निवडणूक
मारहाण प्रकरणाचा मतदानापूर्वी छडा लावा-…मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात एका सहकारी (समता) पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली असून,या घटनेचा मतदानापूर्वी तातडीने छडा लावण्यात यावा, अशी मागणी भाजपा आणि मित्रपक्षांच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

“मारहाण झाल्याची माहिती मिळालेल्या वारी येथील बाबासाहेब ठोंबरे हे विशिष्ट संस्थेचे कर्मचारी असले,तरी त्यांचे आणि कोल्हे कुटुंबाचे अनेक वर्षांपासून सामाजिकदृष्ट्या जोडलेले आहे.त्यामुळे या घटनेतील सर्व पैलू,संबंध आणि पार्श्वभूमी तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
हल्ला नेमका कोणी केला,त्यामागचा उद्देश काय होता,याचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणणे अत्यावश्यक आहे”-विवेक कोल्हे, अध्यक्ष,सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखाना.
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक आता दिवसेंदिवस रंगत चालली असताना त्यात आता गंभीर वळण घेतले आहे.कोपरगाव येथील समता सहकारी पतसंस्थेचे वारी येथील सहिवासी असलेले कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे यांना रस्त्यात गाठून मारहाण झाल्याची घटना घडली असून त्यावरून उलटसुलट आरोपप्रत्यारोप होत असून यात समता सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी आमच्या कर्मचाऱ्यास (कोल्हे यांचे नाव न घेता ) मारहाण केल्याचा आरोप केला आहे.त्यावरून दोन्ही गटात रणकंदन माजले आहे.त्यावरून दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप होत आहे.दरम्यान या प्रकरणी विवेक कोल्हे यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी करून धक्का दिला आहे.त्यामुळे यातील आरोपी कोण ? असा सवाल निर्माण झाला आहे.
सदर प्रसंगी भाजप आणि मित्र पक्षाचे उमेदवार पराग संधान आणि भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”मारहाण झाल्याची माहिती मिळालेल्या वारी येथील बाबासाहेब ठोंबरे हे जरी एका विशिष्ट संस्थेचे कर्मचारी असले,तरी त्यांचे कुटुंब कोल्हे कुटुंबाशी अनेक वर्षांपासून सामाजिकदृष्ट्या जोडलेले आहे.त्यामुळे या घटनेतील सर्व पैलू,संबंध आणि पार्श्वभूमी तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
हल्ला नेमका कोणी केला,त्यामागचा उद्देश काय होता,याचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणणे अत्यावश्यक आहे.शहरातील शांतता आणि वातावरण दूषित करून राजकीय फायदा घेण्याचा कुणाचा डाव आहे का,या धाग्यानेही तपास व्हावा अशी भूमिका विवेक कोल्हे यांनी मांडली आहे.कोपरगावच्या कायदा-सुव्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम राहावा,यासाठी पोलिसांनी या प्रकरणात तातडीने,पारदर्शक आणि कठोर कारवाई करावी,अशी अपेक्षा भाजपाच्या वतीने शेवटी केली आहे.



