निवडणूक
पायावरील धोंडा…!

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजप नगराध्यक्षपदाचे आ.आशुतोष काळे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे व त्यांचे अन्य ३० नगरसेवक पदाचे उमेदवार यांना अपात्र ठरविण्याबाबत अपयश आल्यावर आज शहरात लक्षवेधी घडामोडी घडून आल्या असून त्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने अपक्ष उमेदवार दिपक वाजे यांची तलवार म्यान केली असून त्या बदल्यात शिवसेनेचे उमेदवार माजी नगरसेवक अतुल काले यांना माघार घेण्यावर शिक्का मोर्तब झाले असून त्या बदल्यात त्या प्रभागात दिपक वाजे यांचे बंधू आकाश वाजे यांना भाजप आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची घोषणा विवेक कोल्हे यांनी केली आहे.त्यामुळे भाजप नेमके काय करत आहे.याचे न उलगडणारे कोडे निर्माण झाले असून निष्ठावांनाना डावलून उठवळांना पक्षात घेऊन भाजप हा स्वतःच्या पायावर धोंडा तर पाडून घेत नाही ना ! याबाबत शहरात आणि तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

मागील वर्षी संपन्न झालेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत राज्यात चर्चिला गेलेला आणि झालेला मानहानीकारक पराभव मंत्री विखे हे एवढ्यात विसरले असतील असे मानणे भाबडेपणा ठरेल.शिवाय माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर समोर आपल्या युवराजाचे शहा यांच्या सभेचे केलेले कोडकौतुक आणि विखेंना खिजवण्याचा केलेला प्रयत्न ते लवकर विसरतील असे शक्यता मुळीच दिसत नाही.त्यातून ते कोणती खेळी खेळणार हे दिसत नसले तर त्यातून कोल्हे आणि कंपनीचे नुकसान होण्याची शक्यताच अधिक आहे.
राज्यात एकूण २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.तर उमेदवारी मागे घेण्याची २१ नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती.तर ०३ डिसेंबर रोजी मतदानाचे निकाल जाहीर होणार आहे.त्यामुळे राज्यातील मतदारांचे या तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे.कोपरगाव नगरपरिषद हद्दीत बहुरंगी लढत होणार असल्याचे उघड झाले आहे.भाजप निष्ठावान गटाचे अपक्ष उमेदवार व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,वर्तमानात कोल्हे गटाचे उमेदवार पराग संधान,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे,शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार सपना मोरे,शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आदी तर उघड उघड एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेच पण अपक्ष उमेदवार दिपक वाजे यांची उमेदवारी भाजपला नडणार असल्याचे दिसू लागले होते.

