निवडणूक
कोपरगाव उपनगराध्यक्षपदी…यांची निवड !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगररिषदेची आज उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून त्यात आर.पी.आयचे माजी शहराध्यक्ष व कोल्हे गटाचे नगरसेवक जितेंद्र रणशूर यांची एक वर्षासाठी बहुमताने निवड झाली असून स्वीकृत नगरसेवक पदी भाजपकडून अतुल काळे व सोनल अमोल अजमेरे यांची वर्णी लागली आहे.तर राष्ट्रवादी आ.आशुतोष काळे गटाकडून प्रकाश रुईकर यांची वर्णी लागली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यात शिवसेनेला उपनगराध्यक्ष पद मिळेल असा अंदाज खोटा ठरला असून आता शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान कोणत्याही नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी तज्ज्ञांचीच नियुक्ती करण्याचेही स्पष्ट असताना व त्यात डॉक्टर,वकील,अभियंता,शिक्षण तज्ञ,पर्यावरण तज्ञ,सेवानिवृत प्राध्यापक,मुख्याध्यापक,सहाय्यक आयुक्त,सेवानिवृत मुख्याधिकारी आदींचा समावेश होण्याची अपेक्षा असताना ती फोल ठरली आहे.सत्ताधारी गटाने सारे नियम धाब्यावर बसवून आपापल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची व निकटवर्तीयांचीच वर्णी लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून हटकून केले जाते हे वारंवार उघड झाले आहे.

सदर उपनगराध्यक्ष पद व स्वीकृत नगरसेवक हे दोन्ही पदे हे संगमनेर पॅटर्न नुसार प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्षे देण्याचा अलिखित नियम माजी आ.कोल्हे गटाने ठरवला गेला असून त्यानुसार प्रत्येकाला समज दिली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यानुसार ही पदाधिकारी निवड झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र संजीवनी कारखान्यात दोन वर्षापूर्वी उपाध्यक्षपदी दलीत कार्यकर्त्याला संधी दिली असताना अन्य उमेदवाराला संधी का नाही असा सवाल इच्छुकांनी विचारला आहे.
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक संपली असून २१ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या निकालात भाजप कोल्हे गटाला नगराध्यक्षपदी पराग संधान यांची वर्णी लागली आहे.तर त्यांच्या वाट्याला १९ जागा आल्या आहेत.यात शिवसेनेने हाती छत्री घेऊन चार जागा वाट्याला आल्या असून एक अपक्ष उमेदवाराला संधी दिली होती.दरम्यान राष्ट्रवादी आ.आशुतोष काळे गटाला मागील ०७ जागांत भरघोस वाढ होऊन त्या ११ वर पोहचल्या होत्या.त्यामुळे आता दोन्ही गटांना स्वीकृत नगरसेवक निवडीसह सत्ताधारी गटाला उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाचे गळ्यात पडणार याकडे शहरातील अनेकांचे लक्ष लागून राहिले होते.त्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती.त्यातही सलग दोन दिवस बैठकांचा जोर सुरू होता.उमेदवारी आज सोमवार दि.१२ जानेवारी त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आपले प्रतिनिधी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्याकडे आपले सोपवले होते.तर नगराध्यक्ष पराग संधान अध्यक्षतेखाली सभेचे सभेचे आयोजन केले होते.त्यात भाजप कोल्हे गटाकडून उपनगराध्यक्ष पदी जितेंद्र रणशूर यांचा तर काळे गटाकडून वाल्मीक लहिरे यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.एतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी अतुल काले व सोनल अजमेरे या दोघांचे अर्ज आले होते.तर राष्ट्रवादीकडून आ.काळे गटाकडून प्रकाश रुईकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता.नगराध्यक्ष पराग संधान यांनी सभेत उपनगराध्यक्षपदी जितेंद्र रणशूर यांची निवडणूक संपन्न होऊन बहुमताने तर भाजप कोल्हे गटाचे स्वीकृत नगरसेवक पदासाठी अतुल काले व सोनल अजमेरे यांच्या नावाची तर काळे गटाचे प्रकाश रुईकर यांची निवड जाहीर केली आहे.

