निवडणूक
अशोकचा तोटा वाढवून गिळंकृत करण्याचा डाव वेळीच ओळखा-रघुनाथ दादा पाटील
न्यूजसेवा
श्रीरामपूर-(नानासाहेब जवरे)
अशोक सहकारी कारखाना तोट्यात दाखवून हि मंडळी आपापल्या बँका भरवून घेत असतात.व तोटा वाढवून हा तोटा दाखवून हि मंडळी तुम्हाला कोणाला चालविता येणार नाही हा कारखाना गिळंकृत करण्याचा डाव रचला आहे.साठवलेले बँकेतील हेच पैसे वापरून हि मंडळी हे कारखाने गिळंकृत करतील असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे.
“अशोक कारखाण्याच्या सी.ए.असणारे भानुदास मुरकुटे या अध्यक्षाने उसाला केवळ २२०० शे रुपये भाव देऊन ऊस उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली आहे.वास्तविक अन्य मध्यम झोन मधील साखर कारखान्यानी प्रतिटन २८०० भाव देत आहे.प्रतिटन उसाला ६०० रुपयांचा खिसा कापला जात आहे.याला जबाबदार कोण आहे? हे सांगतात मला तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी मंत्रीपद देऊ केले होते.मात्र आपण जनतेच्या मनात राहू इच्छितो असे म्हणून ते मंत्रिपद नाकारले असल्याचा विनोद या गृहस्थाने केला आहे.याला काय म्हणावे असे म्हणून त्याची कीव करावीशी वाटत आहे”-अविनाश आदिक,सरचिटणीस प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस.
श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कामधेनू म्हणून महत्वपूर्ण असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवार दि.१६ जानेवारी रोजी संपन्न होत असून त्यासाठी सत्ताधारी माजी आ. मुरकुटे गटाच्या विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष इंद्रनाथ थोरात,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिंटणीस अविनाश आदिक,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांच्या सहकार्याने सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध मोठे आव्हान निर्माण केले आहे.त्यामुळे प्रचार सभा अंतिम चरणात आल्या आहे.त्यासाठी नुकतेच कारेगाव येथे आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास प्रचार सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छावा संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक बहिरनाथ गोरे हे होते.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,उपाध्यक्ष अड.अजित काळे,अशोक कारखाण्याचे माजी अध्यक्ष इंद्रनाथ थोरात,नगर जिल्हा खजिनदार रुपेंद्र काले,श्रीरामपूरचे क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना मुरकुटे,पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,दीपक जगताप,अड.सर्जेराव कापसे,रमेश पटारे एम.वाय.पटारे,लक्ष्मण पटारे,अण्णा पाटील शेळके,शरद जगताप,जालिंदर लवांडे,अड्.एन.आर.जंगले,अर्चना उंडे,अर्चना पानसरे,विष्णू खंडांगळे,राजेंद्र पानसरे,आदी मान्यवरांसह बहुसंख्य शेतकरी सभासद उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना अड्.अजित काळे म्हणाले की,”कारखाण्याचा सभासद हाच कारखाण्याचा मालक आहे.हे तुम्ही विसरले आहे. तुम्ही शेतकऱ्यांनाच पिळविण्याचा धंदा उभारला आहे.हे आता संपले पाहिजे आहे.रघुनाथ दादा,स्व.बबनराव काळे यांची सारखे अनेक शेतकरी नेते आपले आयुष्य ओवाळून टाकत आहे.त्यांना काही पैसा मिळविण्याचा उद्देश कधीही नव्हता.तरी हे मंडळी आजही मोठे कष्ट घेऊन शेतकऱ्यांना जागवत आहे.त्याचा काय स्वार्थ आहे.हे सभासदांनी ओळखावे व शेतकरी पॅनलला विजयी करा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.माजी मुरकुटे यांना या वेळी सत्ता स्थानातून दूर केले नाही तर तुम्हाला मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे.शेतकरी संघटनेकडे वाटावयास पैसा नाही.आम्ही कुठेही भ्रष्टाचार करत नाही.तुम्हाला हितेशी संचालक मंडळ हवे असेल तर प्रलोभणाला बळी न पडता उघडपणे या भ्रष्टाचाऱ्यांचा पालथे पडण्यासाठी उघडपणे पाठिंबा द्या.व हि बनवाबनवी तुम्ही येत्या सोळा जानेवारी रोजी उघडी करा व शेतकरी संघटनेचे सर्व उमेदवारांच्या कप-बशीच्या चिन्हावर शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन शेवटी केले आहे.
इंद्रनाथ थोरात यांनी माजी आ.मुरकुटे यांच्यावर टीका करताना म्हणाले की,”महाराष्ट्रात तुम्ही एक नंबर आहेत असा दावा करता मग तर उसाला एक क्रमांकाचा भाव का दिला नाही.तुम्ही सी.ए.असल्याचे सांगता तुह्मी अडाणी नाही.तुम्हाला लोकांनी ओळखले आहे.तुम्ही आज साखर कामगारांना सहा-सहा महिने पगार देत नाही.हा प्रताप कोणाचा आहे.कारेगाव हे आक्रमक व क्रांतिकारक गाव आहे.येथून तरुण व क्रांतिकारक उमेदवार दिला आहे.तो क्रांती घडवणार असल्याचे सांगितले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक नितिन पटारे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन अशोक कारखाण्याचे माजी अध्यक्ष इंद्रनाथ थोरात,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,शिवाजीराव नांदखिले,पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,ज्ञानेश्वर मुरकुटे,अड्.एन.आर.जंगले,किशोर बकाल,रुपेंद्र काले,अड.सर्जेराव कापसे आदींनी केले आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी सागर सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवराज जगताप यांनी मानले आहे