निवड
कोपरगाव येथील…या डॉक्टरांचा झाला सन्मान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथील नॅशनल कौन्सिल फॉर इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसिन आणि विश्व परिवार यांचे संयुक्त विद्यमाने नुकतीच पुणे येथे तीन दिवशीय राष्ट्रीय व्याख्यानमाला संपन्न झाली असून यात पहिल्या दिवशी उदघाटन कार्यक्रमात कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड यांना नॅशनल कौन्सिल फॉर इंडियन मेडिसिन चे एथिक्स अँड रजिस्ट्रेशन चे अध्यक्ष डॉ.राकेश शर्मा यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आयुर्वेद प्रचार व प्रसार करतांना अनेक आयुर्वेद वैद्यांना प्रशिक्षित करण्याच्या कार्याची दखल घेऊन विश्व व्याख्यानमालेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.रामदास आव्हाड यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी व्यासपीठावर कोल्हापूर येथील,’श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज रुड्रीकर ट्रस्ट’चे आनंद महाराज,एन.सी.आय.एस.एम.चे अध्यक्ष डॉ.जयंत देवपुजारी,पुणे येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य समीर जमदग्नी,होमिओपॅथ कमिशनचे अध्यक्ष डॉ.अनिल खुराणा आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी त्यांना स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ व मानपत्र त्यावेळी डॉ.आव्हाड यांना देण्यात आले आहे.भारतभरातून अडीच हजारहून अधिक वैद्यगण यावेळी उपस्थित होते.