निवड
…यांना सांदिपणी गुरुकुलचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
काँग्रेस पक्षाचे नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्यात सहभाग घेऊन सामाजिक कार्य करणारे सुनील उकिरडे यांना,’आदर्श सामाजिक कार्यकर्ता’ या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घुलेवाडी येथील सांदिपणी वारकरी संस्थेच्या वतीने समाजकार्यात उल्लेखनीय काम सुनील उकिर्डे यांचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यावेळी ह.भ.प.राम महाराज पवळ,ह.भ.प.सखाराम महाराज तांगडे,कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात,रोहिदास महाराज बर्गे,स्वामी समर्थ मठाचे प्रदीप सोनवणे,अनंत महाराज काळे,संदीप कुटे,गणेश गाडे,बाळासाहेब महाराज रंजाळे,सुभाष कुटे,विलास कुटे,सिताराम राऊत,गणपत पवार ,बाळासाहेब आहेर,उत्तम महाराज गाडे,अमोल महाराज गाडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सुनील उकिर्डे हे मागील अनेक वर्षापासून संगमनेर तालुक्यासह अ.नगर जिल्ह्यात सेवाभावी पणे काम करत आहेत विशेषता वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय काम राहिले असल्याचे मानले जाते.