निवड
…या सेवा संस्थेच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अशोक विश्वनाथ काळे तर उपाध्यक्षपदी भरत बाबुराव दाभाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माहेगाव देशमुख सेवा सहकारी सेवा संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष मधुकर काळे व उपाध्यक्ष यशवंतराव देशमुख यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अध्यासी अधिकारी आर.एन.रहाणे सहकार अधिकारी श्रेणी २,सहकारी संस्था,कोपरगाव यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी अशोकराव काळे यांच्या नावाची सूचना आ.आशुतोष काळे यांनी मांडली त्या सूचनेला मधुकर काळे यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्षपदासाठी भरत दाभाडे यांच्या नावाची सूचना यशवंतराव देशमुख यांनी मांडली त्या सूचनेला वसंतराव काळे यांनी अनुमोदन दिले.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकाच नावाची सूचना आल्यामुळे निवडणूक अधिकारी ए.आर.रहाणे यांनी अध्यक्षपदी अशोकराव विश्वनाथ काळे व उपाध्यक्षपदी भरत बाबुराव दाभाडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
सदर प्रसंगी संचालक संजय काळे,डॉ. शिवाजी रोकडे,मधुकर काळे,यशवंत देशमुख, वसंत काळे,शिवाजी लांडगे,भागीनाथ काळे, जगन्नाथ जाधव,संगीता सूर्यभान काळे,उर्मिला चंद्रकात कापसे उपस्थित होते.निवडणूककामी सेक्रेटरी संदिप बोरनर यांनी सहकार्य केले.
सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक काळे व उपाध्यक्ष भरत दाभाडे यांचे संस्थेचे मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.