राहाता येथील डॉ.राजेंद्र पिपाडा आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात विस्तव जात नसताना जर मुख्यमंत्री समेट घडून आणू शकले होते तर ते कोपरगावात तसे का करू शकले नाही ? याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही.मात्र काल संपन्न झालेल्या सभेत मात्र कोणा बाष्कळ उमेदवारांना (म्हणजेच विजय वहाडणे असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता) निवडणून देऊ नका असे आवाहन त्यांना मतदारांना करावे लागले होते.याचा अर्थ त्यांना अटीतटीच्या निवडणुकीची जाणीव आहे.
दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीसारखा थोड्या मतांसाठी फटका बसायला नको याची खबरदारी घेतली जात होती.मात्र आ.काळे गटाने अर्ज माघारी घेण्याचे दिवशी बैल बाजार रोडवरील वाजे यांच्या कार्यालयात कोल्हे गटाचे सगळे मुसळ केरात घातले होते.त्यामुळे उमेदवारी बाबत मोठा खल करण्यात आला होता.परिणामी युवराजास आपल्या चपला सोडून पळ करण्याची नामुष्की ओढवली होती.मात्र काल मुख्यमंत्री फडणवीस यांचे समोर विखेंनी माजी आ.कोल्हे आणि परिवाराला सज्जड दम भरल्यावर ते जागेवर आले असे दिसून येत आहे.त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री विखे आणि माजी आ.कोल्हे यांची कालची मोट ही विळ्याभोपळ्याची असल्याचे मानण्यास जागा निर्माण होत आहे.त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी भूमिका निभावली असल्याचे समजत आहे.परिणामी सगळा तमाशा संपन्न झाल्यानंतर त्यातून मंत्री विखे यांचे मदत घेण्याचे ठरवले असल्याचे समोर आले आहे.मात्र मागील वर्षी संपन्न झालेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत राज्यात चर्चिला गेलेला आणि झालेला मानहानीकारक पराभव मंत्री विखे हे एवढ्यात विसरले असतील असे मानणे भाबडेपणा ठरेल.शिवाय माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर समोर आपल्या युवराजाचे शहा यांच्या सभेचे केलेले कोडकौतुक आणि विखेंना खिजवण्याचा केलेला प्रयत्न ते लवकर विसरतील असे शक्यता मुळीच दिसत नाही.त्यातून ते कोणती खेळी खेळणार हे दिसत नसले तर त्यातून कोल्हे आणि कंपनीचे नुकसान होण्याची शक्यताच अधिक आहे.वरवर पालकमंत्री विखे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर भाजपचे शिर्डीतील माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची मदत घेतली असल्याचे उघड होत असले तरी या ठिकाणी संशय घेण्यास जागा आहे.दिपक वाजे हे यांचे मेहुणे असल्याने ती मदत कामी आल्याचे बोलले जात आहे.श्रीरामपूर शहरात तर वाळूचोर आणि गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या उमदेवाऱ्या थेट जिल्हास्तरीय पोलिस अधिकाऱ्यांचा वापर करून मागे घेतल्या असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.कोपरगावात याबाबत अधिकृत माहिती हाती आली नाही मात्र पडद्यामागे अशीच काहीतरी गंभीर घटना उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र अद्याप शिंदे सेनेसह अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांचे मोठे आव्हान कोल्हे गटापुढे ठाकले असून भाजपचे निष्ठावान माजी नगराध्यक्ष वहाडणे हे अद्याप पाय रोवून व ठाण मांडून उभे आहे.ते कदाचित विजयी होणार नाही मात्र कोणाला तरी नक्कीच पाडणार आहे हे विसरता येणार नाही.यावेळची निवडणूक ही अटीतटीची होत असून तोळामासा मतांवर संपन्न होणार आहे.निवडणून येणारा उमेदवार तीन आकडी फार तर कडाकाठावर चार आकडी मतात निवडून येणार आहे.मागील वेळी याच वहाडणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा होऊनही राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या मतांत सलामी दिली होती.व त्यांना दाती तृण धरण्यास भाग पाडले होते.त्यानंतर भाजपला दोन पावले मागे जाऊन आपल्या पांचजन्य मासिकात विजय वहाडणे हे आमचेच उमेदवार असल्याची (गिरे तो भी टांग ऊपर या थाटात )द्वाही राज्यभर फिरवावी लागली होती.राहाता येथील डॉ.राजेंद्र पिपाडा आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात विस्तव जात नसताना जर मुख्यमंत्री समेट घडून आणू शकले होते तर ते कोपरगावात तसे का करू शकले नाही ? याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही.मात्र काल संपन्न झालेल्या सभेत मात्र कोणा बाष्कळ उमेदवारांना (म्हणजेच विजय वहाडणे असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता) निवडणून देऊ नका असे आवाहन त्यांना मतदारांना करावे लागले होते.याचा अर्थ त्यांना अटीतटीच्या निवडणुकीची जाणीव आहे असे उघड दिसत आहे.मात्र बहुमत आणि नगराध्यक्ष यांच्या पांचजन्य प्रमाणे जर भाजपचा होता.आणि राज्यात आणि देशात त्यांचे सरकार होते तर त्यांच्या विकासाचा वारू नेमका कोणी अडवला याचे उत्तर मात्र राज्यातील,जिल्ह्यातील आणि तालुक्यातीलभाजप धुरिणांना देता आले नाही.आज ‘ विश्वासनामा ‘ का जाहीर करावा लागत आहे.किंबहुना त्यांनी त्याबाबत गुपचिळी धरली आहे हे विशेष !

भाजप काँग्रेसी पुढाऱ्यांना ज्या प्रकारे पायघड्या घातल्या जात आहे यातून भाजपचे दुहेरी चारित्र्य उघड होत असून आपली विचारांची वीण उसविण्याचे काम करत आहे.ही कधीही न भरणारी हानी हा पक्ष करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहे.
भाजप आणि शिवसेना आदींनी आपल्या निष्ठावानं कार्यकर्त्यांना ज्या प्रकारे सोडून दिले आहे ते कृत्य नक्कीच निंदनीय असून अक्षम्य समजले जात आहे.किंबहुना देशात पुन्हा अशा चळवळी पुन्हा परत कधीही उभ्या राहणार नाही याचा बंदोबस्त भाजप करत असून अस्थिर उपऱ्याना ज्या प्रकारे पायघड्या घातल्या जात आहे.त्यातून भाजप आपले भविष्यात नुकसान करत असून आपला पाया ढिसाळ करत असल्याचे उघड होत आहे.भाजप काँग्रेसी पुढाऱ्यांना ज्या प्रकारे पायघड्या घातल्या जात आहे यातून भाजपचे दुहेरी चारित्र्य उघड होत असून आपली विचारांची वीण उसविण्याचे काम करत आहे.ही कधीही न भरणारी हानी हा पक्ष करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहे.



