निवडणूक
बेचाळीस कोटींची वितरण व्यवस्था कोठे आहे ?

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत मोठा गाजावाजा करून दिल्ली येथून मंजूर करून आणलेली 42 कोटी रुपयांची पाण्याची योजना पूर्णत्वास का गेली नाही आणि त्याची वितरण व्यवस्था का राबवली गेली नाही? शिवाय उच्च न्यायालयात जावून 28 कामे कोणी बंद केली होती ? असा तिखट सवाल युवा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी कोल्हे गटाच्या विवेक कोल्हे यांना जाहीर विचारला आहे.

“रांजणगाव देशमुख येथील एका कार्यक्रमात आ.आशुतोष काळे,संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,त्यांचे चिरंजीव कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,परजणे गटाचे संचालक आदी सर्व एका व्यासपिठावर येतात,बिनविरोध निवडणुका करतात;मग कोपरगाव नगरपरिषदा आणि ग्रामपंचायती यांच्या निवडणुका बिनविरोध का होत नाही ? असा सवाल केला असता त्यांनी हा प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्या अखत्यारीत असल्याची बतावणी करून वेळ मारून नेली आहे.
राज्यातील नगरपरिषदांची निवडणुकीसाठी 31 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.तर मतदानकेंद्र निहाय मतदार यादी 7 नोव्हेंबर 2025 ला जाहीर होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.31 जानेवारीच्या आत सर्व निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत.त्या दिशेनं निवडणूक आयोगाने प्रवास सुरू केला असून उद्या दि.१० नोव्हेंबर २०२५,अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे.त्याची अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर असून त्याची छाननीची तारीख-१८नोव्हेंबर असून ते माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर आहे.अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत-२५ नोव्हेंबर आहे.तर निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- २६ नोव्हेंबर रोजी दुपारी जाहीर होणार आहे.
तर माघार झाली नाही तर मतदानाचा दिवस-२ डिसेंबर मुक्रर करण्यात आला आहे.त्यामुळे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहे.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नाही.शिर्डी,राहाता,श्रीरामपूर,कोपरगाव,राहुरी,देवळाली प्रवरा,संगमनेर,अकोले आदी नगरपरिषदा म्हणजे मतदारांची दिवाळीनंतर दिवाळी असते.त्या आधी आरोप प्रत्यारोप यांचा शिमगा हमखास सुरू होतो.त्याची सुरुवात काल विवेक कोल्हे यांनी केली असून धुराळा उडवून दिला आहे.त्यानंतर आज अजित पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आज महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेन बोरवके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,शहर प्रमुख सुनील गंगुले.माजी नगरसेवक मेहमूद सय्यद,संतोष चवंडके,राजेंद्र वाकचौरे,फकीर कुरेशी,नवाज कुरेशी आदीसह बहुंसख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी त्यांनी पुढे बोलताना म्हंटले आहे की,’कोपरगाव नगरपरिषदेच्या विकास कामांना खोडा घालण्याचे मोठे काम विवेक कोल्हे आणि त्यांच्या समर्थकांनी केले आहे.पाच क्रमांकाच्या तलावाचे त्यासाठी मोठे उदाहरण देता येईल.त्यांनी ते काम होऊ नये यासाठी देव पाण्यात बुडवले होते.त्यांनी तलावातील माती समृध्दी महामार्गाचे ठेकेदार मोफत उचलून नेत असताना त्यास खोडा घातला होता.मात्र सन -2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाआघाडीचे सरकार आले आणि त्या ठिकाणी (शरद पवार नाव घेणे टाळले)आ.काळे यांनी ते काम सुरू केले होते.शहरात मंजूर 28 रस्त्यांचे काम या मंडळींनी बंद केले होते.त्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेऊन ते सुरू करण्याचे आदेश मिळवावे लागले होते.याचा एवढ्या लवकर त्यांना विसर पडला असेल असे वाटले नव्हते.यांनी स्विमिंग टँक बांधून त्या ठिकाणी डुकरे आणि गाढवांची लोळण्याची सोय केली आहे.यांचा प्रताप तो काय वर्णावा? राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानकाचे काम कसे झाले आहे.तर सर्व प्रवासी आणि नागरिकांना माहिती आहे.