जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

आश्चर्यम..नगरपरिषद सभा सर्वांना ऐकू आली !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेची गत सर्वसाधारण सभा आपल्याला ऑनलाइन ऐकूच आली नाही अशी तक्रार गत बैठकीत करणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना या वेळची सभा ऐकू आली का ? यावर आज उपनगराध्यक्ष पदाची दुपारी तीन वाजता निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आयोजित केलेली सभा सर्वांना सविस्तर ऐकू आल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.त्यामुळे या बातमीने शहरात सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान याच नगरसेवकांनी गत १५ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत आवाजच ऐकू येत नसल्याचे कारण देत नगरपरिषद हद्दीत मोठा गजहब केला होता.मात्र आज प्रत्येक नगरसेवक स्वतंत्र असूनही त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांचा आवाज स्पष्ट ऐकू आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.व मागील सभेत जनतेचे विषय मंजूर करताना ऐकू येत नसल्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोपरगाव नगरपरीषदेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी आपल्या पदाचा राजीनामा गत मे महिन्यातच पक्षश्रेष्ठींकडे मुदत संपताच सोपवला होता.मात्र या कालखंडात कोरोना साथ जोरावर असल्याने तो त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वीकारला नव्हता.मात्र आता कोरोना साथ उतरणीला लागल्याने व नगरपरिषद निवडणूक जवळ येत चालल्याने हि प्रक्रिया अपरिहार्य बनली होती.त्यामुळे तो दि.०८ ऑक्टोबर रोजी राजीनामा अध्यक्ष विजय वहाडणे यांचेकडे सोपवला होता व त्यांनी तो स्वीकारल्याने ते पद रिक्त झाले होते.महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम-१९६५ चे कलम ५१ अ (७) प्रमाणे रिक्त जागा भरणे आवश्यक असल्याने त्या जागेची निवडणूक जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली होती.व जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये त्यांनी या कामी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.मात्र हि निवडणूक घेताना त्यांनी शासनाच्या दि.०३ जुलै २०२० च्या आदेशान्वये हि सभा वऑनलाइन पद्धतीने घेण्याचे सक्तीचे आदेश दिले होते.व त्या साठी नगरसेवकांनी एकाच खोलीत दरवाजा बंद करून त्या ठिकाणी “अन्य कोणी नाही” हे निवडणूक अधिकाऱ्यांना खात्री करून देण्यासाठी कॅमेरा हा ३६० अंशात फिरवून दाखविण्याचे बंधन घातले होते.त्या प्रमाणे हो सभा आज आयोजित केली होती.त्या प्रमाणे आज आयोजित केलेल्या सभेला भाजप व शिवसेनेची जी वरिष्ठ नेत्यांना मान्य नाही अशी स्थानिक पातळीवर असलेल्या युतीचे सर्व नगरसेवक हजर होते.मात्र राष्ट्र वादीचे गटनेते विरेन बोरावके हे प्रकृती अस्वस्थेच्या कारणामुळे वैद्यकीय उपचार घेत असल्याने त्यांचे सहकारीही या बैठकीपासून दूर राहिले होते.तर अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद हेही या निवडीपासून दूर राहिल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान आज संपन्न झालेल्या या निवडीच्या वेळी भाजपच्या नगरसेवकामधून केवळ स्वप्नील निखाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने चित्र स्पष्ट झाले होते.अर्ज भरण्याच्या अखेरच्या वेळी दुपारी एक वाजेपर्यंत ते चित्र कायम राहिले.दुपारी ३ ते ३.३० पर्यंत छाननी झाली त्यातही तो अर्ज कायम राहिल्याने चित्र स्पष्ट झाले होते.व माघारीच्या वेळी हि एकमेव अर्ज असल्याने निवड जाहीर करण्याची केवळ औपचारिकता तेवढी शिल्लक होती.ती साडेतीन वाजता संपल्याने निवडणूक संपन्न होऊन चार वाजेच्या सुमारास स्वप्नील निखाडे यांना निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे यांनी बिनविरोध जाहीर केले आहे.

दरम्यान याच नगरसेवकांनी गत १५ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत आवाजच ऐकू येत नसल्याचे कारण देत नगरपरिषद हद्दीत मोठा गजहब केला होता.मात्र आज प्रत्येक नगरसेवक स्वतंत्र असूनही त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांचा आवाज स्पष्ट ऐकू आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.व मागील सभेत जनतेचे विषय मंजूर करताना ऐकू येत नसल्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीत भाजप नेत्यांनी जुन्या कार्यकर्त्याना डावलले गेल्याची चर्चा सुरु आहे.असून नवीन कार्यकर्त्याना नवीन युवा नेत्याने संधी दिल्याचे मानले जात असून “नवीन विटी,”नवे राज्य” आल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close