जाहिरात-9423439946
निवडणूक

आरोप करवून घेणाऱ्यांनी,समोर येऊन आरोप करा-…यांचे आव्हान !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   “पतसंस्थेचे नाठाळ थकीत कर्जदार हे कोणाच्या आडून बाण मारत आहेत हे आम्हाला माहीत आहे.आरोप करवून घेणाऱ्यांत हिमत असेल तर त्यांनी समोर येऊन आरोप करावे.दुसऱ्याच्या आडून निशाणा साधू नये,समताचे कार्य स्वच्छ दिसत असल्याने अनेकाना पोटात दुखत असून त्यांनी अडचणी आणण्याचे काम सुरू केले आहे.आरोप करून घेणाऱ्यांनी त्यांच्या संजीवनी पतसंस्था देवयानी सहकारी बँक आहे याचे भान ठेवावे असा प्रतिहल्ला आज एका बैठकीत समता सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी माजी आ.कोल्हे यांचे नाव न घेता केला आहे.

समता पतसंस्थेत आयोजित पत्रकार परिषदेत आ.आशुतोष काळे, संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संदीप कोयटे आदी दिसत आहे.

“काका कोयटे यांनी शहरात चांगले समाजकारण,राजकारण केले असल्याचा दावा करून त्यांनी राजकारण सोडून पंचवीस वर्षे झाली होती.पण आपणच त्यांना त्यांचे कार्य पाहून आग्रह धरून पुन्हा एकदा राजकारणात आणले आहे मात्र त्यांचे कार्य पाहून आपला निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने विरोधकांनी हे बेताल आरोप सुरू केले आहे,मात्र आपण त्यांचे पाठीशी उभे आहोत”-आ. आशुतोष काळे,कोपरगाव.

    आपली शेतजमीन विकूनही कर्जाची पूर्णफेड न झाल्याने समता नागरी पतसंस्थेच्या अध्यक्ष आणि संबंधित अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी कर्जदार वसंत मधुकर घोडके यांचेसह छत्रपती संभाजीनगर येथील आणखी एक कर्जदार डॉ.चंद्रकांत मोरे आदींनी  केल्याने त्या आरोपाबाबत राज्याचे संबंधित सहकार आयुक्त यांनी (अती) तातडीने दखल घेत अहिल्यानगर जिल्हा सहकार निबंधक यांना कलम ८३ व सहकार कलम 89 (1) अ समता नागरी सहकारी पतसंस्थेस पाठवलेली नोटीस आमच्या प्रतिनिधींचे हाती लागली व ती प्रसिद्ध झाली होती.त्याचे ऐन कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीव्र प्रतिक्रिया उमटली असून त्याचे खंडन करण्यासाठी आज कोपरगाव येथील समता सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात आज सायंकाळी ६.२५ वाजता कोयटे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

  

“या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आरोप प्रत्यारोप करणारे पक्ष हे महायुती सरकारचे घटकपक्ष असताना सहकार व अर्थ खाते हे राष्ट्रवादी पक्षाकडे असताना हे आरोप प्रत्यारोप किती योग्य आहे असा सवाल केला असता त्यांचा बोलवता धनी दुसरा असल्याचे सूतोवाच करून अप्रत्यक्षपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे अंगुलीनिर्देश केला आहे.त्यावर स्पष्ट बोलणे टाळले आहे.

    सदर प्रसंगी समता सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,शहर राष्ट्रवादीचे युवा आघाडीचे अध्यक्ष नवाज कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी अध्यक्ष कोयटे पुढे बोलताना म्हणाले की,”आपण सहा महिने एका पुस्तकाचे लेखन केले असून ते आपल्याला सहकारी पतसंस्था चळवळीत आलेल्या अनुभवावर आधारित असल्याचे सांगून त्यात आज आरोप करणाऱ्यांच्या सुरस कथा असल्याचे सांगून त्या कथांचे क्रमांक सांगितले आहे. व आपण सहकारी चळवळीत काम करताना सहकारी संस्था प्रथम बाकी दुय्यम असल्याचे समजून काम केले असल्याचे आपल्या प्रास्ताविकात म्हटले आहे.वसुलीच्या शक्तीमुळे अनेक थकबाकीदारांच्या रोषाला सामोरे जावे लागते त्याला इलाज नाही.मात्र ते ठेवीदारांच्या हिताचे आहे.हेच पुण्य आपल्याला कामी येणार आहे.मात्र विरोधकांचे  असा सल्ला देणारे सल्लागार कोण आहे हे समजत नाही अशी कोपरखीळी मारली आहे.व आगामी निवडणुकीत आमचे ३० चे ३० उमेदवार उभे केले असल्याचा दावा करून त्यांना सर्वच्या सर्व उमेदवार सुद्धा मिळत नसल्याचा दावा माजी आ.कोल्हे यांचे नाव न घेता केला व आरोप करणाऱ्या कर्जदारांनी हवा काढून घेतली आहे.

   त्यावेळी समताचे संचालक संदीप कोयटे म्हणाले की,”थकीत कर्जदार हे एकाएकी कसे एकत्र आले आणि तक्रारी केल्या ? आणि सहकार खाते कसे एकाएकी जागे झाले आहे ? त्यावर काही विघ्नसंतोषी लोक सामाजिक संकेतस्थळावर आमच्या संस्थेची बदनामी करत आहेत व ठेवीदारांना स्पष्टीकरण टाकून खुलासा करताना ठेवी काढण्याचे आवाहन करून मोठे आक्रित घडवत आहे.सामाजिक संकेतस्थळावर संस्थेची कुप्रसिद्धी करणाऱ्यांविरुद्ध आपण कोपरगावात पोलिस कारवाई केली असून त्याची चौकशी सुरू झाली आहे.ज्या नाठाळ थकबाकीदारांनी संस्थेची बदनामी केली आहे.त्या थकबाकीदारांना संस्था नोटीसा काढणार आहे.पिंपळगाव बसवंत येथील असाच एक जण खोटे आरोप करत आहे.त्याने कर्जाचा हप्ता जमा केला नाही.त्याची मालमत्ता जप्त केली त्यावर नाराज होऊन हे प्रताप सुरू आहे.त्यासाठी त्यांनी समोर असलेल्या एका पडद्यावर सरकारी किमतीचे पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.बसवंत पिंपळगाव येथील एक थकबाईदार वसंत घोडके याच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी या कर्जदारानेच मनचंदा नामक एक इसम आणून त्यांना विक्री करण्यास सांगितले होते.विशेष म्हणजे त्यावेळी हा कर्जदार इसम त्यावेळी प्रकिया करताना व खरेदी खतासाठी तो स्वतः उपलब्ध होता.त्याचे खाती ५.५ कोटी रक्कम जमा केल्याचे सांगितले आहे.गाळे विक्री करून त्याच्या कर्ज खात्याची रक्कम जमा केली होती.आता तो राजकीय दबाव करण्याचे काम सुरू करत आहे.यांना एकाएकी जाग कशी आली आणि त्याच्या तालावर सहकार खाते कसे जागृत झाले ? त्याचे बंधूवर कोणाचा दबाव निर्माण झाला आणि त्याचा मृत्यू कसा झाला याची सर्व माहिती आम्हाला आहे.त्यांचेवर अनेक बँकाचे कर्ज आहे.अनेकाना तो फसवत आहे.त्यांच्या लिलावाचे नोटीसा त्यावेळी कोयटे यांनी पडद्यावर दाखवल्या आहे.शेवटी त्यांनी आरोप करणारा घोडके हा तसा पाहुणाच आहे… हे सांगताना खेद व्यक्त होत असल्याची कबुली दिली आहे.

   त्यावेळी आरोप करणारा दुसरा कर्जदार डॉ.संजय मोरे याचा समाचार घेतला आहे.त्याच्या २२ कंपन्या असून त्या बंद कंपन्यांचा मालक असल्याचे सांगत आहे.ज्या बॉडी बिल्डिंग संघटनेचा तो मोठा पदाधिकारी असल्याचे भासवत आहे त्या स्पर्धात त्याने कसा कसा भ्रष्टाचार केला आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे.तो खूप अयोग्य व्यक्ती असल्याचा शेरा त्यांनी मारला आहे.त्यास एक वेळी तर महिलांनी मारले आहे.उच्च न्यायालयात त्याने खोटेनाटे ०५ दावे दाखल केले आहे.उच्च न्यायालयाचे लक्षात आल्यावर त्याला न्यायालयाने ५० हजारांचा दंड केला आहे.अन्य न्यायालयात दोन दोन हजारांचे अनेक दंड झाले आहे.त्याने अनेक संस्थांना पत्र दिले आहे.सी.बी.आय.,आर्थिक गुन्हे शाखेचा त्यात समावेश आहे.मात्र या सर्वांनी संस्थेला क्लीनचिट दिली असल्याचं दावा त्यांनी केला आहे.त्यांना नगरपरिषद निवडणूक पाहून अनेकांनी राजकीय द्वेषातून त्यांना जागे केले आहे.याचे मुलाचे लग्न शिर्डीत थाटामाटात झाले.पण बँड,कॅटरिंग,घोडेवाले,फेटेवाले आदी कोणतेही पैसे दिलेले नाही असा आरोप संदीप कोयटे यांनी केला आहे.

