जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगावात मांजर..मांजराच्या आणि उंदीर उंदराच्या डावात…!

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव नगरपरिषदेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्या दृष्टीने अनेकांनी इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखती दोन टप्प्यात घेतल्या असून हुकूमाचे नगराध्यक्ष पदाचे पत्ते मात्र खुले केलेले नाही.मात्र कोपरगाव शहरात ईशान्यगड आणि पश्चिमगड मात्र ही आपली पारंपरिक मते विरोधात जाऊ नये यासाठी काळजी घेताना दिसत असून ते इतर मागास प्रवर्गाला उमेदवारी देतील असा मोठा कयास व्यक्त होत आहे.

आगामी नगरपरिषद निवडणुकीत आ.आशुतोष काळे आणि माजी आ.स्नेहलता कोल्हे आदी नेते आपली विधानसभेच्या मतदारांची तिजोरी सांभाळण्यासाठी लुटुपुटूची लढाई करणार हे ओघाने आलेच.मात्र अध्यक्षास ओबीसी आरक्षण असल्याने ज्यांच्या बळावर आपली मतांची तिजोरी सांभाळत आहे.त्यांना दुखावण्याचे धाडस ते जाणीवपूर्वक दाखवणार नाही.परिणामी पराग संधान यांचे नाव आपोआप मागे पडणार हे ओघाने आलेच.तर याआधीच आमच्या प्रतिनिधीने लिहिल्याप्रमाणे वैभव गिरमे यांचे नाव आघाडीवर असणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,’आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.निवडणुकीचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही हे खरे आहे.तरीही इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली असून आपले घोडे,नाल,मेख,तंग तोबरा गाठीला आणला असून आपल्या लाडक्या मतदार आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू करून दौरे आखण्यास सुरूवात केली आहे.महायुती किंवा महाविकास आघाडी होणार की नाही याची वाट न पाहाता इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.त्यातच निवडणूका नेमक्या कधी जाहीर होणार आणि कधी मतदान होणार याची तारखी माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. दिलीप वळसे यांनी जाहीर केली आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,”०५ नोव्हेंबरला राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील असा अंदाज वर्तवला आज आहे.०५ नोव्हेंबरला बुधवार आहे म्हणजे त्याच दिवसापासून आचारसंहिता देखील लागू होईल असे दिसत आहे.प्रथम नगर परिषदेच्या निवडणुका पार पाडतील,असे दिसून येत आहे.या निवडणुका सुरू असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होईल.महायुतीत स्वबळाचा नारा
महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार की महायुतीत याचे गुऱ्हाळ सुरू आहे.मुंबई महापालिकेसाठी महायुती होईल आणि इतरत्र महायुतीमधील पक्ष स्वतंत्र लढतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांची ही ताकद आहे.जर येथे युती केली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीतील पक्ष घेतील.त्यामुळे तेथे आम्ही स्वतंत्र लढू असे सांगितले असल्याने आगामी चित्र उघड होऊ लागले आहे.स्थानिक समीकरणानुसार युती करायची की नाही याचा निर्णय महायुतीमधील स्थानिक पातळीवरचे नेते घेणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने कोपरगाव शहरात याचे पडसाद उमटणार हे ओघाने आलेच.

दरम्यान आ.आशुतोष काळे गटाकडून स्वतः इच्छुक नसले तरी माजी नगरसेवक दिनार कुदळे ही आ.काळे यांची पहिली पसंदी राहणार आहे.मात्र त्यांचा मितभाषी आणि कोणालाही न दुखण्याचा  स्वभाव आणि राजकारणाबाबत त्यांना असलेला मोठा तिटकारा त्यांना यात पडण्यास भाग पाडील असे म्हणण्याचे धाडस कोणीही करणार नाही.परिणामी काळे गटाचे विश्वासू कार्यकर्ते मंदार पहाडे यांच्या मातोश्री यात आघाडी मारण्याची शक्यता जास्त वाटत आहे.


