निवडणूक

आमच्या उक्ती आणि कृतीत अंतर नाही-…या उमेदवाराचा दावा !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  निवडणुका म्हणजे आश्वासनांची खैरात असते,मात्र आम्ही उक्ती आणि कृतीत कधी कोणतेही अंतर ठेवत नाही.आपण जे बोलतो ते करतो आणि जे करणार आहे तेच जनतेसमोर मांडत असल्याचे प्रतिपादन भाजप आणि मित्रपक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी नुकतेच एका प्रचारसभेत संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत बोलताना केले आहे.

भाजप आणि मित्रपक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान उपस्थितांना संबोधन करताना दिसत आहे.

   

“कोपरगावच्या विकासासाठी राजकारणापेक्षा काम,विश्वास आणि संवाद या त्रिसूत्रीवर आधारित कार्यपद्धती स्वीकारली असून,जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही”- पराग संधान,उमेदवार,भाजप आणि मित्र पक्ष आघाडी,कोपरगाव.

  कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीचा शिमगा आता दिवसेंदिवस रंग भरत चालला असून नागरिकांची आणि मतदारांची उत्कंठा वाढवताना दिसत आहे.आरोप आणि प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जात असून अनेकांचे वस्त्रहरण होताना दिसत आहे.तर अनेकांनी विकासकामांवर जोर दिला आहे.त्यातून आगामी काळात कोण या परीक्षेत उत्तीर्ण होणार याकडे शहरातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.त्यातच भाजप आणि मित्र पक्षांच्या आघाडीने या प्रचारसभांत आघाडी घेतली असल्याचे दिसून येत असून प्रचाराचा धडाका सुरू आहे.त्यावेळी भाजप पराग संधान
बोलत होते.

   त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेण्यासाठी जनतेच्या थेट सूचनांतून आम्ही आमचा ‘विश्वासनामा’ तयार केला आहे.हा विश्वासनामा कोणत्याही बंद दालनात तयार केलेला नसून,शहरातील नागरिक,व्यापारी,महिला,युवक,ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा,समस्या आणि सूचना ऐकून तयार करण्यात आला आहे.

   कोपरगाव शहरातील रस्ते,धूळ,पाणीपुरवठा, स्वच्छता,आरोग्य सेवा,शिक्षण,वाहतूक, बाजारपेठेतील सुविधा,महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसह अनेक लहान-मोठ्या प्रश्नांवर व्यवहार्य,ठोस आणि वेळेत पूर्ण होणाऱ्या उपाययोजना या विश्वासनाम्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याचा आमचा स्पष्ट दृष्टिकोन असल्याचेही पराग संधान यांनी सांगितले.सामान्य माणसाच्या लहान वाटणाऱ्या समस्या या प्रत्यक्षात त्याच्या रोजच्या जगण्याशी निगडीत असतात.त्या समस्या सोडवणे हीच खरी लोकसेवा आहे,असे सांगत त्यांनी या समस्यांवर विधायक,पारदर्शक आणि परिणामकारक उपाय राबवण्याची त्यांनी उपस्थितांना आश्र्वासित केले आहे.

   कोपरगावच्या विकासासाठी राजकारणापेक्षा काम,विश्वास आणि संवाद या त्रिसूत्रीवर आधारित कार्यपद्धती स्वीकारली असून,जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही,असा विश्वास पराग संधान यांनी व्यक्त केला.जनतेच्या सहभागातून उभा राहिलेला हा विश्वासनामा म्हणजेच कोपरगावच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close