निवडणूक
गणेश कारखाना निवडणूक,…इतके अवैध अर्ज,आता माघारीकडे लक्ष
न्यूजसेवा
राहाता-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूकीस आता रंग भरू लागला १९ जागांसाठी हि निवडणूक संपन्न होत असून आलेल्या एकूण १०६ पैकी नामनर्देशन पत्रापैकी १३ अवैध झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यात शेतकरी संघटनेचे तीन तर सत्ताधारी गटाच्या दोन अर्जाचा समावेश असल्याची माहिती आहे.तथापि शेतकरी संघटना या विरुद्ध अपिलात जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान दाखल असलेले अर्ज २३ मे ते ०६ जून या दरम्यान मागे घेता येणार आहे.या काळात सकाळी ११ ते दुपारी ०३ यावेळेत अर्ज मागे घेता येणार आहे.माघारी नंतर ०७ जून ला चिन्ह वाटप होणार आहे.तर १७ जूनला मतदान सकाळी ०८ ते सायंकाळी ०५ यावेळेत होईल.तर मतमोजणी १९ जुन रोजी सकाळी ०९ वाजता संपन्न होणार आहे.
राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम नुकताच सहकार विभागाने जाहीर केला असून हि निवडणूक येत्या १७ जून रोजी संपन्न होत आहे.त्यात नामनिर्देशन पत्र भरण्यात दि.१५ मे पासून सुरुवात झाली असून ते भरण्याचा अखेरचा दिवस १९ मे होता.यात आलेल्या अर्जाची छाननी दि.२२ मे रोजी गटनिहाय संपन्न झाली आहे.त्यात हे नामनिर्देशन पत्र अवैध तर ९२ अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी आहेर यांनी दि.२३ मे रोजी दिली आहे.यात काही अपूर्तता पूर्ण कारण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळ दिल्याने या छाननीत किरकोळ अपवाद वगळता फार ताणाताणी झाली नाही असे दिसून आले आहे.
यात शिर्डी गटात-०१,अस्तगाव गटात-०५,वाकडी गटात-०४,पुणतांबा गटात-०३ असे अर्ज अवैध ठरले आहेत.हे सर्व अवैध ठरलेले अर्ज सर्वसाधारण गटातील आहेत.तर राखीव मधील एकही अर्ज अवैध ठरला नाही हे विशेष !
गट निहाय अवैध ठरलेले उमेद्वारी अर्ज पुढील प्रमाणे
शिर्डी गट-
विनायक यशवंत कोते,अस्तगाव गट-हौशीराम विश्वनाथ चोळके (दोन अर्ज),निर्मळ बाबासाहेब नामदेव (देवराम), विष्णु जगन्नाथ घोरपडे,संजय गणपत चोळके.
वाकडी गट-
बाळासाहेब भाऊसाहेब लहारे,विठ्ठल कचरु शेळके,भास्कर नानासाहेब घोरपडे,रामकृष्ण खंडू बोरकर.
पुणतांबा गट-
मंदा दादासाहेब गाढवे,आण्णासाहेब जनार्दन सातव,प्रकाश भिमाशंकर वहाडणे असे १३ जणांचे उमेद्वारी अर्ज अवैध ठरले आहेत.अनियमित ऊसाचा पुरवठा,तीन अपत्य आदी कारणांमुळे अर्ज अवैध ठरले आहेत.
आता वैध ठरलेल्या अर्जाची संख्या मतदार संघ निहाय पुढील प्रमाणे-शिर्डी-१०,राहाता-०८,अस्तगाव-१०,वाकडी-०८,पुणतांबा-१३, ‘ब’ वर्ग-०४,अनु.जाती / जमाती-०५ ,महिला प्रतिनिधी-१६, इतर मार्गास वर्ग-१० तर भटक्या विमुक्त जाती विशेष मागास वर्ग-०८ असे एकूण-९२ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत.
दरम्यान दाखल असलेले अर्ज २३ मे ते ०६ जून या दरम्यान मागे घेता येतील.या काळात सकाळी ११ ते दुपारी ०३ यावेळेत अर्ज मागे घेता येणार आहे.माघारी नंतर ०७ जून ला चिन्ह वाटप होणार आहे.तर १७ जूनला मतदान सकाळी ०८ ते सायंकाळी ०५ यावेळेत होईल.तर मतमोजणी १९ जुन रोजी सकाळी ०९ वाजता संपन्न होणार आहे.