निवडणूक
…’तो’ तालुकाध्यक्ष व पाठराखण करणाऱ्यांची हकाल पट्टी करा -मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव – (नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर ग्रामपंचायत हद्दीत,’महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने’च्या माध्यमातून ग्रामस्थांची रोहयो योजनेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिकदृष्ट्या लुटण्याचे काम भाजप (कोल्हे गटाचे) तालुकाध्यक्ष कैलास रहाणे यांनी केले असून भाजपस बदनाम करणाऱ्या अध्यक्षाची व त्यांना अभय देणाऱ्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांची ताबडतोब हकालपट्टी करा अशी मागणी निष्ठावान भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.त्यामुळे यावर पक्षांतर्गत मोठे वादळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अ.नगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.त्यामुळे भाजपसह सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांचेसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच कोपरगाव दौरा केला आहे.भाजपसह महायुतीचा नेमका उमेदवार कोण याबाबत संदिग्धता असताना एक खळबळजनक घटना कोपरगाव तालुक्यात उघड झाली आहे.त्यात,’ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण विकास योजना’ ही केंद्र सरकारची सरकारची योजना असून या अंतर्गत कामासाठी लाभार्थी कुशल-अकुशल रोजगार पुरविला जात आहे.यात १०० दिवसांपर्यत अंमलबजावणीची करण्याची केंद्र सरकारची योजना असून त्यास राज्य सरकार हमी देते.स्वयंचे संपूर्ण योजनेत कर्मचारी हे संगणकीकृत असून लाभार्थी यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची चौकशी करून जमा होते.मात्र मंजुरीच्या पातळीवर खरे खेळ होत असून यात लाभार्थ्यांची लूट होत असल्याची गंभीर घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर ग्रामपंचायतीचे सरपंच गोपीनाथ रहाणे व पंचायत समितीचे शिंदे गटाचे माजी सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी दि.12 ऑगस्ट रोजी दुपारी उघड केली असून त्यांच्या समवेत शेकडो लाभार्थी महीलासंह उपस्थित होते.
वास्तविक कोपरगाव तालुका हा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा खा.सूर्यभान पाटील वहाडणे,विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.ना.स.फरांदे,माजी खा.भीमराव बडदे आदींचा नावावर राज्यात ओळखला जातो.माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांनी आपल्या उभ्या आयुष्यात हाडाची काडे करून हा पक्ष उभा केला आहे.त्यांचे आणि तालुक्यातील माजी मंत्री शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे यांचे वैचारिकदृष्ट्या कधीच जमले नाही.त्यांनी या दोन्ही नेत्यांना हयातभर विरोध केला होता हे उघड आहे.तरीही काही सत्तापिपासू नेत्यांनी त्यांच्या पश्चात पक्षात प्रवेश करून जो नंगा नाच करायचा तो केला असून या पक्षास पुरते बदनाम केले आहे.त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे.या पार्श्वभूमीवर सुभाष दावंगे यांनी ही महत्वपूर्ण मागणी केली असून त्यांना याबाबत जोरदार पाठींबा मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,”भाजप हा पक्ष माजी प्रदेशाध्यक्ष खा.सूर्यभान पाटील यांनी मोठ्या कष्टाने उभा केला आहे.निव्वळ नगर जिल्हाच नाही तर खान्देश,विदर्भ,मराठवाडा आदी विभागातही त्यांनी मोठे कष्ट घेऊन संघटना वाढविली होती.परिणामी राज्यात सन-1995 साली राज्यात युतीची सत्ता आली होती.त्यांनीच आपल्या कार्यकाळात उजनी प्रश्न मार्गी लावला होता.आता मात्र नेमकी उलटी स्थिती झाली असून वर्तमानात काँग्रेसी नेत्यांनी भाजपमध्ये विनासायास प्रवेश करून भाजप हा काँग्रेसमध्ये परावर्तित करून टाकला आहे.परिणाम समोर आहेच.अशीच घटना ही धक्कादायक असून त्यामुळे भाजपच्या विचारसरणीची मोठी हानी झाली असल्याचे सुभाष दवंगे यांनी आपल्या परिपत्रकात म्हंटले आहे.
माजी खा.वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शहाजी वहाडणे,फकिरराव गाढवे,सोमनाथ चांदगुडे,नामदेव जाधव,वाल्मीकराव भोकरे,सय्यदबाबा सय्यद आदींनी चोख भूमिका वठवली होती.मात्र त्यांनी कधीही जनतेची आर्थिक लूट केली नाही.एव्हढेच कशाला आपण सन-2015 साली तालुका अध्यक्ष असताना सामाजिक आंदोलन करताना गुन्हा दखल झाला होता.त्यात आपल्याला सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.याचे कुभांड रचून तत्कालीन आ.स्नेहलता कोल्हे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उलटसुलट माहिती देऊन आपल्याला पक्षातून बडतर्फ करा अशी मागणी केली होती व आपल्याला बदनाम केले होते.वास्तविक आपण विद्यार्थ्यांसाठी बस थांबत नव्हती म्हणून सामाजिक आंदोलन केले होते.त्यात वावगे काही नव्हते तरी माजी आ.कोल्हे यांनी कूभांड रचून आपले काँग्रेसी संस्कार दाखवून दिले होते.याची दवंगे यांनी आठवण करून दिली आहे.(तेंव्हाचे उट्टे काढले असल्याचे दिसून येत आहे) माजी आ.कोल्हे यांनी आजपर्यंत भाजप हा पक्ष वाढविण्याचे सोडून तो संपविण्यासाठी प्रयत्न केले आहे.आताही त्यांनी ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे जाहीर करावे अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.
त्यांनी पुढे म्हंटले आहे की,”नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कोणाला मदत केली आहे ? हे जाहीर करावे,त्यांनी पक्ष चींन्ह न घेता विधानपरिषद शिक्षक मतदार संघाची निवडणूक अपक्ष लढवून पक्षाशी द्रोह केला आहे.आताही त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाशी सोयरिक केल्याच्या बातम्या आहेत.त्यामुळे ,’आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे ‘ छाप नेत्यांची ही कुटील निती उघड झाली आहे.त्यामुळे भाजप कोल्हे गटाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष कैलास रहाणे व त्यांना अभय देणाऱ्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांची पक्षाने ताबडतोब हकालपट्टी करावी अशी मागणीही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे यांनी शेवटी केली असून या निवेदांची प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली असल्याचे दिसून येत आहे.