   कोपरगाव शहरातील पारंपरिक विरोधक (?) आ.आशुतोष काळे आणि माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्यात आपले विधानसभेच्या मतदारांची तिजोरी सांभाळण्यासाठी लुटुपुटूची लढाई करणार हे ओघाने आलेच.मात्र ते ओबीसी आरक्षण असल्याने ज्यांच्या बळावर आपली मतांची तिजोरी सांभाळत आहे.त्यांना दुखावण्याचे धाडस ते जाणीवपूर्वक दाखवणार नाही.परिणामी पराग संधान यांचे नाव आपोआप मागे पडणार हे ओघाने आलेच.तर याआधीच आमच्या प्रतिनिधीने लिहिल्याप्रमाणे वैभव गिरमे यांचे नाव आघाडीवर असणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.यात त्यांचा अजातशत्रू असलेला स्वभाव आणि भ्रष्टाचाराबाबत त्यांनी जाणीवपूर्वक राखलेले अंतर हे दोन गुण त्यांची उमेदवारी लीलया तारुण नेणार असून ते मोठी भूमिका निभावणार आहे.कोल्हे गटात अन्य पायलीचे पन्नास उमेदवार असले आणि काही पायाला भिंगरी लावून प्रचार सुरू केला असला तरी मतदारांना खेचून आणण्याची ताकद कोणातही नाही.कोल्हे गटाकडे स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार एका हाताच्या बोटावर मोजावे इतकेही नाही.नव्हे त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचे खच्चीकरण केले असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.ज्या वैभव आढाव यांचे नाव घ्यावे असे नाव असले तरी त्यांना भाजपचे शहर प्रमुखपद देऊन त्यांना त्यांच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक आधीच  पदाच्या बेड्यात अडकून टाकले आहे.तर दुसरीकडे विजय आढाव हे मागील निवडणुकीत काळे गटाचे उमेदवार असले तरी त्यांना वर्तमानात विखे गटाशी असलेले सख्य त्यांना अडचणीचे ठरणार हे उघड आहे.परिणामी कोल्हे गट त्यांना न बोलता सापत्नपणाची वागणूक देणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.मात्र ते अन्य पर्यायाचा विचार करणार का? हा या निवडणुकीत औत्सुक्याचा विषय राहणार आहे.

शिवसेना उबाठा गट माजी शहर प्रमुख राजेंद्र झावरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.त्यांना विद्यमान शिर्डी लोकसभेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे समर्थन मिळू शकते.परिणामी त्यांचे पारडे जड राहणार हे उघड आहे.याच गटात माजी शहर प्रमुख भरत मोरे इच्छुक असले तरी त्यांनी मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत दाखवलेल्या लीला त्यांना अडचणीत आणणार हे दिसत आहे.या पूर्वी शहर प्रमुख असताना झालेल्या चुका त्यांचे मानांकन घटवत असल्याचे दिसून येत आहे.


    दरम्यान आ.आशुतोष काळे गटाकडून स्वतः इच्छुक नसले तरी माजी नगरसेवक दिनार कुदळे ही आ.काळे यांची पहिली पसंदी राहणार आहे.मात्र त्यांचा मितभाषी आणि कोणालाही न दुखण्याचा  स्वभाव आणि राजकारणाबाबत त्यांना असलेला मोठा तिटकारा त्यांना यात पडण्यास भाग पाडील असे म्हणण्याचे धाडस कोणीही करणार नाही.परिणामी काळे गटाचे विश्वासू कार्यकर्ते मंदार पहाडे यांच्या मातोश्री यात आघाडी मारण्याची शक्यता जास्त वाटत आहे.त्या खालोखाल मागील निवडणुकीनंतर गटनेत्याची भूमिका निभावलेले वीरेन बोरावके यांना दुसरी पसंती नेत्यांची असू शकते.आणखी त्यांचेकडे अजित पवार राष्ट्रवादीचे शहर प्रमुख सुनील गंगुले इच्छुक असले तरी त्यांना जनमानसात किती स्थान आहे हा संशोधनाचा विषय आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे,”भाजपच्या जुन्या आणि सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत स्थान देणार” असे त्यांनी जाहीर केल्याने माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे आपोआप उचलले जाणार हे अन्य कोणी सांगण्याची आवश्यकता नाही.पण मूळ भाजप आणि शिवसेना यांना गेली दोन दशके काळे आणि कोल्हे यांचा चुकीचा संग झाल्याने व त्यांच्या वळचणीला जाऊन बऱ्याच कार्यकर्त्यांना काळे -कोल्हेंची वाळवी लागली आहे याचे भान ठेवावे लागणार आहे.

