जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

भुसारी यांची निवड जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अकोले तालुक्यातील कळस बु येथील माजी सैनिक विठ्ठल भुसारी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मंत्रालय लिपिक पदी निवड झाली आहे.


    

  एम.पी.एस.सी.मार्फत गट क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ च्या मध्ये मंत्रालय क्लर्क पदासाठी परीक्षा झाली होती त्याचा नुकताच निकाल जाहीर झाला.यात भुसारी यांनी यश मिळवले आहे.त्यांची राज्य राखीव पोलीस (एस.आर.पी.एफ.) अ.नगर कुसडगाव व मुंबई पोलीस मध्ये ही निवड झाली असून महाराष्ट्र शासन नगरपरिषद  कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी या पदाची परीक्षा दिलेली असून निकाल लवकरच जाहीर होईल.
       विठ्ठल भुसारी हे शेतकरी कुटुंबातील असून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते ते कळस येथील जयकिसान सह दूध संस्थेचे माजी चेअरमन बाळासाहेब भुसारी यांचे ते चिरंजीव आहेत.
भारतीय सैन्य दलात असताना देशाची सेवा प्रामाणिक पणे केली.त्याचे फळ या परीक्षेत मिळाले असल्याचे विठ्ठल भुसारी यांनी सांगितले.त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close