निवडणूक
कोयटेंच्या माध्यमातून शहर विकार करणार -…या नेत्याचा दावा !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपल्या आमदारकीच्या सहा वर्षात शहर आणि तालुक्यातील रखडलेल्या विकासाला चालना दिली असून भविष्यात आपण राष्ट्रवादीच्या वतीने ओमप्रकाश कोयटे यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली असून त्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाची गती वाढवली जाणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी प्रभाग क्र.१५ मधील कॉर्नर सभेत नागरिकांशी संवाद साधतांना केला आहे.

“समाजातील नागरिकांच्या मागणीनुसार समाज मंदिर आणि सभा मंडपांकरिता तसेच मस्जिद,कब्रस्तान,दफनभूमी,स्मशानभूमीच्या विकासासाठी नागरीकांच्या मागणीनुसार भरघोस निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाबरोबरच रस्ते,पाणी,गटारी या मुलभूत बाबी सोबतच शहराचा सर्वांगीण विकास केला आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव शहर नगरपरिषद निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहचत असून प्रचाराचा रंगत वाढत चालली ऐन कडक थंडीतही वातावरणात मोठी उष्णता निर्माण झाली आहे.काळे -कोल्हे आणि दोन्ही शिवसेना या खेरीज अपक्ष विजय वहाडणे यांच्यात ही लढत होत आहे.त्यामुळे दिवसागणिक त्यात उत्कंठा वाढत चालली आहे.खरी लढत ही काळे आणि कोहे गटाच्या उमेदवारांत होत असून दोन्ही शिवसेना आणि वहाडणे गट किती मताधिक्य घेणार याकडे शहर वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.प्रचारात राष्ट्रवादी अजित पवार गटाने आघाडी घेतली असून त्यानिमित्ताने प्रचाराची मोठी रणधुमाळी होत आहे.या निवडणुकीत सर्वच पक्षांनी पुन्हा एकदा प्रचाराचा धुरळा उडवला आहे.राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे आणि त्यांचे उमदेवार ओमप्रकाश कोयटे हेही त्यासाठी अपवाद नाही.त्यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.नुकत्याच संपन्न झालेल्या प्रभाग क्र.१५ मधील कॉर्नर सभेत त्यांनी हा दावा केला आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे प्रभाग क्रमांक पंधरा मधील उमेदवार,कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”ज्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या विकासाचे मुलभूत प्रश्न सोडवून पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न सोडविला त्याप्रमाणेच समाजातील विविध समाजाच्या समाजबांधवांनी केलेल्या मागणीनुसार त्या त्या समाजाच्या समाजमंदिरासाठी व सभागृहासाठी निधी दिला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात विविध समाजाची सभागृह आकाराला आली आहेत.त्याचा कोपरगावकरांना फायदा होत असून सभागृहाची मागणी पूर्ण झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.यापुढील काळातही नगराध्यक्षपदासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांच्या रूपाने समाजाशी नाळ जुळलेले नेतृत्व दिले आहे.आपण कोपरगाव शहराच्या रखडलेल्या विकासाला चालना दिली.भविष्यात काकासाहेब कोयटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून कोपरगावकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करणार आहे.समाजातील नागरिकांच्या मागणीनुसार समाज मंदिर आणि सभा मंडपांकरिता तसेच मस्जिद,कब्रस्तान,दफनभूमी,स्मशानभूमीच्या विकासासाठी नागरीकांच्या मागणीनुसार भरघोस निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाबरोबरच रस्ते,पाणी,गटारी या मुलभूत बाबी सोबतच शहराचा सर्वांगीण विकास केला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता आल्यानंतर विकासाची गती अधिक वाढणार आहे.कोपरगाव शहराला विकासाच्या बाबतीत यशोशिखरावर घेवून जाण्यासाठी मतदारांनी जे सहकार्य २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत केले तेच सहकार्य होणाऱ्या कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीत करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोयटे व सर्व नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत अव्वल केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.