आजही त्या ठिकाणी उलटे काम केल्याने बस पश्चिम बाजूस लावाव्या लागतात.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.कामाची गुणवत्ता तर विचारू नका ? त्या ठिकाणी गावाची गाढवलोळी झाली आहे.यातील मलिदा कोणी खाल्ला याचा सर्वांना अंदाज आहे.प्रशासक काळात काम निकृष्ट झाली असल्याचा आरोप ते करत आहे.मात्र निचांकी दराने निविदा भरून ते निकृष्ट कामे कोणत्या ठेकेदारांनी केली त्याचा त्यांनी लेखाजोखा जाहिर केला असता तर त्यांचे दात त्याच्याच घशात जातील.त्यामुळे निवडणुका आल्या की त्यांना उमाळा दाटून येत असतो व ते आ.काळे यांचेवर आरोप करण्याची दुर्बुद्धी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी विरेन बोरावके यांनी आरोप करताना म्हंटले आहे आहे की,”खरं तर कामाचा माणूस म्हणून आ.आशुतोष काळे यांची मतदार संघाला ओळख आहे.त्यांनी जे काम करायला हवे होते.त्या बसस्थानकात आ.काळे यांनी युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी व्यापारी संकुल बांधून दिले आहे.अन्य पश्चिम व पूर्व बाजूस काम होणार असल्याची पृष्टी त्यांनी जोडली आहे.कोपरगाव शहरातील प्रशासकीय इमारती माजी आ.काळे व विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी उभारल्या आहेत.पोलिसांना राहायला जागा उरली नव्हती.इमारती जीर्ण झाल्या होत्या.तहसील इमारतीची तीच बाब आहे.पंचायत समिती इमारतीचा प्रश्न,अग्नी प्रतिबंधक पथकांच्या इमारतीचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे.चाळीस वर्षात कोल्हे यांनी जे दिले नाही ते आ.काळे यांनी पाच वर्षात कामे करून जनतेचे प्रश्न सोडवले असल्याचा दावा केला आहे.ऐत्याहासिक राघोबादादा वाड्याची दुरवस्था त्यांनी दूर केली आहे.विरोधक ज्या रस्त्यावरील खड्ड्यांचा उल्लेख करत आहे ते सततच्या पाच महिण्याच्या पावसाने झाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी यावेळी धुळगाव हे नाव कोपरगाव शहराला कोणामुळे मिळाले होते.याचा एवढ्या लवकर विसर कोल्हे कुटुंबांना पडेल असे वाटले नव्हते.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाच क्रमांकाच्या तलावाचे काम तुम्ही मार्गी का लावले नाही असा जाबसाल केला आहे.अजून ते काम काही अंशी अपूर्ण आहे.ते पूर्ण झाल्यावर नारीकाना रोज पाणी पुरवठा होऊ शकेल असा दावा त्यांनी केला आहे.दरम्यान कचऱ्याचा ठकेदाराला कोणी मारहाण केली असा सवाल विचारला आहे.बँकेतून पैसे काढताना कोणी प्रताप केला याची उजळणी त्यांनी केली आहे.त्याचे चलचीत्रण त्यावेळी प्रसिध्दी झाले होते याची आठवण करून दिली आहे.
दरम्यान मंदार पहाडे यांनी यावेळी सव्वा कोटींचा साई पालखी रस्ता निकृष्ट कोणी केला असा आरोप केला आहे.स्विमिंग टँक कोठे हरवला आहे असा आरोप केला आहे.व तो कोणासाठी बांधला होता याचे विस्मरण ईशान्य गडावरील युवा नेत्याला बहुधा झाले असल्याचा आरोप केला आहे.कोल्हे गटाच्या काळात त्यावेळी 23 दिवसांची शहरातील नागरिकांना पाणी मिळत होते.ही मंडळी कशी विसरली आहे.शहराला स्वतःचे बॅनर लावून टँकरने पाणी कोणी पुरवले होते याची आठवण त्यांनी करून दिली आहे.यांची गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता होती मग त्यांनी शहराला रोज पाणी का दिले नाही? चाळीस वर्षे राजकारण केले सत्ता त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी पिण्याचे पाणी का दिले नाही असा खास सवाल केला आहे.त्यामुळे त्यांनी बिनबुडाचे आरोप करण्याचे आता तरी थांबावे व स्वतःचे हसू करून घेऊ नये असा सबुरीचा सल्ला शेवटी दिला आहे.
दरम्यान यावेळी आमच्या प्रतिनिधीने रांजणगाव देशमुख येथील एका कार्यक्रमात आ.आशुतोष काळे,संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,त्यांचे चिरंजीव कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,परजणे गटाचे संचालक आदी सर्व एका व्यासपिठावर येतात,बिनविरोध निवडणुका करतात;मग कोपरगाव नगरपरिषदा आणि ग्रामपंचायती यांच्या निवडणुका बिनविरोध का होत नाही ? असा सवाल केला असता त्यांनी हा प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्या अखत्यारीत असल्याची बतावणी करून वेळ मारून नेली आहे.



