जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगावात होणार राजकीय भूकंप !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   बहुचर्चित कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची यादी हाती आली असून नगराध्यक्ष मोहसीन महेमूद सय्यद,सुहासिनी ओमप्रकाश कोयटे आदी दोन उमेदवारांसह एकूण २६ जणांनी आपल्या तलवारी म्यान केल्या असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान तीन दिवसापूर्वी संपन्न झालेल्या छाननीत काही उमेदवारांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याने अनेक महारथी उमेदवार बाद होण्याची शक्यता वाढली असून त्यातून मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत मिळत आहे.

दरम्यान छाननीवर नाराज काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली असून यावर मोठे मंथन घडले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून लवकरच काही मोठ्या हस्ती त्यात बाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे कोपरगाव नगरीत खळबळ उडाली आहे.

   राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आपले नामनिर्देशन मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी बरेच जण आपल्या तलवारी म्यान करतील अशी अपेक्षा असताना ती फोल ठरलेली दिसत असून एकूण १० इच्छुक उमेदवारांपैकी केवळ दोघांनी आपले भात्यातील बाण पुन्हा भात्यात खोचले असून ही अध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बहुरंगी ठरली आहे.

  दरम्यान प्रभागातील अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले असून प्रभाग निहाय यादी पुढील प्रमाणे दर्शवली आहे.
आधी प्रभाग क्रमांक व पुढे आपले नामनिर्देशन पत्र मागे घेणाऱ्या उमेदवाराचे नाव दर्शवले असून ३ब नंदिनी जनार्दन कदम,२-अ बाबुराव सावळेराम पवार,५ अ माळी अक्षय बाळासाहेब,१४ अ ईश्वरे मच्छिंद्र सारंगधर,५ब मढवई मंदा निखील,१३ ब सय्यद शाईन शफिक,१३ अ सखाराम जयवंता धसे,१५ ब निलेश प्रभाकर पाखरे, १४ ब गंगुले मिराबाई शंकर,१४ ब उगले सरूबाई चंद्रकांत,१ब शेख निसार मन्सूर,१२ ब साठे सिध्दार्थ चंद्रकांत,८ ब समीना अन्सार मणियार खैरुनिसा,आदम शेख,खैरुनिसा आदम शेख,डहांके माणिक मोहन,८ ब देवडे गोरख भाऊसाहेब,८ अ मनीषा सुरेश सोनटक्के, १३ ब मनीषा संतोष दळवी, ८अ पगारे दिपाली योगेश,१४ अ प्रशांत सुनील मोरे,६ ब शुभम विनायक गायकवाड,१ब शुभम विनायक गायकवाड ,१३ ब सुरेखा विकी चव्हाण आदी उमेदवारांचा समावेश आहे.

   दरम्यान छाननीवर नाराज काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली असून यावर मोठे मंथन घडले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून लवकरच काही मोठ्या हस्ती त्यात बाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.किंबहुना कोपरगाव नगरपालिका निवडणूक पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगाव नगरपालिका हद्दीत मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान या बातमीने कोपरगाव शहरातील नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close