जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

नगर जिल्ह्यात शेतकरी संघटना उतरणार विधानसभेच्या रिंगणात !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत.आज २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असताना नेवासा विधानसभा मतदार संघात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

  

“ऍड.अजित काळे यांच्यावर शेतकऱ्यांमधून विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी दबाव वाढला होता.त्याबाबत त्यांनी गावोगाव बैठका घेऊन जनमत जाणून घेतले होते.त्यानुसार हा दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आपला नामनिर्देशन भरण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे”- अनिल औताडे,जिल्हाध्यक्ष,शेतकरी संघटना.

   बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने नुकतेच जाहीर करण्यात आले असून राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रासोबतच झारखंड विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली आहे.त्यामुळे राज्यात सर्वत्र निवडणुकीचे चित्र निर्माण झाले असून सर्वच राजकीय पक्ष,त्यांचे नेते आणि कार्यकर्ते तयारीला लागले आहे.त्याला शेतकरी संघटना अपवाद नाही.त्यातच शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी आपल्या निवडणुकीची घोषणा केली आहे.त्याबाबतीत त्यांनी आपले नेते आणि शिफाचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांची भेट घेऊन ही घोषणा केली आहे.


  

ऍड.अजित काळे यांनी आज पर्यंत निळवंडे कालवा कृती समितीच्या दोन जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८२ दुष्काळी गावांसाठी न्यायिक लढ्यात मोठे योगदान दिले असून श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत नऊ गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून न्याय देण्यासह विविध कामे केली आहे.

दरम्यान शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी आज पर्यंत निळवंडे कालवा कृती समितीच्या दोन जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८२ दुष्काळी गावांसाठी न्यायिक लढ्यात मोठे योगदान दिले असून श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत नऊ गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून न्याय दिला आहे.या शिवाय सन- २०१८ साली भाजप ने घोषणा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी कर्जमाफी योजना सरकारने आपले पोर्टल बंद करून गुंडाळून ठेवली होती.त्या बाबत उच्च न्यायालयाच्या छ्त्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून राज्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळवून देऊन न्याय दिला आहे.त्यांनी दोन वर्षापूर्वी अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवून सुमारे साडेचार हजार मते मिळवून सत्ताधाऱ्यांना,’दे माय धरणी ठाव’ अशी अवस्था करून ठेवली होती.
त्या शिवाय पश्चिम घाट माथ्याचे पाणी पूर्वेस वळविण्याचा चांग बांधला असून त्यासाठी पत्रकार नानासाहेब जवरे,रूपेंद्र काले यांच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल केली आहे.त्यामुळे त्यांच्यावर शेतकऱ्यांमधून विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी दबाव वाढला होता.त्याबाबत त्यांनी गावोगाव बैठका घेऊन जनमत जाणून घेतले होते.त्यानुसार हा दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आपला नामनिर्देशन भरण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्याचे नेवासा मतदार जोरदार संघात स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close