जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव मतदार संघात होणार…यांच्या विजयाचा गुलाल ?

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान आज बुधवार दि.२० नोव्हेंबर पार पडल्यानंतर लगेचच एक्झिट पोल्सचे अंदाज यायला सुरुवात झाली.जवळपास सर्वच पोल्सनी महायुतीची सत्ता पुन्हा येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला.महाविकास आघाडीही बहुमतापासून किंचित लांब असल्याचे दिसत आहे.त्यामुळे प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरच निकालाचे खरे चित्र समजू शकेल.असे असले तरी कोपरगाव विधानसभा मतदार संघात नेमके काय होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून असले तरी या ठिकाणी पुन्हा एकदा धाकट्या पवारांचे उमेदवार आशुतोष काळे हे जास्त नाही पण ३०-४० हजारांचे मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज आहे.
          

संदीप वपें यांचे विजयाचे चित्र रंगण्यास सरकारी नोकरदार वर्ग,मुस्लिम,दलीत,आणि शिवसेनेच्या मतांनी चांगलाच रंग भरला होता.त्यामुळे त्यांची शक्यता वाढली होती.ती मते मात्र कोल्हे आणि हिंदुत्ववादी गटाने जिरवली असल्याचे दिसून आले आहे.

                  
   महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली होती राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान संपन्न झाले आहे.या निवडणुकीत ४,१३६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.१५८ राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते.या उमेदवारांच्या यादीत २,०८६ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे निवडणुकीची मतमोजणी ही शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होणार असून त्या दिवशी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार की महाविकास आघाडी सत्तेत येणार,हे स्पष्ट होणार आहे.दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने ही निवडणूक अधिकच महत्त्वाची ठरली आहे.त्यात कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.त्यात महायुती कडून धाकट्या पवारांचे उमेदवार आशुतोष काळे हे रिंगणात होते तर त्यांचा हातास हाथ थोरल्या पवारांचे निष्ठावान सहकारी व नवखे असलेले उमेदवार संदीप वपें दिला होता.आशुतोष काळे यांचे सोबत भाजपच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे,भाजपचे निष्ठावान सहकारी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राजेंद्र जाधव,शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे आदी दिग्गज मंडळी होती.त्यामुळे आधी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक नंतर रंगत वाढवत गेली असल्याचे दिसून आले आहे.आज मतदान झाले आहे.कोपरगाव मतदार संघात पाच वाजे पर्यंत ६५.८ टक्के मतदान झाले होते.तर आज वेळ संपली तेंव्हा जवळपास ७० टक्के मतदान होईल असा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे.अजून एकूण टक्केवारीची गणती होण्यास किमान दोन तास (म्हणजे रात्रीचे १२ वाजणार आहे) लागणार आहे.त्यामुळे खरी आकडेवारी उपलब्ध होईल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या निवडणुकीत देर्डे-चांदवड येथील ज्येष्ठ महिला लक्ष्मीबाई नारायणराव मेहेत्रे (वय-१०१) यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

दरम्यान या एकूण निवडणुकीत शिवसेना (उबाठा) संपूर्ण एकमताने एकत्र आली ही समाधानाची बाब असून आगामी काळात नगरपरिषद आणि जिल्हा परिषद,पंचायत समिती आदी निवडणुका संपन्न होणार असल्याने त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे दिसून येत आहे.या निवडणुकीत संदीप वर्पे,संजय काळे यांची एकाकी लढत स्मरणात राहणार असल्याचे बोलले जात आहे.

