निवडणूक
जलद दळणवळणासाठी पुन्हा निवडून द्या -…यांचे आवाहन
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यासह संलग्न तालुक्यातील दळणवळण जलद करण्यासह सोनेवाडी-सावळीविहीर सीमेवर होणाऱ्या एमआयडीसीमध्ये जास्तीत जास्त उद्योग आणून कोपरगाव शहरातील ४३३ एकर जागेवर नवीन एमआयडीसी उभारून बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढायचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांनी बुधवार दि.०६ नोव्हेंबर रोजी कोपरगाव शहराच्या बेट भागातील जुनी गंगा येथील श्री जगदंबा मातेचे दर्शन घेवून महायुतीचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोपरगाव मतदार संघाचा आपला दृष्टीकोन ठेवला असून त्यात ही माहिती दिली आहे.
सदर प्रसंगी माजी आ.अशोक काळे,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे,महानंदा दुध संघाचे माजी अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,ज्येष्ठ नेते राजेंद्र जाधव,अॅड.रवींद्र बोरावके,पद्माकांत कुदळे,विजय त्रिभुवन,मनसेचे शहराध्यक्ष सतिश काकडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर चव्हाण,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,युवती अध्यक्षा वैशाली आभाळे,डॉ.अजय गर्जे,माजी नगरसेवक मेहमूद सय्यद,फकीर कुरेशी,प्रकाश दुशिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”दळणवळण अधिक जलद कसे होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.सोनेवाडी-सावळीविहीर सीमेवर होणाऱ्या एमआयडीसीमध्ये जास्तीत जास्त उद्योग आणून कोपरगाव शहरातील ४३३ एकर जागेवर नवीन एमआयडीसी उभारून बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढायचा आहे.ग्रामीण भागातील रोहीत्रांची संख्या वाढवून सबस्टेशनच्या देखील क्षमता वाढवायच्या आहेत.मतदार संघातील सर्वत्र भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सोलर पॉवर प्लांट उभारून शेतकऱ्यांसाठी व कोपरगाव शहरासह विविध गावातील पाणी योजनांसाठी सोलर पंप उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.कोपरगाव शहरतील के.बी.पी.विद्यालय व श्री सदगुरु गंगागीरीजी महाराज कॉलेजच्या परिसरात असलेल्या जागेवर भव्य क्रीडा संकुल उभारणार आहे.शहरात विविध ठिकाणी उद्यान विकसित करून भूमिगत गटारी व वीज वाहिन्या भूमिगत करून चांगल्या दर्जाच्या रस्त्यांच्या निर्मितींचे सुतोवाच करून आरोग्य व्यवस्थेबरोबरच शिक्षण व्यवस्था देखील बळकट करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा कार्यअहवाल आ.आशुतोष काळे यांनी प्रकाशित केला व त्यांच्या कार्यावर आधारित असलेले नवीन गीत प्रदर्शित करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी या गीतावर चांगलाच ठेका धरला होता.याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस,भाजपा,शिवसेना व मित्र पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते