निवडणूक
ऐन निवडणुकीत गोदा स्वच्छता अभियान !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
देशातील लोकशाही निवडणुका म्हणजे लोकांना पोकळ आश्वासने देण्याचा मोठा फड आता भारतीय राजकारणात गणला जात असताना कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत आज गोदामाई प्रतिष्ठान आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज पवित्र गोदावरी नदी स्वच्छतेचे अभियान राबवले गेले असल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गोदामाई प्रतिष्ठान आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज पवित्र गोदावरी नदी स्वच्छतेचे अभियान राबवले गेले त्यावेळी शपथ देताना गोदासेवक आदिनाथ ढाकणे दिसत आहेत.
“कोपरगाव शहर आणि तालुक्याला गोदावरी नदीचा पवित्र आणि धार्मिक त्याचे जतन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.शहराची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.आज निवडणूक जरी पुढे गेली असेल पण जनमतातून आलेल्या सूचना पूर्ण करण्यासाठी विश्वासनामा साध्य करण्यासाठी आम्ही 20 डिसेंबर रोजी टाकत असलेल्या मतदारांच्या विश्वासाला जागून कृतिशील पाऊल टाकले आहे.त्या दृष्टीने काम सुरू केले आहे”-विवेक कोल्हे,अध्यक्ष,संजीवनी सहकारी साखर कारखाना.
गोदावरी नदीला हिंदू धर्मात ‘दक्षिण गंगा’ म्हणतात,तिचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे,विशेषतः नाशिकमधील तिच्या काठावर कुंभमेळा भरतो,ती गौतम ऋषींशी संबंधित आहे आणि तिच्या काठावर अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत,जसे की त्र्यंबकेश्वर आणि गुप्त गोदावरी,जिथे भगवान राम वनवासात थांबले होते; या नदिला पौराणिक कथा आणि ग्रंथांमध्ये पवित्र मानले जाते.नदीकाठावर शेकडो पुरातन मंदिरे असून या नदीच्या काठावरच दर बारा वर्षांनी जगप्रसिद्ध कुंभमेळा येथे भरतो.अनेक संत-महंत भाविक येथे स्नानासाठी येत असतात.त्यामुळे गोदावरी नदीला विशेष महत्त्व असून ते वादातीत आहे.मात्र गोदापात्रात वर्तमानात सोडले जाणारे सांडपाणी व नाशिक शहरातील औद्योगिक वसाहतींच्या रसायनयुक्त पाण्यामुळे गोदावरी नदीतील प्रदूषण वाढले आहे.परिणामी शेती नापिकी होत असून मानवी व जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
नाशिक शहरातील सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहती व एकलहरे विद्युतनिर्मिती केंद्राचे रासायनयूक्त पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.परिणामी पाणी खराब होऊन जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.हे पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही.हे कमी की काय कोपरगाव शहर त्याला अपवाद नाही याठिकाणी तर सांडपाणी जाऊद्या थेट गोवंश हत्या करून त्याचे पाट थेट गोदावरी नदीत सोडले जात आहे.परिणामी नगराध्यक्षपदी विजय वहाडणे आणि सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव आदींनी त्याकाळात आवाज उठवला होता.

“नदी संरक्षक भिंत,बोटिंग सुविधा,जॉगिंग ट्रॅक,लेझर शो,धार्मिक आणि ऐतिहासिक माहितीपट व सुशोभीकरण यासाठी आम्ही भूमिका घेतलेली असून त्या दृष्टीने काम सुरू केले आहे.आमचे सहकारी आणि आम्ही अनेकदा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सहभागी असतो”-पराग संधान,उमेदवार,भाजप कोल्हे गट.
दरम्यान नदी पात्रात दहा वर्षापूर्वी मृत मासे आढळून आले होते.जायकवाडी धरणातील पाणी जल प्रदूषण महामंडळाने पिण्यायोग्य नाही असे यापूर्वीच जाहिर केलेलं आहे.यातूनच बोध घेत आदिनाथ ढाकणे या तरुणाने यावर लक्ष वेध घेऊन गेली आठ दहा वर्षापूर्वी यावर काम सूरु केले असून जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे.नदी किती स्वच्छ झाली या पेक्षा ही ही जनतेची चळवळ आहे.आणि ही जर राबवली नाही तर उद्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे ही जाणीव त्यांनी जनतेपुढे आणली हेही नसे थोडके असो !

“युवा नेते विवेक कोल्हे आणि त्यांचे सर्व सहकारी नदी स्वच्छता मोहिमेत सोबत आल्याने मोठे काम होईल.त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी आणि अभ्यास यातून हा गोदातीर सुशोभित करण्यात येईल हा विश्वास आहे”- आदिनाथ ढाकणे, गोदासेवक,कोपरगाव.
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना बराच मोकळा वेळ निर्माण करून दिला असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही या कारणावरून त्यांना जास्तीची संधी मिळाली आहे.मात्र पहिल्या नव्या दमाच्या संघटना आणि पुढाऱ्यांनी जनसंपर्क साधून आपले काम साधले आहे.मात्र मुदत वाढ मिळाल्याने किती वेळा मतदारांना वैतागून सोडायचे असा साळसूद प्रश्न त्यांना निर्माण झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातून हा उपक्रम जन्माला आला असल्याचे दिसून येत असून त्यातून एक सामाजिक कार्य जनतेपुढे आणले व शपथ घेतली (पुढाऱ्यांचा खरे तर शपथेवर विश्वास नसतो) हेही नसे थोडके.
दरम्यान संपन्न होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजप कोल्हे गटाने आपला विश्वासनामा जाहीर केला असून त्या प्रमाणे आपण काम सुरू केले असल्याचा दावा केला आहे.सदर प्रसंगी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,नगराध्यक्ष पदाचे उपमेदावर पराग संधान,गोदावरी सेवक आदिनाथ ढाकणे आदीसह भाजपचे उमेदवार वैभव आढाव,वैभव गिरमे,जितेंद्र रणशूर,मयूर गायकवाड,कलविंदर दडीयाल,संतोष शिंदे,सनी वाघ,संजय उदावंत,राहुल खरात,अनिल आव्हाड,दत्तू पगारे,दिपक जपे,निलेश बोराडे,पैलवान,कैलास सोमासे,रोहित कनगरे,अभिषेक मंजुळ,ऋषिकेश गायकवाड,सतीश चव्हाण,गौतम रणशूर,राहुल रणशूर, शाहरुख शेख,आकाश डोखे,कैलास सोनवणे,आप्पा नवले,सोमनाथ पाटील,संदेश शेजवळ,जनार्दन सुपेकर,प्रज्वल ढाकणे,रोहन दरपेल आदीसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