   दरम्यान आमच्या प्रतिनिधी तालुक्यातील अंदाज घेतला असता आ.आशुतोष काळे यांना पश्चिम भाग,सुरेगाव,ब्राम्हण गाव गट अधिक चालले असून त्या पाठोपाठ पूर्व भाग बरा चालला आहे.तर कोपरगाव शहर त्यांना मुस्लिम एकतर्फी तर अन्य संमिश्र मतदान होऊन त्या ठिकाणी साधारण दहा हजारांचे मताधिक्य राहील असा अंदाज आहे.अन्य पूर्व आणि पश्चिम भागात त्यांचे मताधिक्य अधिक वाढून त्यात भार पडणार आहे.शिंगणापूर,संवत्सर,येसगाव,सांगवी भुसार, कोकामठाण आदी ठिकाणी या मताधिक्क्यात अधिकची भर पडणार आहे.त्यामुळे ते चाळीस ते पन्नास हजारापर्यंत वाढणार आहे.मात्र पुणतांबा आणि पोहेगाव आणि रांजणगाव देशमुख गटात आ.काळे यांचे मताधिक्य हे मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून संदीप वर्षे यांना मोठ्या प्रमाणात वाढणार असून एकूण मतदानात आशुतोष काळे हे ३०-४० हजारांचे मताधिक्य घेतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान आ.आशुतोष काळे यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे त्याचे छायाचीत्र

   दरम्यान हे मताधिक्य वाढले नसते मात्र दोन दिवसात संदीप वपें यांचे मताधिक्य घटण्यास काही घटना कारणीभूत घडल्या असून त्यात ‘व्होट जिहाद’ आणि मुस्लिम मौलाना यांच्या महाआघाडीने सतरा मागण्या मंजुर केल्याच्या बातम्या टी. व्ही.वाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्या आहे.परिणामी हिंदुत्ववादी संघटनांचे पित्त खवळले होते.आधीच लोकसभा निवडणुकीत त्यांनी घातलेला धुमाकूळ लोकांच्या डोळ्यात सलत होता.दरम्यानच्या काळात साधू संत,महंत आदींनी हिंदू समाजात मोठी जागृती केली असल्याचे आढळून आले आहे.त्यातच महंत रामगिरीजी महाराज याचे विरुध्द मौलाना संघटनेने कारवाईची मागणी आणि त्यास हिरवा कंदील या घटना महाआघाडी पिछाडीवर नेण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.त्यामुळे संदीप वपें यांचे विजयाचे चित्र रंगण्यास सरकारी नोकरदार वर्ग,मुस्लिम,दलीत,आणि शिवसेनेच्या मतांनी चांगलाच रंग भरला होता.त्यामुळे त्यांची शक्यता वाढली होती.ती मते मात्र कोल्हे आणि हिंदुत्ववादी गटाने जिरवली असल्याचे दिसून आले आहे.त्यासाठी भाजपचे निरीक्षक मतदार संघात ठाण मांडून बसले व त्यांनी त्यांना पाय देऊन हाकले असल्याच्या विश्वसनीय बातम्या आहेत.त्यामुळे तालुक्यात कोल्हे,आणि हिंदुत्ववादी मतांचे रूपांतरण हे विजयाला कारणीभूत ठरून भाजपचे हरियाणा पॅटर्न ची पुनरावृत्ती होणार आहे.परिणामी संदीप वर्पे यांच्या विजयाचे रुपांतर पराजयात झाले तर आश्चर्य वाटू नये.

माजी आ.अशोक काळे आपला मतदानाचा अधिकार बजावला तेंव्हा सहकाऱ्याबरोबर दिसत आहे.

   दरम्यान या एकूण निवडणुकीत शिवसेना (उबाठा) संपूर्ण एकमताने एकत्र आली ही समाधानाची बाब असून आगामी काळात नगरपरिषद आणि जिल्हा परिषद,पंचायत समिती आदी निवडणुका संपन्न होणार असल्याने त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान या निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का इतिहास सांगतो विरोधकांना फायदेशीर ठरताना दिसतो मात्र यावेळी प्रथम अशी घटना घडणार असून सत्ताधारी महायुतीस त्याचा फायदा होऊन हरियानाची पुनरावृत्ती होणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान या निवडणुकीत निवडणूक अधिकारी सायली सोळंके,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख भूमिका बजावल्याचे ही निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडली असून नागरिकांनी समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले. आहे.

(हे विविध तंद्यांशी बोलून व्यक्त केलेला केवळ अंदाज आहे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close