निवड
जवळके गावच्या उपसरपंच पदी यांची निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जवळके ग्रामपंचायतीच्या आज उपसरपंचपदी परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे सुनील वामन थोरात यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी सोहन चौधरी यांनी जाहीर केली आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी नूतन सरपंच सारिका विजय थोरात या होत्या.
राज्यात एकूण २३५९ ग्रामपंचायती असून नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे.तर कोपरगाव तालुक्यात आ.आशुतोष काळे गटाने सतरा पैकी बारा तर कोल्हे गटांस तीन तर कुंभारी येथील एक अपक्ष,तर जवळके येथील ग्रामपंचायतीत स्थानिक परिवर्तन ग्रामविकास पॅनलला आठ जागांपैकी सहा जागा मिळविण्यात यश मिळाले होते.तर सरपंच पदी सारिका विजय थोरात या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या होत्या.तर उपसरपंच पदासाठी आज सरपंच सारिका थोरात यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक जाहीर झाली होती ती आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून उपसरपंच पदी सुनील थोरात यांची निवड जाहीर केली आहे.
.
सदर प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी सोहन चौधरी,सहा.निवडणूक अधिकारी राजेंद्र रहाणे, पोलीस कर्मचारी व्ही.आर.पवार,माजी सरपंच वसंत थोरात,विश्वनाथ थोरात,अशोक शिंदे,दत्तात्रय थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,बंडु थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,गोरक्षनाथ थोरात,डी.के.थोरात,नवनाथ थोरात,बाबासाहेब थोरात,उत्तमराव थोरात,चंद्रकांत थोरात,राजेंद्र थोरात,रामनाथ थोरात,सोपान थोरात,सखाहारी थोरात,भिकाजी थोरात,बबन थोरात,नवनाथ थोरात,परशराम शिंदे,जयराम वाकचौरे,दत्तात्रय वाकचौरे,बाळासाहेब तुकाराम थोरात,रामनाथ थोरात,नूतन सदस्य इंदूबाई नवनाथ शिंदे,मीना विठ्ठल थोरात,भाऊसाहेब कचरू थोरात,वनिता रखमा वाकचौरे,रोहिणी गोरक्षनाथ वाकचौरे,सोमनाथ नवनाथ थोरात आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थगित होते.
सदर प्रसंगी सरपंच सारिका थोरात,उपसरपंच सुनील थोरात,नूतन सदस्य इंदूबाई नवनाथ शिंदे,मीना विठ्ठल थोरात,भाऊसाहेब कचरू थोरात,वनिता रखमा थोरात,रोहिणी गोरक्षनाथ वाकचौरे,सोमनाथ नवनाथ थोरात आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचे निळवंडे कालवा कृती समितीचे विधिज्ञ ऍड.अजित काळे,संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे, संघटक नानासाहेब गाढवे,जलसंपदाचे माजी उपअभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,बंडू थोरात,रावसाहेब सु.थोरात,बाळासाहेब थोरात,दत्तात्रय थोरात,सखाहारी थोरात,श्रीहरी थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.