निवड
कोपरगाव तालुक्यातील दोन विद्यार्थिनींचे यश
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
बृहन्मुंबई अध्यापक मंडळ संचलित डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा-२०२३-२४ स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या असून या स्पर्धेत कु.अदिती उकार्डे हिने सुवर्ण तर कु.रुक्मिणी युवराज गांगवे हिने रौप्य पदकाला गवसणी घातली असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”मुंबई येथील बृहन्मुंबई अध्यापक मंडळ संचलित डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा-२०२३-२४ या नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत.त्यात राज्यातील अनेक शिक्षण संस्था व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.त्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीत असलेल्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण या संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कु.अदिती उकार्डे हिने सुवर्ण पदक मिळवले आहे तर दुसरी विद्यार्थींनी कु.संस्कृती युवराज गांगवे हिने रौप्य पदक मिळविले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
दरम्यान त्यांच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे,जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केले आहे.सदर बक्षीस वितरण समारंभ मुंबई,चर्चगेट येथील पाटकर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.