निवडणूक
नगरपरिषद निवडणूक पडसाद,दोन ठिकाणी अप्रिय घटना !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली असली तरी त्याचे पडसाद निकालाच्या दिवशी सायंकाळी आणि रात्री गंभीरपणे उमटले असल्याचे दिसून आले आहे.यात पहिल्या घटनेत गजानन नगर येथील एका माजी नगराध्यक्षांच्या घरी एका गांधीनगर येथील भाजपच्या गटाने जोरदार हल्ला करून चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान केले असल्याची खबर आहे.तर दुसऱ्या घटनेत सुभद्रानगर परिसरात मिरवणुकीत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एक अदखलपात्र गुन्हा दाखल असल्याची माहिती हाती आली असून त्याला पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान दुसऱ्या घटनेत भाजप मध्ये नव्याने निवडणूकपूर्व प्रवेश केलेला व पूर्वी सेनेत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या घरातील नातलग महिला पराभूत झाली आहे.मात्र त्यांचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बहुमतासह विजयी झाला आहे.ही संधी साधत त्यांनी राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवाराच्या गल्लीने मिरवणूक काढून त्यांच्या घरासमोर मोठमोठे फटाके फोडल्याने वादाला तोंड फुटले होते.त्यातून मोठी दुर्घटना टळली असल्याचे मानले जात आहे.
कोपरगावात नगरपरिषदेचा निकाल काल दुपारी जाहीर झाला असून त्यात भाजप कोल्हे गटाने बाजी मारली असून त्यांना १९ तर राष्ट्रवादीच्या आ.आशुतोश काळे गटाने ११ जागा म्हणजेच मागील निवडणुकीपेक्षा 50 टक्के जास्त जागा पटकवल्या आहे.दरम्यान यात भाजप आघाडीत असलेल्या शिवसेनेने चार आणि एक अपक्ष (कपबशी) यांनी एक जागा घेऊन आपले निर्णायक स्थान पटकावले आहे.आता कोणाला कोणते पद मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.मात्र या निकालाचे पडसाद कोपरगाव शहरात काल जोरदार उमटले असून यातील गजानननगर येथील भाजपच्या दोन उमेदवारांमध्ये क्रॉस मतदान केल्याच्या संशयावरून जोरदार हल्लाबोल झाला आहे.यात सदर कुटुंबाला पहिल्यांदा तीस वर्षात अपयश आले असल्याने तो घाव जिव्हारी लागला असल्याचे मानले जात आहे.यात गांधीनगर येथील पूर्वाश्रमीच्या सेनेत असलेल्या मात्र चौदा वर्षापूर्वी ईशान्यगडात जोरदार प्रवेश केलेल्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या नात्यातील उमेदवाराला निवडणुकीत हे अपयश आले आहे.दरम्यान यातून गांधीनगर येथील युवा नेत्याला संशय आल्याने व विरोधी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आणि आपला सहकारी असलेल्या भाजप उमेदवाला सारखेच मते कशी मिळाली असा सवाल त्याच्या मनात निर्माण झाला आहे.यावरून हे रणकंदन झाले आहे.त्या संशयातून हा हल्ला झाला असल्याची माहिती मिळाली आहे.मात्र यात वरिष्ठ नेत्यांनी सहभाग घेऊन हे प्रकरण जागेवरच शांत केले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे गुन्हा दाखल झाला नसला तरी पोलिसांची मोठी दमछाक झाली असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान दुसऱ्या घटनेत राष्ट्रवादीचे सुभद्रानगर येथील पुरुष उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी झाले असून त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे थोड्या मतांनी पराभूत झाला आहे.दरम्यान त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला व भाजप मध्ये नव्याने निवडणूकपूर्व प्रवेश केलेला व पूर्वी सेनेत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या घरातील नातलग महिला पराभूत झाली आहे.मात्र त्यांचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बहुमतासह विजयी झाला आहे.ही संधी साधत त्यांनी राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवाराच्या गल्लीने मिरवणूक काढून त्यांच्या घरासमोर मोठमोठे फटाके फोडल्याने वादाला तोंड फुटले होते.त्यातून घरातील महिलेच्या अंगावर काही फटाके उडून धोका पोहचला असल्याचा त्यांचा आरोप आहे.तथापि सदर घटनास्थळी अन्य माणसे असल्याचे एक दुर्घटना टळली असल्याचे म्हटले आहे.त्यातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नातलगांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन अदखलपात्र गुन्हा काल सायंकाळी दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान ही माहिती भाजप मध्ये प्रवेश करून निवडणूक लढविलेल्या अन्य कार्यकर्त्यांने सुद्धा त्यांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान यातून काही अनर्थ घडू नये यासाठी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी रामकृष्ण कुंभार,तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन दिलासा दिला आहे.त्या संबंधित घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवला असल्याचे दिसून आले आहे.



