निवडणूक
शहरासह तालुक्यातील रस्ता कामे निकृष्ट-…यांचा आरोप

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात रस्त्यांची कामे निकृष्ट झाली असून आ.काळे यांनी ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना काळया यादीत टाकण्याची तंबी ही शहर ग्रामीण भागातील गैरकारभार उघड होण्याच्या भीतीने केलेले नाटक असल्याचा आरोप सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी एकक कार्यक्रमात बोलताना केला आहे.

“वास्तवात कोपरगाव नगरपरिषदेसह तालुक्यातील सगळ्याच रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे.जसा पालिकेचा भ्रष्टाचार बाहेर निघाला,तसाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा भ्रष्टाचारही बाहेर निघण्याची आ.आशुतोष काळे यांना साधार भीती वाटत आहे त्यामुळे त्यांनी बचावाचा मार्ग शोधला आहे”-विवेक कोल्हे,अध्यक्ष,सहकार महर्षी कोल्हे कारखाना.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली.जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होऊन,7 फेब्रुवारी रोजी त्याचा निकाल लागेल.गेल्या डिसेंबर महिन्यातच महाराष्ट्रात विविध नगरपालिकांसाठी मतदान होऊन निवडणुका झाल्या आहेत.आता काही तासात राज्यातील महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे.त्यामुळे या निवडणुकीमुळे शहरांमधील राजकीय वातावरण तापलेले असतानाच गावा-गावांमध्ये निवडणुकांचं वारं वाहू लागणार असल्याचे दिसून येत आहे.
वर्तमानात केवळ 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत,उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर तारीख जाहीर करणार असल्याची माहिती आयोगानं दिली आहे.या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपली जोरदार तयारी सुरू केली आहे.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.कोपगावात प्रस्थापित आ.आशुतोष काळे आणि माजी आ.कोल्हे गटाने नेहमी प्रमाणे आपले दंड थोपटले आहे.त्यातच आ.काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अनेक रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची केली असून त्या ठेकेदारांना कायमचे काळ्या यादीत टाका अन्यथा विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असा ईशारा प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना दिला असल्याचे पार्श्वभूमीवर नूतन नगराध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,गटनेते प्रसाद आढाव आदींची निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार आयोजित केला होता त्यावेळी विवेक कोल्हे यांनी हा आरोप केला आहे.
सदर प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,गटनेते प्रसाद आढाव,माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात,नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक अतुल काले,डॉ.अमोल अजमेरे,सोनल अजमेरे,बाळासाहेब वक्ते,संदीप देवकर,भाऊसाहेब शिंदे,विश्वास ,त्र्यंबक सरोदे,संचालक औताडे,बाळासाहेब पानगव्हाणे आदीसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”दोन महिने शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.ही निवडणूक नेते व कार्यकर्ते दोघांची होती.बिपिन कोल्हे,माजीआ.स्नेहलता कोल्हे आदींनी प्रचारातून संपूर्ण शहर पिंजून काढले.या निवडणुकीत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनीही पक्षाचा जोमाने प्रचार केला.जिल्हा परिषद व पंचायत समिती २०१६ पासून विरोधकांच्या ताब्यात आहे.एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देखील त्यांच्याच होत्या.मात्र एवढा काळ सत्तेत असूनही आपल्या परिसरात कुठलेही लक्षवेधी काम झालेले दिसत नाही.भविष्यात या सर्व गोष्टींवर लक्ष द्यायचे असेल,तर जिल्हा परिषद व पंचायत समिती ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय नाही.म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपण गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही.सन-२०१४ मध्ये कोपरगाव मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून स्नेहलता कोल्हे निवडून आल्या होत्या त्यांनी तालुक्याचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता.ग्रामीण भागात विशेषतः पूर्व भागामध्ये पालखेड डाव्या कालव्यातून कोळ नदीवरील साठवण व पाझर तलाव,गोधेगाव स्मशानभूमी,शिरसगाव-सावरगाव-गोधेगाव रस्ते,नांदूर मध्यमेश्वर कालव्यावरील ११ गावांची पाणी योजना,पालखेड डाव्या कालव्याच्या पोटचाऱ्या,तसेच अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध नसणे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.म्हणून सत्तेत गेल्याशिवाय या प्रश्नांना वाचा फुटणार नाही.सत्ताधारी आमदारांनी अधिकाऱ्यांना सूचना देत तंबी दिल्याचे नाटक केले असले,तो प्रकार हा,” बैल गेला आणि झोपा केला” असल्याचे त्यांनी सांगितले आहे.वास्तवात नगरपरिषदेसह सगळ्याच रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे.जसा पालिकेचा भ्रष्टाचार बाहेर निघाला,तसाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा भ्रष्टाचारही बाहेर निघण्याची त्यांना साधार भीती वाटत आहे.शेवटी कोल्हे यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी जोमाने करण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले आहे.



