जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

आमचे म्हणणे ऐकले नाही,उच्च न्यायालयात जाणार- सूतोवाच

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगावसह राज्यात अग्रगण्य असलेल्या समता पतसंस्थेची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी थकबाकीदारांच्या माध्यमातून दाखल केलेल्या समता पतसंस्थेची चौकशी सहकार मंत्रालयाने अखेर थांबविली असल्याचा दावा केला असताना व त्या बातमीची शाई अद्याप वाळली नसताना आज संबंधित तक्रारदार यांनी सहकार विभागाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याने हा प्रकार झाला असल्याचे सांगून आमचा नैसर्गिक हक्क डावलला असून याबाबत आपण संबंधित संस्था आणि विभागाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात जाणार असल्याचे प्रसिद्धपत्रक ओमप्रकाश बाबू आप्पा खके यांनी प्रसिद्धीस दिले आहे.त्यामुळे या प्रकरणी उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

ओमप्रकाश खके.

  

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत समता सहकारी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सचिन भट्टड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित सहकार विभागाचे आदेश आले असल्याचे जोरदार समर्थन केले आहे मात्र ते दाखवले नाही हे विशेष ! त्यामुळे ही थकीत कर्जदारांची कटकट त्यांना चांगलीच नडणार असे सध्या तरी दिसत आहे.

    कोपरगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मोठ्या उत्साहात आगामी २० डिसेंबर रोजी संपन्न होत असून त्यासाठी राष्ट्रवादीने मागील सन-२०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी जय्यद तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी कोणतीही जोखीम पत्करण्यास ते तयार नाही अशी स्थिती दिसून येत आहे.पहिल्या प्रचार टप्प्यात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रित केले होते.त्यासभेला त्यांनी मोठी गर्दी जमवली होती.त्यानंतर मात्र दि.२९ नोव्हेंबर रोजी न्यायिक कारणाने निवडणूक पुढे ढकलली होती.त्यानंतर सर्वच पक्ष थोडे ढिल्या अंगाने निवडणूक घेतील असे वाटत असताना अपक्ष वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा मरगळ झटकून मुसंडी मारून कामाला गती दिली असल्याचे दिसून आले आहे.मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोठी मुसंडी मारली असल्याचे दिसून आले आहे.
तथापि राष्ट्रवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेला वसुलीबाबत दुखावलेल्या  कर्जदारांना हाताशी धरून अडचणीत आणण्याची विरोधकांनी खेळी केली होती.त्यामुळे ठेवीदारांत अस्वस्थता निर्माण झाली होती.परिणामी त्याचा फटका बनण्यास सुरुवात झाली होती अशी नागरिकांत चर्चा सुरू झाली होती.त्यावर आज राष्ट्रवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांनी आज एक प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा केला होता व सदर प्रकरणी चौकशी पूर्ण झाली असल्याचे निवेदन प्रसिद्धीस दिले होते.

वसंत मधुकर घोडके.

   दरम्यान त्या बातमीची शाई वळण्याच्या आत आज पुन्हा एकदा संबंधीत कर्जदारांनी उचल खाल्ली असल्याचे दिसून येत आहे.या मागे कोण आहे हे सांगण्याची गरज नाही पण कोयटे हे या षडयंत्रात बळी कसे गेले हाच खरा प्रश्न आहे.यात आमच्या प्रतिनिधीने आधीच सूतोवाच केल्याप्रमाणें दुर्दैवाने होत असून एका संस्थेचा बळी देण्याचा दुर्दैवी प्रयोग होत असून एखादी सहकारी संस्था जनतेच्या विश्वासावर उभी करणे सोपे नाही.ते दिव्य कोयते यांनी केले मात्र त्यांना या चक्रव्युहात अडकवले असल्याचे बोलले जात आहे.परिणामी त्याची किंमत संबंधीत संस्था आणि संस्थापक आदींना मोजावी लागू नये इतकेच.

   दरम्यान याबाबत वसंत मधुकर घोडके यांनी एक चलचित्रफित प्रसारती केली असून दोघांच्या वाक्यात साधर्म्यता दिसून येत असल्याचे त्यांचा बोलवता धनी दुसरा कोणीतरी असल्याचे सरळ सरळ दिसून येत आहे.त्याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत समता सहकारी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सचिन भट्टड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित सहकार विभागाचे आदेश आले असल्याचे जोरदार समर्थन केले आहे मात्र ते दाखवले नाही हे विशेष ! त्यामुळे ही थकीत कर्जदारांची कटकट त्यांना चांगलीच नडणार असे सध्या तरी दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close