   तर आणखी एक इसम ओमप्रकाश खके याचा उल्लेख करून त्यांचा उल्लेख ‘ महाभाग’ असा केला आहे.तोही तसाच आहे.व राज्यात समता पतसंस्था ही टॉप टेन मध्ये असल्याचा दावा करून या संस्थेचे वेळोवेळी लेखा परीक्षण केले जात असते.या संस्थेचे तीन महिन्यापूर्वी ऑडिट झाले असताना सहकार विभाग पुन्हा कशी चौकशी करत आहे.याबाबत आपण चौकशी केली असता,” त्यात सहभागी सहकार विभागाचे अधिकारी हे आपल्याला वरिष्ठ दबावामुळे ही करावे लागत असल्याचे सांगून त्यांनी डोक्याला हात लावला असल्याची आठवण करून दिली आहे.डॉ.मोरे यांनी तीन वर्षापूर्वी असाच अर्ज दिला होता.त्यात काहीही निष्पन्न झालेले नाही.वर्तमानात आपली निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे.त्यामुळे आपल्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार सर्वाधिक निवडून देणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.आमचे मागे उपमुख्यमंत्री अजित पवार,कोपरगावचे आ.आशुतोष काळे पाठीशी असल्याने आगामी काळात आम्हाला कोणताही धोका नाही असा विश्वास संदीप कोयटे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

   यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की,”काका कोयटे यांनी शहरात चांगले समाजकारण,राजकारण केले असल्याचा दावा केला आहे.त्यांनी राजकारण सोडून पंचवीस वर्षे झाली होती.पण आपणच त्यांना त्यांचे कार्य पाहून आग्रह धरून या क्षेत्रात आणले आहे.त्यांनी आधी नकार दिला होता.पण आपण आग्रह धरला असल्याने त्यांनी उमेदवारी दिली आहे.त्यांना आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे घेऊन जाऊन तीन दिवसात उमेदवारी आणली होती.मात्र निवडणूक म्हटले की,” आरोप प्रत्यारोप होणार आहे.आगामी काळात पतसंस्थेचे चौकशी होईल.पण घाबरण्याचे कारण नाही,”ज्याला आपल्याला कर त्याला तर डर कशाला हवे.असे म्हटल्याने त्यांनी उमेदवारीची तयारी दर्शवली आहे.विरोधक आमदार म्हणून आपल्यावर टीका करायची सोडून ती त्यांच्यावर करायला लागले आहे.त्यांना आता पराभवाचे मळभ दिसत आहे.त्याचा पराभव होणार हे दिसू लागल्याने त्यांनी हे उद्योग सुरू केले आहे.आगामी काळात आमच्या गटाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे.विरोधकांनी काही वर्षापूर्वी २८ कामांना खोडा घातला असल्याची आठवण करून दिली आहे.हिच मंडळी त्याबाबत न्यायालयात गेली होती याची आठवण करून दिली आहे.पाच नंबरच्या साठवण तलावाचे काम या विरोधकांनी अडवले होते.आताही आलेल्या या चौकशीतून काहीही साध्य होणार नाही असा विश्वास कोयटे यांना दिला आहे.विरोधकांनी लोकामध्ये मतदानासाठी जाण्याऐवजी ते आधीच अडचणी आणून पराभव होणार हे दाखवत फिरत असल्याचा आरोप आ.काळे यांनी शेवटी केला आहे.

   दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी,”या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आरोप प्रत्यारोप करणारे पक्ष हे महायुती सरकारचे घटकपक्ष असताना सहकार व अर्थ खाते हे राष्ट्रवादी पक्षाकडे असताना हे आरोप प्रत्यारोप किती योग्य आहे असा सवाल केला असता त्यांचा बोलवता धनी दुसरा असल्याचे सूतोवाच करून अप्रत्यक्षपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे अंगुलीनिर्देश केला आहे.मात्र यात काहीही साध्य होणार नाही असा विश्वास आ.काळे आणि कोयटे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close