निवडणूक
आडमुठ्यापणामुळे,कार्यकर्त्यांना विरंगुळा-संगीत कार्यक्रमाचे समर्थन!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक लांबली जावून असून त्याचा सर्वच पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मानसिक त्रास झाला आहे.त्यातून मतदार आणि कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी व क्रमणूक करण्यासाठी महाराष्ट्राचा हास्य विनोद संगीत कार्यक्रम आयोजित केला असल्याचे समर्थन आ.काळे गटाच्या प्रसिध्दी कार्यालयांने केले आहे.

“विरोधकांनी नेहमीच चांगल्या कामात खोडा घालण्याची आणि विकासाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.नगरपालिकेमध्ये विकासकामांच्या विरोधात ठराव मंजूर करणे,सुरू असलेल्या कामांवर न्यायालयीन स्थगिती आणणे,केवळ राजकीय द्वेषातून शहराच्या प्रगतीला अडथळे निर्माण करणे ही त्यांची नेहमीची वृत्ती राहिली आहे त्यांचा बंदोबस्त करण्याची ही वेळ आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक आता दुसऱ्यांदा आता अंतिम टप्प्यात आली असून आरोप प्रत्यारोपांच्या तोफा गर्जत आहेत.ऐन हिवाळ्यात शिमगा साजरा होत आहे.त्यामुळे नागरिकांची चांगलीच करमणूक होत आहे.त्यातून एकमेकाची उणीदुनी काढली जात आहे.संस्थेच्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहे.मात्र त्यातच काहीना लक्ष केले जात असून काहीना तसेच साळसूदपणे सोडून दिले जात आहे.मात्र या राड्यात मतदारांना व कार्यकर्त्यांना या रणकंदनातून वेळ काढून करमणूक करण्यासाठी संगीत रजनी करण्यास नेते मंडळी विसरली नाही हे विशेष ! ती उणीव आ.काळे गटाने काल भरून काढली आहे.त्यांनी त्यासाठी महाराष्ट्राचा हास्य विनोद संगीत कार्यक्रम आयोजित करून समस्त मतदारांना मेजवानी दिली आहे.त्यामुळे मतदार आता जाम खुश झाले असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आता वीणा मोबदला मतदान होईल असे मानले जात आहे.विकासाबाबत आता कोणी बोलण्याची सुतराम शक्यता दिसत नाही यामुळे आता रामराज्य अवतरले असल्याचे मानण्यास जागा आहे.त्यामुळे त्याचे समर्थन केले जात असावे असो !त्यावेळी उपस्थित समस्त कोपरगाव कराशी आ.काळे यांनी संवाद साधला असल्याचे बोलले जात आहे.

“आपण कोपरगाव नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपल्या घरातील व्यक्तीला नव्हे तर समाजाशी एकरूप असलेल्या ओमप्रकाश कोयटे यांना दिली आहे.नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर व्हाव्यात,रखडलेली कामे मार्गी लागावीत,नवीन विकासकामांना चालना मिळावी आणि कोपरगावचा सर्वांगीण विकास व्हावा,हीच आपली भूमिका आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
त्यावेळी ते म्हणाले की,”सन- २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातील जनतेने मला दुसऱ्यांदा तब्बल सव्वा लाख मतांच्या ऐतिहासिक मताधिक्याने निवडून देवून पुन्हा सेवा करण्याची संधी दिली.मला दिलेली संधी हि मी केलेल्या विकास कामांवर,माझ्या प्रामाणिकपणावर आणि विकासाभिमुख दृष्टीकोनावर जनतेने ठेवलेला विश्वास आहे.या विश्वासाला तडा जाऊ न देता,कोपरगावच्या विकासासाठी माझी जबाबदारी यापुढेही प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणार आहे.
कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जो काही निधी आवश्यक असेल,तो निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणण्याची जबाबदारी आपली आहे.आपण निवडून आल्यापासून कोट्यावधींचा निधी कोपरगावाच्या विकासकामांसाठी आणला आहे.पुढील काळातही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी भरघोस निधी आणून विकासकामांना गती द्यायची आहे.विकास कामांना निधी मिळविणे जेवढे महत्त्वाचे आहे,तेवढेच तो निधी योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत खर्च होणेही तितकेच गरजेचे आहे.हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विकासदृष्टी असलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवक असतील. नगरपालिकेतील सत्तेचा उपयोग जर विकासासाठी करायचा असेल तर ती सत्ता राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाचीच असणे अत्यंत आवश्यक आहे.
विरोधकांनी नेहमीच चांगल्या कामात खोडा घालण्याची आणि विकासाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.नगरपालिकेमध्ये विकासकामांच्या विरोधात ठराव मंजूर करणे,सुरू असलेल्या कामांवर न्यायालयीन स्थगिती आणणे,केवळ राजकीय द्वेषातून शहराच्या प्रगतीला अडथळे निर्माण करणे ही त्यांची नेहमीची वृत्ती राहिली आहे.अशा नकारात्मक राजकारणामुळे कोपरगावच्या विकासाला मोठा फटका बसलेला कोपरगावकरांनी पाहिला आहे.नगरपालिकेची सत्ता कोपरगावकरांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी मागत आहे.त्यासाठी आपण नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपल्या घरातील व्यक्तीला नव्हे तर समाजाशी एकरूप असलेल्या ओमप्रकाश कोयटे यांना दिली आहे.नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर व्हाव्यात,रखडलेली कामे मार्गी लागावीत,नवीन विकासकामांना चालना मिळावी आणि कोपरगावचा सर्वांगीण विकास व्हावा,हीच माझी भूमिका आहे.त्यामुळे सर्वांगीण शहराच्या विकासासाठी नगरपालिकेची एकहाती सत्ता राष्ट्रवादीला द्या.कोपरगावला विकासाच्या नव्या उंचीवर घेवून जाण्यासाठी आपले सहकार्य आपल्याला आवश्यक असून कोपरगावच्या सुज्ञ मतदारांनी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन शेवटी आ.काळे यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना केले आहे.



