निवडणूक
कोयटेंना संधी दिल्यास पायाभूत सुविधांचे कामे लावणार मार्गी-…या नेत्याचे आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून दिल्यास आपण आगामी काळात नगरपालिकेच्या माध्यमातून पायाभूत सर्व विकासकामे करणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या एका प्रचार सभेत बोलताना केलं आहे.

“कोपरगाव शहराच्या प्रत्येक प्रभागासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून आ.काळे यांनी विकासाचा नवा इतिहास घडविला आहे.माजी आमदारांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोपरगाव शहरासाठी किती कोटी रुपयांचा निधी आणला हे जनतेसमोर स्पष्ट करावे. तुलना केल्यास कोण कोपरगावच्या विकासासाठी झटले आणि कोण केवळ राजकारणात गुंतले होते हे कोपरगावकरांना चांगले माहिती आहे”-ओमप्रकाश कोयटे,उमेदवार,राष्ट्रवादी,कोपरगाव.
कोपरगाव नगरपरिषद निवडणुक आता दिवसागणिक रंग भरू लागली असून आरोपप्रत्यारोपानी गलका वाढत चालला आहे.कोणी विकासकामाबद्दल बोलत आहे तर कोणी आरोपांच्या केवळ फैरी झडत आहे.या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ व १३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते.
सदर प्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे तसेच नगरसेवकपदाचे उमेदवार,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,” रस्ते, पाणी पुरवठा,स्वच्छता व्यवस्था,भूमिगत गटारी,भूमिगत वीजवाहिन्या,नागरिकांचे आरोग्य,शिक्षण आणि इतर मूलभूत नागरी सुविधा या सर्व बाबी विकासाच्या केंद्रस्थानी आहेत.कोपरगावकरांनी अनेक वर्षे फक्त आश्वासनांचे राजकारण पाहिले आहे.त्यामुळे आता केवळ घोषणा नको,तर प्रत्यक्ष कामातून दिसणारा विकास कोपरगावकरांना हवा आहे. म्हणूनच नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करून शहराला समृद्ध बनवणे हेच माझे ध्येय आहे.
कोपरगाव शहराचा विकास आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने सर्व विकासकामे मार्गी लावली जातील.राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मतदार संघासह कोपरगाव शहराच्या विकास कामांना भरघोस निधी उपलब्ध झाला असून यापुढील काळातही उपलब्ध होईल त्यामुळे विकास कामांना गती मिळणार आहे.लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपली जबाबदारी १०० टक्के पार पाडली आहे.आता कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या शहराचा विकास ही माझी जबाबदारीच नाही तर सामाजिक बांधिलकी असून चार वर्षात कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलवून दाखवणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे म्हणाले की,”प्रभाग क्रमांक १२ मध्ये आ.काळे यांच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत.तर प्रभाग क्रमांक १३ मध्ये ४ कोटी १३ लाख रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत.कोपरगाव शहराच्या प्रत्येक प्रभागासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून आ.काळे यांनी विकासाचा नवा इतिहास घडविला आहे.माजी आमदारांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोपरगाव शहरासाठी किती कोटी रुपयांचा निधी आणला हे जनतेसमोर स्पष्ट करावे. तुलना केल्यास कोण कोपरगावच्या विकासासाठी झटले आणि कोण केवळ राजकारणात गुंतले होते हे कोपरगावकरांना चांगले माहिती आहे असा टोला माजी आ.कोल्हे यांचे नाव न घेता लगावला आहे.
आ.काळे यांच्या नेतृत्वात कोपरगाव शहराच्या नागरीकांना २३ दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता चार दिवसाआड होत आहे. शहरातील रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे जात असून शहरामध्ये भूमिगत गटारींची कामे सुरु असल्याने नागरी सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडत आहेत.या विकासकामांचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना झाला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे. आ.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मला नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी द्या. कोपरगावच्या विकासाचे स्वप्न अधिक वेगाने साकारण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करीन.कोपरगाव शहराला विकसित,स्वच्छ आणि समृद्ध बनवणे हेच माझे आणि आमच्या सर्व नगरसेवकांचे ध्येय असल्याचे कोयटे यांनी यांनी शेवटी सांगितले आहे.



