निवड
जिल्हा बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नुकत्याच अ.नगर शहर सहकारी बँक,अ.नगर येथे पार पडलेल्या अ.नगर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कोपरगावचे सत्येन सुभाष मुंदडा यांची एकमताने अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली तर उपाध्यक्षपदी पारनेर सैनिक बँकेचे शिवाजी व्यवहारे यांची निवड करण्यात आली आहे.नवोदित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अ.नगर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.यात नवोदित पपदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली आहे.सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहकार खात्याचे अधिकारी श्री सिनारे हे उपस्थित होते सत्येन मुंदडा यांच्या अध्यक्षपदाची सूचना सी.ए.गिरीश घैसास यांनी मांडली होती.
सदर प्रसंगी सी.ए.वसंतराव गुंड,एड.अशोक शेळके,संगमनेर मर्चंट बँकेचे अध्यक्ष श्री वाकचौरे,प्रकाश राठी,राज्य फेडरेशनचे मेधा काळे,आशा मिश्किल,संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी सहकार खात्याअंतर्गत १०१चे वसुलीचे दाखले,नो ड्युज सर्टिफिकेट तसेच जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांचे अडीअडचणी सोडवून त्यांच्या सक्षमीकरणचे महत्त्वाचे काम असोसिएशनचे असते असल्याची माहिती दिली आहे.
नूतन अध्यक्ष सत्येन मुंदडा हे कोपरगाव पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आहेत तसेच ते लायन्स क्लब इंटरनॅशनल चे माजी जिल्हाध्यक्ष,कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक के.जे.सोमय्या कॉलेजचे कमिटी सदस्य अशा विविध संस्थेवर कार्यरत आहेत.
त्यांनी कोपरगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी बँकेत मोबाईल बँकिंग व यू.पी.आय.सेवा सुरू केली होती.कमी वयात मोठी जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.जिल्ह्यातील बँकासाठी विविध कार्यशाळा,ट्रेनिंग कार्यक्रम आयोजित करून बँका सक्षम बनविण्याचा मनोदय नूतन अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी व्यक्त केला आहे.
या प्रसंगी मावळते अध्यक्ष गिरीश घैसास यांचा सत्कार करण्यात आला आहे.उपस्थितांचे स्वागत सी.ए.वसंतराव गुंड यांनी केले तर प्रास्तविक एड.अशोक शेळके यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार संगमनेर मर्चंट बँकेचे अध्यक्ष श्री वाकचौरे यांनी मानले आहे.