   शिवसेना उबाठा गट माजी शहर प्रमुख राजेंद्र झावरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.त्यांना विद्यमान शिर्डी लोकसभेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे समर्थन मिळू शकते.परिणामी त्यांचे पारडे जड राहणार हे उघड आहे.याच गटात माजी शहर प्रमुख भरत मोरे इच्छुक असले तरी त्यांनी मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत दाखवलेल्या लीला त्यांना अडचणीत आणणार हे दिसत आहे.या पूर्वी शहर प्रमुख असताना झालेल्या चुका त्यांचे मानांकन घटवत असल्याचे दिसून येत आहे.मात्र उबाठाचे स्थानिक नेते पक्षांतर्गत अडचणी लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे हे लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समर्थन मिळवतील आणि महाआघाडीचे उमेदवार बनतील असे चित्र आहे. तर भाजपचे निष्ठावान माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे या निवडणुकीत इरादे बुलंद असल्याचे दिसून येत आहे.यावेळी मागील निवडणुकीत नगरसेवक पदाचे उमेदवार न देण्याची चूक ते कटाक्षाने टाळणार हे उघड आहे.त्याबाबत प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे.त्यांना मागून येऊन तिखट झालेला आ.कोल्हे गट सामावून घेण्याची शक्यता कमी दिसत आहे.पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे,”भाजपच्या जुन्या आणि सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत स्थान देणार” असे त्यांनी जाहीर केल्याने माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे आपोआप उचलले जाणार हे अन्य कोणी सांगण्याची आवश्यकता नाही.पण मूळ भाजप आणि शिवसेना यांना गेली दोन दशके काळे आणि कोल्हे यांचा चुकीचा संग झाल्याने व त्यांच्या वळचणीला जाऊन बऱ्याच कार्यकर्त्यांना काळे -कोल्हेंची वाळवी लागली आहे याचे भान ठेवावे लागणार आहे.कारण बऱ्याच वेळेला कार्यकर्त्यांचे धड एका पक्षात आणि (अर्थकारणाने) मन दुसऱ्या पक्षात अशी स्थिती अनेक वेळा होते आणि तसे या पूर्वी घडले आहे.आणि हेच मर्मस्थान त्यांना म्हणजे काळे-कोल्हे यांना चांगलेच ठावूक असल्याने या दोन्ही गटांना सावध राहून आपला निशाणा साधावा लागणार आहे.तरच हाती काही येऊ शकते अन्यथा हाती धुपाटणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.वहाडणे आणि झावरे हे दोन्ही गट आणि स्थानिक नेते एकत्र आले तर त्यांना यश हमखास आहे.मात्र त्यांच्यात होणारी ताटातूट त्यांना धोक्याच्या पातळीवर घेऊन जाऊ शकते हे येथे विसरता येणार नाही.मात्र दोन्ही गट आता या स्थितीत मांजर मांजराच्या आणि उंदीर उंदराच्या डावात असल्याने आगामी काळच त्यांचे भवितव्य ठरवणार असल्याचे दिसत आहे.त्याचा गैरफायदा काळे-कोल्हे कसे उचलणार याच गोष्टीवर पुढील राजकारणाचे आडाखे ठरणार आहे हे सुद्न्यास सांगणे न लगे!

                   ————————–

*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close