जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

उपमुख्याध्यापक लकारे यांना पुरस्कार प्रदान

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व विधायक क्षेत्रात अग्रेसर मिलिन्द संस्था केंद्र शिंदे ता.जि.नासिक संचालित लोकरंजन कलामंडळ यांच्या विदयमानेआयोजित महाराष्ट्र भुषण राजेर्षी छत्रपती शाहु महाराज राज्यस्तरीय आदर्श यशवंत पुरस्कार २०२४ नुकताच प्रदान करण्यात आला.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांना माजी आ.डाॕ.सुधीर तांबे यांचे हस्ते हा पुरस्कार  मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला आहे.

रघुनाथ लकारे हे जुन ९३-९४ पासुन इंग्रजी विषय शिक्षक म्हणून काम करीत आहे.विविध जिल्हा व तालुकास्तर इंग्रजी विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे.

   सदर प्रसंगी संस्थापक मिलिंद जाधव,अध्यक्ष बाळासाहेब हांडेसर,कार्याध्यक्ष शाहीर देविदास जाधव,उपाध्यक्ष आशाताई दोंदे आदी मान्यवर उपस्थित होते. रघुनाथ लकारे हे जुन ९३-९४ पासुन इंग्रजी विषय शिक्षक म्हणून काम करीत आहे.विविध जिल्हा व तालुकास्तर इंग्रजी विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे.तसेच इंग्रजी विषय शिक्षक म्हणून काम करताना अनेक विदयार्थीना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.विदयालयांत इंग्रजी विषय शिक्षक म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय  आहे.
सन जुलै २४ पासुन श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे उपमुख्याध्यापक म्हणून ते कार्यरतआहे.
  
   लकारे यांना हा पुरस्कार  मिळाल्या बद्दल कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संदीप अजमेरे,आनंद ठोळे,डाॕ.अमोल अजमेरे,राजेश ठोळे,मुख्याध्यापक  रमेश गायकवाड,माजी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,दीलीप तुपसैंदर श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close