जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या पक्षाचा प्रचाराचा नारळ फुटला!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव विधानसभा मतदार संघातील निवडणुकीने आपल्या नामनिर्देशन मागे घेण्याच्या प्रारंभी काल सकाळी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार संदीप वपें यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी सकाळी दहा वाजता गोदातिरी असलेल्या स्वामी समर्थ मंदिरात आपला प्रचाराचा नारळ शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभहस्ते तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत फोडला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील निवडणुकीने आपल्या नामनिर्देशन मागे घेण्याच्या प्रारंभी काल सकाळी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार संदीप वपें यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला त्यावेळी मार्गदर्शन करताना खा.भाऊसाहेब वाकचौरे दिसत आहेत.

  

कोपरगाव मतदार संघात विद्यमान दोन राष्ट्रवादीत सामना रंगत आहे.त्यात अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे विरुध्द शरद पवार गटाचे उमेदवार संदीप वपें असा सामना रंगणार आहे.सोबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे हेही आपले नशीब अजमावत आहेत.

  राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत.वेगवेगळ्या पक्षांनी,उमेदवारांनी राज्यभर जोरदार प्रचार सुरू केला आहे.दरम्यान काल सोमवारी ४ नोव्हेंबर दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न चालू होते.त्यात सर्वच पक्षांना काही प्रमाणात यश मिळालं आहे.तर,काही बंडखोऱांची समजूत काढण्यात नेते अपयशी ठरले आहेत.आता पुढचे काही दिवस राज्यभर केवळ प्रचार,टोकाच्या राजकीय टिका-टिप्पण्या पाहायला मिळणार आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्याला अपवाद नाही.कोपरगाव मतदार संघात सात जणांनी आपल्या तलवारी म्यान केल्या असून आता वपें सह बारा जण रणांगणात उरले आहेत.कोपरगाव मतदार संघात विद्यमान दोन राष्ट्रवादीत सामना रंगत आहे.त्यात अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे विरुध्द शरद पवार गटाचे उमेदवार संदीप वपें असा सामना रंगणार आहे.सोबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे हेही आपले नशीब अजमावत आहेत.

आपले मनोगत व्यक्त करताना उमेदवार संदीप वपें दिसत आहे.

   काल संपन्न झालेल्या या शुभारंभ प्रसंगी माजी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष संजय सातभाई,प्रमोद लबडे,काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे,ऍड.दिलीप लासूरे,शिवसेना उध्दव गटाचे माजी जिल्हाप्रमुख कैलास जाधव,माजी तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे,माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,भरत मोरे,धर्मा जावळे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब रांधवणे,माजी सभापती अनिल आव्हाड,अनिल सोनवणे आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close