जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या पक्षात झाले पक्षांतर,कोल्हे गटास फटका !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी नुकताच आ.आशुतोष काळे गटात प्रवेश केला असून हा प्रवेश कोल्हे गटास ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दणका समजला जात आहे.वर्तमानात आ.आशुतोष काळे हे अजित पवार राष्ट्रवादीचे काम करत आहेत.

   आगामी काळात विधानसभा निवडणुका नोव्हंबरच्या पहिल्या सप्ताहात संपन्न होणार आहेत.त्यासाठी मतदान यादी नुकतीच अंतिम झाली आहे.२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी झाली होती.राज्यातील सर्व २८८ जागांसाठी मतदान झाले.२४ ऑक्टोबर २०१९ रोजी निकाल जाहीर झाले.त्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते.परंतु भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद निर्माण झाले.त्यांच्यात नंतर पुढे फाटाफूट झाली आहे.ती आजतागायत आहे.आता महायुती आणि महाआघाडी यांच्यात लढत होणार आहे.या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद नाही.येथेही पक्षांतरे सुरू झाली आहे.मात्र ही पक्षांतरे कोल्हे गटास मारक ठरताना दिसत आहे.याचा अनुभव नुकताच आला आहे.या पूर्वी अनेक नगरसेवक आणि माजी सभापती यांनी काळे गटात प्रवेश केले आहे.आता ही लस ग्रामीण भागात पसरली असल्याचे दिसून येत आहे.याचा अनुभव रवंदे येथे आला आहे.

दरम्यान हे रवंदे येथील कार्यकर्ते कोल्हे गटास मानणारे होते आता मात्र त्यांनी माजी आ.कोल्हे यांच्यावर नाराज होऊन आ.आशुतोष काळे यांचा रस्ता धरला आहे.सदर कार्यक्रम हा लामखडे यांच्या निवासस्थानीच पार पडला.यावेळी लामखडे कुटुंबातील रामदास लामखडे,अशोक लामखडे,तुकाराम लामखडे,संजय लामखडे,राजेश लामखडे,विपुल लामखडे,प्रमोद लामखडे,शुभम लामखडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.त्यांना आ.काळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close