दरम्यान नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पद त्यांच्यासाठी आरक्षित असताना ओ.बी.सी.समाज तोंडघशी पडला होता.त्यानंतर नगरसेवक पदाचे माळी समाजाचे तीन उमेदवार दोन्ही गटाकडून धारातीर्थी पडल्याने स्वीकृत नगरसेवकांची माळ वैभव गिरमे किंवा विरेन बोरावके यांच्या गळ्यात पडेल असा अंदाज सपशेल खोटा ठरला आहे.त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही गटांना यांची किंमत चुकवावी लागू शकते असा अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान सदर निवडणूक बहुमताने संपन्न होण्यासाठी व वाल्मीक लहिरे यांचा उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेण्यासाठी काळे गटाने आ.काळे यांच्याशी चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता.तो कोल्हे गटाने अमान्य करत निवडणूक घेण्याचा पर्याय निवडला असल्याचे दिसून आले आहे.त्यात लहिरे यांचा पराभव झाला आहे.

दरम्यान अध्यक्ष पराग संधान यांनी कोणाला फोन लावण्यापेक्षा निवडणूक घ्या म्हणून आग्रह धरला असल्याचे उघड झाले व त्यांनी मतदान घेतले त्यात कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र रणशूर हे बहुमताने निवडून आले आहे.
दरम्यान यावेळी पहिल्याच सभेत आम्हाला नूतन नगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही बोलण्याची संधी मागितली असता पीठासन अधिकारी पराग संधान यांनी ती नाकारली असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या गटनेत्या गौरी मंदार पहाडे यांनी करून आरोपाची राळ उडवून दिली आहे.त्याला विरोधी नगरसेवक जनार्दन कदम,प्रकाश रुईकर आदींनी त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.त्यामुळे आगामी पाच वर्षे नगरपरिषदेत काय वाढून ठेवले आहे याची चुणूक दिसून आली आहे.
दरम्यान आपले बहुमत नसताना आ.काळे गटाने उपनगराध्यक्ष पदाची उमेदवारी का भरली ? असा प्रश्न कोणाही विचारी माणसास न पडला तर नवल.मात्र त्यामागे सत्ताधारी कोल्हे गटाचे नाराज उमेदवार गळाला लावण्याचा डाव असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मात्र त्यात त्यांनी गुप्त मतदानाची मागणी का केली नाही हे एक आश्चर्य व्यक्त होत आहे.मात्र यात निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले असल्याचे दिसून येत आहे.परिणामस्वरूप या पहिल्या प्रयत्नात प्रथमदर्शनी त्यांना अपयश आले आहे.मात्र आगामी काळात त्यांच्या पदरी नक्कीच काहीतरी पडेल असा दुर्दम्य आशावाद त्यांच्यात दिसून येत आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचे सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,नूतन नगराध्यक्ष पराग संधान,गटनेते प्रसाद आढाव,काळे गटाचे गटनेते गौरी मंदार पहाडे यांनी अभिनंदन केले आहे.तर आ.आशुतोष काळे यांनीही त्यांच्या स्वीकृत नगरसेवक आदींचे अभिनंदन केले आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
दरम्यान कोणत्याही नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी
तज्ज्ञांचीच नियुक्ती करण्याचेही स्पष्ट असताना व त्यात डॉक्टर,वकील,अभियंता,शिक्षण तज्ञ,पर्यावरण तज्ञ,सेवानिवृत प्राध्यापक,मुख्याध्यापक,सहाय्यक आयुक्त,सेवानिवृत मुख्याधिकारी आदींचा समावेश होण्याची अपेक्षा असताना ती फोल ठरली आहे.सत्ताधारी गटाने सारे नियम धाब्यावर बसवून आपापल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची व निकटवर्तीयांचीच वर्णी लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून हटकून केले जाते हे वारंवार उघड झाले आहे.यावेळी त्याचा अनुभव आला असल्याची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.



