निवडणूक
…या वकील संघाची निवडणूक जाहीर !

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव येथील जिल्हा व प्रथम वर्ग न्यायालयात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या कोपरगांव वकील संघाची निवडणूक जाहीर झाली असून आज आपले नामनिर्देशन भरण्याची अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी ०६,उपाध्यक्ष,महिला उपाध्यक्ष व सचिव,सहसचिव पदासाठी प्रत्येकी ०१ तर खजिनदार पदासाठी ०२ अर्ज आले असून ही निवडणूक दि.१९ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ०४ पर्यंत संपन्न होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी ॲड.अशोकराव वहाडणें यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

कोपरगाव वकील संघाच्या उपाध्यक्ष पदासाठी ॲड.एस.एम.भिडे यांचा तर सचिव पदासाठी परेश श्रीराम डागा,सहसचिव पदासाठी महेंद्र आर.जाधव महिला उपाध्यक्ष पदासाठी सविता निवृत्ती कदम यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे.त्याची अधिकृत घोषणा माघारीच्या १४ जुलै या माघारीच्या दिवशी होणार आहे.
कोपरगाव वकील संघाची ही निवडणूक वर्ष २०२५-२०२६ करीता संपन्न होत असून निवडणुक कार्यकम अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,सहसचिव,खजिनदार व महिला उपाध्यक्ष या पदांकरीता संपन्न होत आहे.तो निवडणुक दि.३० जून रोजी जाहीर झाली आहे तर मतदान शनिवार दि.१९ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे.

दरम्यान उमेदवारी अर्जाची विकी ०७ जुलै पासून सुरू होती.अर्ज स्वीकृतीची आणि दुपारी छाननीची अंतिम तारीख आज अखेर होती.आज ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यात सर्व अर्ज पात्र ठरविण्यात आले आहे.

दरम्यान आज आलेल्या अध्यक्षपदासाठी ०६ अर्ज आले असून यात आघाडीवर जी.जी.गुरसळ,एस.एम.गुजर,आर.जे.शेख (अत्तार), सी.एम.वाबळे,पी.एस.चांदगुडे आणि महिला उमेदवार आर.के.भोंगळे आदी सहा जण रणांगणात उतरले आहेत.
दरम्यान आज आलेल्या अध्यक्षपदासाठी ०६ अर्ज आले असून यात आघाडीवर जी.जी.गुरसळ,एस.एम.गुजर,आर.जे.शेख (अत्तार), सी.एम.वाबळे,पी.एस.चांदगुडे आणि महिला उमेदवार आर.के.भोंगळे आदी सहा जण रणांगणात उतरले आहेत.
तर उपाध्यक्ष पदासाठी ॲड.एस.एम.भिडे यांचा तर सचिव पदासाठी परेश श्रीराम डागा,सहसचिव पदासाठी महेंद्र आर.जाधव महिला उपाध्यक्ष पदासाठी सविता निवृत्ती कदम यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे.त्याची अधिकृत घोषणा माघारीच्या १४ जुलै या माघारीच्या दिवशी होणार आहे.तर खजिनदार पदासाठी दोन अर्ज असून
त्यात एन.पी.गिरमे व जी.जी.सुरभैय्या यांची नावे आहेत.त्यामुळे खऱ्या अर्थाने आता अध्यक्ष आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक होणार की बाकी उमेदवार आपल्या तलवारी म्यान करणार हे आगामी १४ जुलै रोजी दुपारी समजणार आहे.त्यामुळे
आता सर्व सदस्यांचे लक्ष अर्ज माघारीच्या
१४ जुलैच्या तारखेकडे लागले आहे.
मेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीत ठरलेल्या पात्र पदाधिकारी यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान यात इच्छुकांनी माघार घेतली नाही तर मतदान दिनांक १९ जुलै २०२५ रोजी वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.
दरम्यान कोपरगाव वकील संघाच्या दिनांक ३० जून २०२५ रोजी मंजुर झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मजुर झालेल्या ठरावानुसार ज्या सदस्यांनी त्यांचेकडील असलेली वकील संघाची व लायब्ररीची संपुर्ण फि दिनांक १४ जून २०२५ रोजी अगर तत्पुर्वी भरली असेल त्याच सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विधान अध्यक्ष ॲड.अशोकराव वहाडणे,सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.राहुल चव्हाण,ॲड.प्रताप निंबाळकर, ॲड.सौ.एस.आर.मैले,ॲड.आर.सी.गव्हाणे आदी मान्यवर काम पहात आहेत. कोपरगाव राहाता वकील संघाचे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.
मो.9423 43 9946.