निवड
…या शिक्षकांना,’राज्य शिक्षक पुरस्कार’ प्राप्त

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्य नगरपालिका-महानगरपालिका शिक्षक संघाचे वतीने पनवेल येथे सन २०२२-२३चा,’राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर यांचे हस्ते प्रदान करण्यात आले असून यात अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेच्या शाळा क्र.६ च्या मुख्याध्यापिका कल्पना निंबाळकर यांना ‘आदर्श मुख्याध्यापिका’ तर नगरपालिका शाळा नं.५ च्या शिक्षिका नसरीन पठाण यांना,’आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

“नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांचे १०० टक्के वेतन,बदली पोर्टल,अनिर्णित जुनी पेन्शन व नवीन पेन्शन बाबतचा प्रश्न,लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत संघटनेची बैठक घेऊन सोडविण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहू”-आ.जयकुमार गोरे,मान-खटाव मतदार संघ.
सदर प्रसंगी सातारा जिल्ह्यातील माण-खटावचे आ.जयकुमार गोरे,पनवेल महानगरपालिकाचे स्थायी समितीचे नेते राज्याध्यक्ष अर्जुन कोळी,कार्याध्यक्ष सुभाष कोल्हे,राज्य सरचिटणीस अरुण पवार,राज्य महिला आघाडी प्रमुख साधना साळुंके,ट्रस्ट सचिव शिवाजी राजवाडे,राज्य सल्लागार नवनाथ अकोलकर,अ.नगर जिल्हाध्यक्ष फारुक शाह,विजय शेळके,ताराचंद पगारे,सचीन शिंदे,शरद नागरगोजे,भाऊसाहेब कबाडी,सुनिल रहाणे,विलास माळी,अरुण पगारे,अर्जुन शिरसाट,संतोष जाधव,अमोल कडू,अमोल बोठे आदिंसह विविध मान्यवर नेते उपस्थित होते.
दरम्यान नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांचे १०० टक्के वेतन,बदली पोर्टल,अनिर्णित जुनी पेन्शन व नवीन पेन्शन बाबतचा प्रश्न,लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत संघटनेची बैठक घेऊन सोडविण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहू असे आश्वासन माण-खटावचे आ.जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना दिले आहे.
सदर प्रसंगी राज्य संघाचे अध्यक्ष अर्जून कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य उपाध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना भरडा,रायगड विभागीय अध्यक्ष वैभव पाटील, कोकण विभागीय अध्यक्ष प्रमोद लांघी,पनवेल महानगरपालिका शिक्षक संघ सदस्यांनी विशेष प्रयत्न केले आहे.
या शिक्षकांचे कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,प्रशासनाधिकारी राजेश डामसे,वरिष्ठ लिपक अमित पराई,प्रशांत शिंदे,माणिक कदम,सविता साळुंके,निर्मला बनसोडे,शोभा गाडेकर,शबनम खान,प्रतिभा केणे,ज्योती पवार,प्रताप वळवी,कैलास साळगट,मुब्बशीर खान आदींनी अभिनंदन केले आहे.