निवडणूक
पालिका निवडणुकीत बंडखोरांचा अहवाल वरिष्ठ नेत्यांना पाठवून कारवाई करणार -सेना जिल्हाध्यक्ष

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहराच्या नगरपरिषद निवडणुकीत अधिकृत उमेदवारी सपना भरत मोरे यांनाच दिलेली असून त्या कोपरगाव शहराला न्याय देतील.तसेच शहरातील बंडखोरांना रोखण्यासाठी आपण वरिष्ठ नेत्यांना आपण अहवाल देणार असून त्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा शिवसेना उबाठा गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सपना मोरे यावेळी बोलताना म्हणाल्या की,”आपण शहरातील धुळमुक्त रस्ते करणार असून गटारी,पिण्याचे पाणी,ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र,मोकाट जनावरांचा बंदोबस्त,करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.आजी माजी नेत्यांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.निष्ठावान आहे.त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे.
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची दिवसेंदिवस रंगत वाढत चालली असून ओमप्रकाश कोयटे यांनी आ.काळे गटात प्रवेश केल्याने शहरात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून काल झालेल्या घडामोडीत सपना भरत मोरे यांची (उबाठा) शिवसेनेकडून निश्चीत झाली असून त्यांनी आज कोपरगाव शहरात (उबाठा) सेनेचे नूतन जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत गगन हाडा यांचे कार्यालयात एक पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी त्या बोलत होत्या.

” माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांची नाराजी काढणार आहे.ज्यांनी नाराज होऊन राजीनामे दिले त्यांची समज काढून त्यांना पक्षात राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे”-सचिन कोते,जिल्हा प्रमुख शिवसेना.
सदर प्रसंगी शिवसेनेचे नूतन जिल्हा प्रमुख सचिन कोते,शिर्डीचे माजी शहर प्रमुख संजय शिंदे,कोपरगावचे शहर प्रमुख भरत मोरे,अस्लम शेख,युवा सेना शहर प्रमुख गगन हाडा,भूषण पाटणकर, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कोपरगाव तालुक्यातील दहशत संपवण्यासाठी आपण लढा सुरू ठेवला आहे.सेनेचा उमेदवार काय काम करू शकतो या पूर्वीचा नागरिकांना याचा अनुभव आहे.सेना,राष्ट्रवादी,काँग्रेस,मनसे,आर. पी.आय.आदी पक्षांची असलेल्या महाआघाडी मार्फत ही उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे सपना मोरे यांच्या कार्याची दखल घेऊन आपण शिवसेना या पक्षाचा ए.बी.फॉर्म देण्यास आलो असल्याचे शेवटी सांगितले आहे.
यावेळी पुढे बोलताना कोते म्हणाले की,” माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांची नाराजी काढणार आहे.ज्यांनी नाराज होऊन राजीनामे दिले त्यांची समज काढून त्यांना पक्षात राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी संजय शिंदे पक्षात कार्यकर्ते येतात जातात. ज्यांना जायचे आहे ते जाणार आहे.पण आमचा प्रयत्न राहणार आहे.बंडखोरांनी जर नाही ऐकले तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना थांबवणार आहे.बंडखोराबाबत कार्यवाहीबाबत आपण वरिष्ठ नेत्यांना अहवाल देऊन कार्यवाहीसाठी आग्रह धरणार आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविकभरत मोरे यांनी केले त्यावेळी बोलताना म्हणाले की,”सेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांस न्याय दिला आहे.त्याबद्दल त्यांनी खा.संजय राऊत,जिल्हा प्रमुख सचिन कोते,संजय शिंदे आदी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.आपण केलेल्या आंदोलनाची दखल वरिष्ठांनी घेतली आहे.आपण शहराचे प्रश्न वारंवार मांडले आहे.त्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.शेवटपर्यंत ते सोडणार आहे.आपण केवळ बोलत नाही,तर कृतीची जोड देतो.बाजारपेठेबाबत आपण सातत्याने भांडलो आहे.पक्षाने आपल्या आणि सपना मोरे यांच्या कार्याची दखल घेऊन ही उमेदवारी दिली आहे.जनतेला आम्ही सतत बारा तास उपलब्ध आहोत.त्यामुळे जनता नक्कीच आपल्याला मिळालेल्या उमेदवारीचे सोने करणार आहे.शहरात आम्ही पक्ष वाढवणार आहे.त्याला कोणीही रोखू शकत नाही.आमचे कार्य सगळ्यांना माहित आहे.शहरातील सडलेले कुजलेले प्रश्न आपण प्राधान्याने सोडवणार आहे.आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत.त्यासाठी जनतेने आम्हाला न्याय द्यावा असे आवाहन मोरे यांनी शेवटी केले आहे.
यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सपना मोरे यावेळी बोलताना म्हणाल्या की,”आपण शहरातील धुळमुक्त रस्ते करणार असून गटारी,पिण्याचे पाणी,ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र,मोकाट जनावरांचा बंदोबस्त,करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.आजी माजी नेत्यांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.निष्ठावान आहे.त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे.
सदर प्रसंगी सूत्रसंचालन गगन हाडा यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी शहर प्रमुख अस्लम शेख यांनी मानले आहे.



