जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

मुस्लिमाना न्याय देण्याचे काम झावरे यांनीच केले-…यांचा दावा

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव शहरात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा त्यांनी बांधला त्याच्या पायथ्याशी व्यवसाय करणाऱ्या विस्थापित टपरीधारक मुस्लिम समाजाला 50 वर्ष दोन्ही नेत्यांनी न्याय दिला नाही त्याच मुस्लिम समाजाला प्रस्थापित करत गाळे देत खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी  केले असल्यामुळे मुस्लिम समाज त्यांच्यामागे खंबीर उभा असल्याचे प्रतिपादन वाहतूक सेनेचे जिल्ह्यप्रमुख इरफान शेख यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

उपस्थिताना मार्गदर्शन करताना माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे.

“गेली पन्नास वर्ष नगरपालिका,आमदारकी,खासदार,मंत्री पदे भोगून देखील आपल्या कोपरगाव शहराचा विकास प्रस्थापित काळे-कोल्हे व त्यांच्या उमेदवारांना करता आला नाही.तरी वर्तमानात आश्वासने देत फिरत आहेत हे दुर्दैवी असून या नेत्यांना विकास करायचा नाही तर टक्केवारीसाठी साठी पालिका पाहिजे आहे.पन्नास वर्षात फक्त काळे-कोल्हे यांनी एकमेकांची जिरवा जिरवी केलेली आहे.बाकी त्यांनी काहीही केले नाही”-राजेंद्र झावरे,नगराध्यक्षपदाचे उमदेवार,कोपरगाव.

   न्यायालयीन प्रक्रियेमुळे राज्यातील प्रलंबित बारा नगरपरिषदेच्या निवडणुकांचा धुराळा मोठ्या प्रमाणावर उडू लागला असून आरोप प्रत्यारोपांची राळ कोपरगावच्या आसमंतात मोठ्या प्रमाणावर उडू लागली आहे.आपल्या पक्षाचे आणि नेत्यांचे विचार मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले आहे.त्यात शिवसेना शिंदे गटाने आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.प्रत्येक प्रभागनिहाय प्रचार सुरू आहे.त्यावेळी खडकी येथील कॉर्नर सभेत बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल तिपायले होते.

आपले मनोगत व्यक्त करताना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विमल पुंडे दिसत आहेत.

   

“दोन्ही प्रस्थापित नेते आणि त्यांचे उमेदवार पैशाच्या जोरावर सोमवारच्या बाजारासाठी पैसे देऊन कॉर्नर सभेसाठी लोकं आणले जात आहे ही मोठी शोकांतिका आहे.त्यांच्या पैशाला लक्ष्मी म्हणून स्वीकारा आणि मतदान केंद्रवर जाऊन फक्त धनुष्यबाण ह्या चिन्हवर मतदान करा.कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा स्वाभिमान जगविण्यासाठी राजेंद्र झावरे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत”-विमल पुंडे,अध्यक्षा,जिल्हा महिला आघाडी शिवसेना.(शिंदे गट)

      सदर प्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे,महिला जिल्हा प्रमुख विमल पुंडे,किरण खर्डे,इरफान शेख,दत्ता पुंडे,बाबुराव पवार,विकास शर्मा,विशाल झावरे,राहुल देशपांडे, दिलीप सोनवणे,ऍड.शंकर यादव,अभिजित जाधव,अमजद शेख,दिगंबर गवळी,संतोष झावरे,रवी पवार,रवी आठरे,वैभव चव्हाण,बंटी बोर्डे,प्रभाग क्र.एक व दोन चे उमेदवार गायकवाड स्नेहा जनार्धन,आवारे दादा रखमाजी,पवार योगेश छबुलाल,शेख फमिदा हसम आदी मान्यवर उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राजेंद्र झावरे यांच्यासारख्या नेत्याने नेहमीच शिवसेनेच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम केले.त्याचेच प्रतीक म्हणून मुस्लिम समाजाला शाळेसाठी वर्ग पाहिजे असतांना जुन्या सायन्स कॉलेज येथे उर्दू शाळेला 8 वर्ग दिले,शहरतील मुस्लिम समाजाला दफन भूमिसाठी जागा कमी पडत असल्याची मागणी स्व.शहर प्रमुख याकूब शेख यांनी केली असता राजेंद्र झावरे यांनी त्यांची ती मागणी पूर्ण करत नवीन दफन भूमीच मंजूर करून दिली आहे.रिक्षासेनेत 50 टक्के सभासद मुस्लिम समाजाचे सामावून घेत सी.बी.एस.मज्जीद साठी जागा उपलब्ध करून देण्याचे काम झावरे यांनी केले आहे.तसेच कोपरगाव शहरांत दंगल झाल्यावर सर्वात मोठी झळ ही बांगडी चाळ येथील व्यवसाय करणाऱ्या मुस्लिम समाजाला पोहोचत असायची मात्र झावरे नगराध्यक्ष झाले असताना त्यांनी सर्वात प्रथम संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज व्यापारी संकुल करत त्या ठिकाणी असलेल्या विस्थापित टपरीधारक बांगडी चाळीतील मुस्लिम समाजासह सर्व धर्मीय व्यावसायिकांना पक्के गाळे उपलब्ध करून दिले आहे.काळे -कोल्हे ह्या दोन्ही नेत्यांचे पैसे हे भ्रष्टाचार आणि दारूचे आहेत.मुस्लिम समाजात दारू आणि त्यांचे पैसे हे हराम मानले जाते त्यामुळे दारू आणि दारुवाल्यांचे उमेदवार आपल्याला नकोय.आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निर्व्यसनी आहे.त्यामुळे आमगी निवडणुकीत झावरे यांच्या मागे मुस्लिम समाजासह सर्व धर्मीय बांधव खंबीर पणे साथ देण्यासाठी उभे असून नगराध्यक्ष पदी त्यांना विराजमान करण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करत असल्याचेही शेवटी इरफान शेख म्हणाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close