जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

आले तर सोबत घेऊ; न आले तर स्वतंत्र उमेदवार देणार -…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरात महाआघाडीला विधानसभेला ११ हजार मते मिळाली असून आम्हाला नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे.शहरात जवळपास पाच उमेदवार उभे राहणार असून बहुरंगी लढत होणार आहे.आम्ही आघाडी म्हणून एकत्र लढण्याचे ठरवले आहे.पण शिवसेना आणि मित्र पक्षांनी नकार दिला तर आम्ही स्वतंत्र लढण्यास मुळीच मागेपुढे पाहणार नसल्याचे प्रतिपादन शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

मनोगत व्यक्त करताना संदिप वर्पे दिसत आहे.
  "कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेते निवडणुकात मतदारांना सातत्याने फसवत असून आपल्याला या बाबतीत ३५ वर्षे अनुभव आहे.त्यामुळे या फसवणुकीबाबत तरुणांनी सावध राहून प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्यावी"-ॲड.दिलीप लासुरे,कोपरगाव.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,’आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.निवडणुकीचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही हे खरे आहे.तरीही इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली असून आपले घोडे,नाल,मेख,तंग तोबरा गाठीला आणला असून आपल्या लाडक्या मतदार आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू करून दौरे आखण्यास सुरूवात केली आहे.महायुती किंवा महाविकास आघाडी होणार की नाही याची वाट न पाहाता इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.त्यातच निवडणूका नेमक्या कधी जाहीर होणार आणि कधी मतदान होणार हे लवकरच समजणार आहे.या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी (शरद पवार ) गटाची पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

  सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब रांधवणे,ॲड.दिलीप लासुरे,ॲड.रमेश गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आम्ही राष्ट्रवादीचे संस्थापक खा.शरद पवार यांचा विचार घेऊन लढणार आहे.महाविकास आघाडी करणार आहे.त्यात यश आले नाही तर लवकरच आमचा स्वतंत्र उमेदवार उभा करणार आहे.शहरात जवळपास पाच उमेदवार उभे राहणार असून बहुरंगी लढत होणार असल्याचे भाकीत त्यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची अद्याप पुरेशी मदत मिळालेली नाही.कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टर ही तोकडी मदत मिळाली आहे.राज्यातील शेतकऱ्यांना ३८ हजार कोटींची राज्याला मदत अत्यंत तोकडी  मिळाली आहे.आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आणि वेदनेला प्रश्नाला वाचा फोडायची आहे.त्याला नक्की यश मिळेल आहे.महायुती सरकारने एक पाप करून ठेवले आहे.पाच वर्षाची निवडणूक १० वर्षावर नेऊन ठेवली आहे.शहर आणि तालुक्यातील तरुणांना त्यामुळे संधी डावलली गेली आहे.त्यामुळे त्यांच्यात संताप आहे.त्याचे पडसाद आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थात दिसून येणार आहे.

   यावेळी ॲड.दिलीप लासुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.त्यावेळी त्यांनी कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेते निवडणुकात मतदारांना सातत्याने फसवत असून आपल्याला या बाबतीत ३५ वर्षे अनुभव आहे.त्यामुळे या फसवणुकीबाबत तरुणांनी सावध रहावे असे आवाहन केले आहे.त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या वयाबाबत टिपणी केल्याने काहीनी ते अंगावर घेतले असल्याचे दिसून आले परिणामी जागेवर मतभेद निर्माण झाले.त्यांच्या बोलण्याला काहीनी आक्षेप घेतला त्यास संदिप वर्पे यांनी हस्तक्षेप आणि दिलगिरी व्यक्त करून वातावरण सुरळीत करून कार्यक्रम आटोपता घेतला आहे.शेवटी ॲड. लासुरे यांनी दिलगिरी व्यक्त केली असून निवडणुकांत माध्यमांनी मदत करावी असे शेवटी आवाहन केले आहे.

  सदर प्रसंगी प्रास्ताविक वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.रमेश गव्हाणे यांनी केले आहे.तर आभार सुनील वर्पे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close