जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…इफकोची माहिती दडवली,संचालकपद धोक्यात!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

     बहु-राज्य सहकारी संस्था कायदा-२००२ च्या कलम ८४ (४) अंतर्गत एकाच वेळी इफको आणि कृभको या केंद्र शासनाच्या संस्थेचे दुहेरी सदस्यत्वाच्या संचालकांच्या पदावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला असून  इफको नामनिर्देशन पत्रात कृभको संस्थेचे सदस्यत्व असल्याची माहिती लपवून ठेवल्यामुळे ईफकोचे संचालक असलेले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे ईफकोचे संचालक पद धोक्यात आले असल्याची माहिती लोकसेवा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे अध्यक्ष व सहकार भारती महाराष्ट्रचे प्रदेश सचिव नकुल कडू यांनी दिली आहे.

  

“इफ्कोच्या निवडणुकीत नकुल कडू यांचा विजय निश्चित असताना विवेक कोल्हे यांनी खोटी कागद पत्र रंगवून त्यांचा अर्ज रद्द ठरविला होता.आपला अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद करून विवेक कोल्हे स्वतः ईफको आणि कृभको या दोन केंद्र शासनाच्या संस्थेचे सदस्य आहेत.नियमानुसार या दोन संस्थेचे सदस्य असल्यास सदस्यपद रद्द करण्याची तरतूद आहे.नेमके त्याच गोष्टीवर बोट ठेवून नकुल कडू यांनी विवेक कोल्हे यांच्या सदस्य पदाबाबत वाद उपस्थित केला आहे त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

    न्यायालयीन प्रक्रियेमुळे राज्यातील प्रलंबित बारा नगरपरिषदेच्या निवडणुकांचा धुराळा मोठ्या प्रमाणावर उडू लागला असून आरोप प्रत्यारोपांची राळ कोपरगावच्या आसमंतात मोठ्या प्रमाणावर उडू लागली आहे.समता सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्या नंतर समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे नाव न घेता आरोप केला होता.त्याची राळ अद्याप खाली बसत नाही तोच आता राष्ट्रवादीने कोल्हे यांच्या विरुद्ध आपले हत्यार परजले आहे.त्यात त्यांनी इफकोचे भूत बाटलीबाहेर काढले आहे.व त्याबाबत एक प्रसिद्धीपत्र माध्यमांना दिले आहे.यात राष्ट्रवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना छाननीनंतर विवेक कोल्हे यांनी न्यायालयात खेचले होते.मात्र त्यांना त्यात त्यांना अपयश आले होते.मात्र आता आ.काळे गटाने या आव्हानाचे उट्टे काढले असल्याचे बोलले जात आहे.

नकुल कडू,इफको निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार.

   त्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,”इफकोच्या निवडणुकांतील प्रतिनिधींच्या नामनिर्देशन व पात्रते वर लोकसेवा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे नकुल कडू यांनी आक्षेप घेतला असून केंद्रीय निबंधक रवींद्र कुमार अग्रवाल (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) यांचे विरुद्ध संचालक पदाबाबत वाद निर्माण केला आहे.यामध्ये विशेषतः शेतकरी सहकारी संघ लि.,कोपरगाव या संस्थेच्या प्रतिनिधीच्या पात्रतेवर आक्षेप घेण्यात आला असल्याची बातमी आहे.इफको आणि कृभको या दोन्ही संस्थांमध्ये दुहेरी सदस्यत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात येवून दुहेरी सदस्यत्व असल्याची माहिती नामनिर्देशनपत्रात लपविली असल्याचे कडू यांनी म्हटले आहे.हि माहिती लपविणारे शेतकरी सहकारी संघ लि.,कोपरगावचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक झालेले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

   दरम्यान या वादावर तोडगा काढण्यासाठी निवृत्त आय.ए.एस.अधिकारी सहाय मीना यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या वादाची सुनावणी अधिनियम, १९९६ अंतर्गत केली जाणार आहे.अर्ज सादर करण्यात झालेल्या उशीराच्या माफीनाम्यावरही आयएएस अधिकारी सहाय मीना निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.कलम ८५ (३) अंतर्गत कल्याण सहाय मीना यांची ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी वैध राहणार असून,गरज असल्यास ही मुदत केंद्रीय निबंधक वाढवू शकतात.या वादामुळे इफकोच्या निवडणुकीतील प्रक्रियेवर आणि सहकारी संस्थांच्या प्रतिनिधीत्वाच्या पारदर्शकतेवर नव्याने निर्णय होण्याची शक्यता असून कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष कोल्हे यांचे ईफकोचे संचालक पद जाणार असल्याचे लोकसेवा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे नकुल कडू यांनी सूतोवाच केले आहे.

   नकुल कडू हे ईफकोच्या निवडणुकीत विवेक कोल्हे यांचे प्रतिस्पर्धी होते.त्या निवडणुकीत नकुल कडू यांचा विजय निश्चित असताना विवेक कोल्हे यांनी खोटी कागद पत्र रंगवून त्यांचा अर्ज रद्द ठरविला होता.आपला अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद करून विवेक कोल्हे स्वतः ईफको आणि कृभको या दोन केंद्र शासनाच्या संस्थेचे सदस्य आहेत.नियमानुसार या दोन संस्थेचे सदस्य असल्यास सदस्यपद रद्द करण्याची तरतूद आहे.नेमके त्याच गोष्टीवर बोट ठेवून नकुल कडू यांनी विवेक कोल्हे यांच्या सदस्य पदाबाबत वाद उपस्थित केला आहे.त्याबाबत तालुक्यात मोठी चर्चा झडू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close