जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या मतदार संघात रस्त्यांचा टक्का ठरणार कळीचा मुद्दा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा गुरुवार दि.१४ नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित केली असली तरी त्यांना मतदार संघातील नादुरुस्त रस्ते आणि वाढलेले रस्ते अपघात त्यात गेलेले नागरिकांचे बळी यांची चांगलीच किंमत चुकवण्यास भाग पाडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

झगडेफाटा ते जवळके रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्याविरुद्ध ऍड.योगेश खालकर आणि सहकाऱ्यांनी त्या रस्त्याची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला त्याचे छायाचित्र.

 

कोपरगाव मतदार संघातील नादुरुस्त रस्त्यांबाबत विविध वर्तमानपत्रे व त्यांच्या प्रतिनिधींनी वारंवार आवाज उठवून्ही त्यांनी काहीही बोध घेतला नसल्याचे दिसून आले नाही.त्याचाच फटका आता या निवडणुकीत बसणार असून माहिती अधिकार कार्यकर्ते व अपक्ष उमेदवार संजय काळे यांनी तीन हजार कोटींचा शोध मतदार संघात सुरू केल्याने त्याची चांगलीच जनजागृती होताना दिसून येत आहे.

 

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा धाकटे अजित पवार यांची जाहीर सभा गुरुवार दि.१४ नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित केली असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था त्यांना गत पाच वर्षात दूर करता आलेली नाही.त्यामुळे सामान्य मतदारांत मोठी नाराजी दिसून येत आहे.त्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हद्दीतील नगर-मनमाड रस्ता प्रामुख्याने असला तरी त्यात अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यावरील खड्डे बुजवता आलेले नाही.त्यात अनेक प्रवांशाचे बळी गेले असून अद्याप ही जात आहे.त्याची मोठी किंमत ते मोजत आहे.त्याच बरोबर झगडे फाटा ते संगमनेर हद्द या रस्त्याची दुरावस्था यापूर्वी कधीही इतकी नीचांकी झालेली नव्हती.अद्यापही झगडे फाटा,पोहेगावं गणपती मंदिर,लक्ष्मी माता मंदिर,गोदावरी उजवा कालव्यानजिक,अशोक रोहमारे वस्ती,बहादराबाद शिवार,जवळके गावठाण हद्दिजवळ,अंजनापुर शिवारात मंगलमूर्ती मंगल कार्यालयाजवळ आदी ठिकाणी खड्ड्यांचा महापूर आलेला असून यात अनेक अपघात होत आहे.सदर कामास अवघे दोन महिने उलटले नाही तोच रस्ता पुढे पाठ आणि मागे सपाट (खड्डेमय) झाला आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहा कोटी रुपये पाण्यात गेले आहे.

दरम्यान तीच बाब वाकडी ते श्रीरामपूर औद्योगिक वसाहत या दरम्यान रस्त्याची मोठी वाट लागली आहे.शेतकरी संघटनेने त्याबाबत आंदोलन करूनही उपयोग झाल्याचे दिसून आले नाही.त्यामुळे मतदारांत मोठा असंतोष असून त्याची किंमत विद्यमान सत्ताधारी गटास मोजावी लागणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.तालुक्यात तीन हजार कोटींचे उड्डाण होत असताना त्याची अशी वासलात लागल्याने संताप व्यक्त होत आहे.या मागे अर्थातच लोकप्रतिनिधींच्या यंत्रणेकडून घेण्यात येणारा टक्का कारणीभूत मानला जात आहे.मागील निवडणुकीत केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी तर नगर जिल्ह्यातील नेत्यांची या टक्के वारीने मोठी इभ्रत काढली होती.त्यामुळे हा जिल्हा बदनाम झालेला आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद नाही.हा टक्का चांगलाच भोवला असल्याचे मानले जात आहे.स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून हा टक्का वसूल केला असल्याची मोठी चर्चा एक वर्षानंतर ऐकायला मिळत होती व ती मुदत संपेपर्यंत ऐकायला येत होती हे विशेष !मात्र याबाबत आ.आशुतोष काळे यांचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण असल्याचे दिसून आले नाही.त्याचा फटका त्यांना बसणार असल्याचे उघड होत आहे.मागील आमदार या टक्क्यांचे व वाळूचोरीचे बळी ठरले असताना त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून यांची वाटचाल सुरू होती.

झगडेफाटा ते जवळके रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्याविरुद्ध ऍड.योगेश खालकर आणि सहकाऱ्यांनी रस्त्यातील खड्ड्यात भाकरी भाजून निषेध व्यक्त केला त्याचे छायाचित्र.

   याबाबत आमच्या प्रतिनिधीने वारंवार आवाज उठवून्ही त्यांनी काहीही बोध घेतला असल्याचे दिसून आले नाही.त्याचाच फटका आता या निवडणुकीत बसणार असून माहिती अधिकार कार्यकर्ते व अपक्ष उमेदवार संजय काळे यांनी तीन हजार कोटींचा शोध मतदार संघात सुरू केल्याने त्याची चांगलीच जनजागृती होताना दिसून येत आहे.याशिवाय थोरले पवार याचे उमेदवार संदीप वर्पे यांनी आवाज उठवला असून नागरिकांना विचार करायला भाग पाडले असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close