निवडणूक
कोपरगाव पीपल्स बँकेत निवडणूक शिमगा सुरु !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
अ.नगर जिल्ह्यातील सहकारी बँकात अग्रणी समजल्या जाणाऱ्या कोपरगाव को-ओपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचा राजकीय शिमगा सुरु झाला असून सदर निवडणूक आगामी ०५ फेब्रुवारी रोजी संपन्न होत असून यात सत्ताधारी गटाकडून ०१ जागा बिनविरोध निवडून आली आहे तर एक अनुसूचित जागेवर विरोधी गटाच्या उमेदवाराने पाठींबा दर्शवला आहे.तरी अद्याप निवडणुकीच्या आखाड्यात सत्त्ताधारी गटाकडून १५ तर विरोधकांकडून ०६ जण असे एकूण २१ उमेदवार आपले नशीब आजमावत असून त्यासाठी प्रचार यंत्रणा जोरात कामाला लागली असल्याचे दिसत आहे.
दरम्यान या निवडणुकीत आता सर्वसाधारण जागेसाठी सत्ताधारी सहकार पॅनल कडून १२ तर विरोधी पॅनल कडून ०४ जण टक्कर देत आहे.तर भटक्या जागेवर एकास एक लढत होत आहे.तर महिला प्रतिनिधीत सत्ताधारी गटाच्या ०२ उमेद्वाराविरुद्ध विरोधकांकडून एक जागा लढवली जात असली तरी एक जागा सत्ताधारी गटाच्या पारड्यात जमा झाल्यात आहे.त्यामुळे एकूण लढाईत आता सत्ताधारी गटाकडून १५ जागा तर विरोधकडून ०६ जागा लढवल्या जात आहेत.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकी पाठोपाठ आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे.राज्यातील अनेक सहकारी बँका,सोसायट्या,साखर कारखाने,यांच्या पंचवार्षिक निवडणुकांना स्थगिती आणली होती.सप्टेंबर अखेर या निवडणुका घेऊ नये असा आदेश सरकारच्या वतीने जारी करण्यात आला होता.तो आदेश काही माहिन्यापूर्वी सरकारने संबंधित आदेश मागे घेत असल्याचे पत्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केले होते.त्याला खंडपीठाने मान्यता दिली होती.त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग खुला झाला होता.त्यात कोपरगावातील सहकारी क्षेत्रातील अग्रणी असलेली कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या समावेश होता.
सदर बँकेत एकूण ०४ हजार ३२१ सभासद असून उमेदवार माघारी घेण्याची तारीख २३ जानेवारी हि होती.त्यावेळी सत्ताधारी गटाचे एक उमेदवार हेमंत भास्करराव बोरावके हे बिनविरोध निवडून आलेले आहे.आता रिंगणात २१ उमेदवार आपले नशीब आजमावत असल्याचे दिसत आहे.त्यात विरोधी गटाकडून केवळ ०६ उमेदवार उभे दिसत आहेत त्यामुळे आगामी चित्र स्पष्ट झाले आहे.सदर सभासद हे आपला अधिकार आगामी ०५ फेब्रुवारी बजावणार आहे.त्यामुळे आता सदर निवडणूक रंगली असून यात दोन पॅनल पडले आहेत.मात्र विरोधी गटाचा पॅनल पांगळा झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे.त्याना केवळ ०६ उमेदवार सत्ताधारी गटाच्या समोर देता आले आहे.त्यामुळे त्यांची मर्यादा उघड झाली आहे.त्यातच आगामी काळात हि निवडणुक नेमकी कशी होणार हे उघड झाले आहे.
उभे असलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहे.
सर्वसाधारण जागा १२ असून त्यासाठी उमेदवार पुढील प्रमाणे-कंगले सुनील दत्तात्रय,काले अतुल धनालाल,ठोळे कैलासचंद भागचंद,ठोळे रवींद्र रतनचंद,पांडे दीपक माणिकचंद,बंब सुनील शांताराम,बागरेचा धरमकुमार मानकलाल,बोरा सुनीलकुमार शांतीलाल,मुंदडा सत्येन सुभाष,लोहाडे रवींद्र शांतीलाल,शाह कल्पेश जयंतीलाल,शिंगी राजेंद्र मोतीलाल आदींचा समावेश आहे.
तर विरोधी गटाकडून सर्वसाधारण जागेसाठी चार उमेदवार देण्यात आले असून त्यांची नावे पुढील प्रमाणे-केकाण जनार्दन शांताराम,कोठारी विजय रुपचंद,बज सुधीर सोहनलाल,लोढा जिंतेंद्र बाबूलाल आदींचा समावेश आहे.
दरम्यान भटक्या जाती जमातीसाठी एक जागा असून त्यात सत्ताधारी गटाकडून आव्हाड वसंतराव फक्कडराव यांचा समावेश असून त्यांना विरोधी गटाकडून केकाण जनार्दन शांताराम यांनी दंड थोपटले असून त्यांनी सर्वसाधारण जागा लढवताना या जागीही आपली उमेदवारी दिली आहे त्यामुळे ते दोन जागा लढवताना दिसत आहे.
महिला राखीव प्रतिनिधीसाठी सत्ताधारी गटाकडून गंगवाल त्रिशला सुनील कुमार तर शिलेदार प्रतिभा सुनील या दोन उमेदवार दिल्या आहेत.त्यांना विरोधी म्हणून बज संगीता सुधीर यांनी रिंगणात उडी घेतली आहे.
दरम्यान अनुसूचित जाती जमातीसाठीच्या एक जागेसाठी सत्ताधारी गटाकडून लोहकरे भाऊसाहेब शंकर यांनी दंडाच्या बेटकुळ्या फुगवल्या असून त्यांना शह देण्यासाठी विरोधी गटाकडून फडात अबनावे यंशवंत रामचंद्र यांनी बाजी लावली होती मात्र आपला उमेदवारी अर्ज मुदतीत मागे न घेता आल्याने त्यांनी आपला पाठींबा सत्ताधारी गटाला जाहीर केला आहे.त्यामुळे हि जागाही सत्ताधारी गटाच्या पारड्यात गेल्यात जमा झाली असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान या निवडणुकीत आता सर्वसाधारण जागेसाठी सत्ताधारी सहकार पॅनल कडून १२ तर विरोधी पॅनल कडून ०४ जण टक्कर देत आहे.तर भटक्या जागेवर एकास एक लढत होत आहे.तर महिला प्रतिनिधीत सत्ताधारी गटाच्या ०२ उमेद्वाराविरुद्ध विरोधकांकडून एक जागा लढवली जात असली तरी एक जागा सत्ताधारी गटाच्या पारड्यात जमा झाल्यात आहे.त्यामुळे एकूण लढाईत आता सत्ताधारी गटाकडून १५ जागा तर विरोधकडून ०६ जागा लढवल्या जात आहेत.सत्ताधारी गटाचे चिन्ह कपबशी आहे तर विरोधकांचे पंखा,छत्री,ब्रश,किटली,नारळ,विमान आदी चिन्हे आहेत.
या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून नामदेव ठोंबळ हे काम पाहत असून त्यांना सहाय्यक निवडणूक अधीकारी म्हणून राजेंद्र रहाणे हे सहाय्य करत आहेत.मतमोजणी आगामी सोमवार दि.०६ फेब्रुवारी रोज संपन्न होत आहे.