जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

मराठा आंदोलक निवडणुकीतून पीछेमूड ?

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे.तर याच्या नेमकी विरुध्द भूमिका कोपरगाव विधानसभा मतदार संघात पाहायला मिळत असून अनेक इच्छुक असल्याने आपण या निवडणुकीतून माघार घेतली असल्याची माहिती ऍड.योगेश खालकर यांनी दिली आहे.मात्र बाळासाहेब जाधव,राजेंद्र कोल्हे,विनायक भगत आदी तीन जण रिंगणात असल्याची माहिती हाती आली आहे.

  

  “दरम्यान याबाबत राजेंद्र कोल्हे यांनी मात्र आम्ही तीन जण इच्छुक असून आमचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करून ती नावे मनोज जरांगे पाटील यांचेकडे पाठवणार आहे.ते जे आदेश देतील त्या प्रमाणे ही निवडणुक प्रक्रिया पुढे जाणार आहे”-राजेंद्र कोल्हे,आंदोलक,मराठा महासंघ.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्राती विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेकांना मराठा मतांचा फटका बसला होता.त्यामुळे आता सर्वच पक्षातील आमदार,नेते तसेच निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेताना दिसत आहेत.यामुळे अंतरवाली सराटीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान या निवडणुकीत माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी आपले नामनिर्देशन दाखल करून आपला प्रचार जोरात सुरू केला असल्याची माहिती आहे.त्यासाठी त्यांनी आ.आशुतोष काळे यांचेसह सत्ताधाऱ्यांवर कठोर प्रहार सुरू केले आहे.

   दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांना अनेक नेते भेटत आहेत.हे सर्व नेते आगामी विधानसभा निवडणूक आणि मराठा मतं याबद्दल प्रामुख्याने चर्चा करताना दिसत आहेत.सध्या जे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत,त्या नेत्यांच्या मतदारसंघात जरांगे पाटील पॅटर्न चालत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे या भेटीगाठी महत्त्वाच्या असल्याचे बोललं जात आहे.मात्र मराठवाड्यात या घडामोडींना महत्व आले आहे.मात्र या उलट नगर जिल्ह्यात मात्र या पॅटर्न चालताना दिसत नाही.कारण या भागातील अनेक मराठा समाजाच्या नागरिकांना ओ.बी.सी.आरक्षणाचा फायदा होताना दिसत आहे.त्याचा परिणाम आपोआपच निवडणुकीवर होताना दिसत आहे.

   दरम्यान याबाबत आधी बाळासाहेब जाधव यांनी आपल्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने अप्रत्यक्षरीत्या आपल्या नावाची घोषणा करून पाहिली मात्र अनेकांना ती मानवली नाही.त्यांनी त्यास जोरदार विरोध केल्याचे दिसून आले होते.त्यानंतर विजय वडांगळे यांनीही तोच प्रयोग करून पाहिला मात्र त्याला यश आले नाही.

दरम्यान काल रात्री ०८ वाजता छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ मराठा समाजातील कार्यकर्त्यांची एक बैठक संपन्न झाली असून त्या बैठकीला तितकासा प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आहे.सदर बैठकीत एकमत न झाल्याने अड.खालकर यांनी पीछे मूड केला आहे.तर अन्य ईच्छुकांत आता राजेंद्र कोल्हे,बाळासाहेब जाधव,विनायक भगत आदी दिसत आहे.मात्र जरांगे पाटील यांचेकडे तब्बल तेरा जणांनी आपले अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.दरम्यान उपस्थित इच्छुकांनी आपले घोडे दामटल्याने व एका नावावर एकमत न झाल्याने सगळा इस्कोट झाला असल्याची माहिती आहे.त्यामुळे आपण या निवडणुकीतून माघार घेतली असल्याची माहिती ऍड.योगेश खालकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

  दरम्यान याबाबत राजेंद्र कोल्हे व बाळासाहेब जाधव यांनी मात्र आम्ही तीन जण इच्छुक असून आमचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करून ती नावे मनोज जरांगे पाटील यांचेकडे पाठवणार आहे.ते जे आदेश देतील त्या प्रमाणे ही निवडणुक प्रक्रिया पुढे जाणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close