंगी पाध्यक्ष बापूराव जावळे,संचालक राजेंद्र ढोमसे,बाबुराव थोरात,श्रीकांत तिरसे,विजय रक्ताटे,कमलाकर चांदगुडे, बापूसाहेब वक्ते,तुकाराम हूळेकर,सुनील डोंगरे,उत्तम भालेराव,सिंधुताई रोहोम,रूपाली संवत्सरकर,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे,प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड, वरिष्ठ अधिकारी नानासाहेब बनसोडे आदी उपस्थित होते.

    सदर प्रसंगी संजय कारभारी आगवन यांची अध्यक्ष पदाची सूचना बाबुराव थोरात यांनी आणली त्या सूचनेस बापूसाहेब वक्ते यांनी अनुमोदन दिले.यावेळी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे संजय कारभारी आगवन यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा नामदेव ठोंबळ अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव यांनी केली.

नवनिर्वाचित अध्यक्ष संजय आगवन यांचे माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close