निवडणूक
…या समाजाची नाराजी आ.काळेंना भोवणार ?
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राष्ट्रवादी अजित पवार गटाने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने कोपरगाव शहरात निवडणुकीचे बिगुल वाजवलेले असताना काल संपन्न झालेल्या या जनयात्रेत आ.आशुतोष काळे यांना मानणारे मुस्लिम समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने गैरहजर असल्याने ते अन्य पक्षात जाणार असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली असून त्यासाठी कोल्हे गटाने मोठा डाव खेळला गेला असल्याची महिती हाती आली आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या (अजित पवार) गटात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत तसेच आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवार दि.२८ रोजी दुपारी ०५ वा ‘कृष्णाई बॅक्वेट हॉल’ कोपरगाव येथे मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची ‘जनसंवाद यात्रा’ आयोजित केली त्यासाठी राज्यातील राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम,अल्पसंख्यांक अध्यक्ष इंद्रिस नाईकवाडी,सामाजिक न्याय अध्यक्ष सुनिल मगरे,युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार,दक्षिण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा,सुभाष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान कोपरगाव येथील कॉलनी येथील रहिवासी पूर्वी (महादेवनगर)सोयेल हरून पटेल (वय-२८) याचा एका आरोपीच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबधाच्या संशयावरून आरोपी मच्छीन्द्र सोनवणे,स्वप्नील गायकवाड,महेश कट्टे,विकी परदेशी व त्याचा अनोळखी मित्र,योगेश जाधव उर्फ योग्या आदींनी चाकू,लाकडी दांडके,लोखंडी खिळे असलेला बांबू आदींच्या सहाय्याने जावेद शेख यांच्या प्लॉटमध्ये निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती.यातील तीन आरोपी पोलिसांनी रात्रीच अटक केली असून अद्याप तीन आरोपी अद्याप फरार आहे.आठ दिवस उलटूनही अद्याप पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहे.त्यासाठी मुस्लिम समाजाने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यावर बावीस जुलै रोजी जमाव गोळा करून या घटनेचा निषेध व्यक्त केला होता.
दरम्यान त्यात कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक अट्रोसिटीची घटना उघड झाली असून त्यातही युवक अटक झाली असून आणखी एक जण असे तीन जण अटकेत असल्याची माहिती मुस्लिम समाजातील एका कार्यकर्त्याने दिली असून त्यात विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी बोटचेपी भूमिका घेतली असल्याचा या कार्यकर्त्यांत समज पसरला आहे.त्यामुळे ही नाराजी मोठ्या प्रमावणार पसरली आहे.आ.काळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची व शहरातील शांतता समितीची बैठक घेऊन यात समंव्यकाची भूमिका घेणे अपेक्षित होते असे या कार्यकर्त्यांचे दुःखने आहे.मात्र या पातळीवर त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही.हे वरवर चित्र दिसत असले तरी खालचे चित्र वेगळे असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान एका मुस्लिम गटास माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांचा आ.काळे गटातील प्रवेश खटकला आहे.त्यामुळे आ.काळे गटाच्या जुन्या समर्थकांनी आपली नाराजी दाखविण्यासाठी हि खेळी केली असल्याचे समजले जात आहे.
दरम्यान राज्यात संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभर मुस्लिम समाजाने भाजप विरोधी भूमिका घेतली आहे हे सर्वश्रुत आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.काळे हे वर्तमानात भाजप महायुती सोबत आहेत.त्यामुळे मुस्लिम समाजाची कोंडी झालेली आहे.त्यातून ते मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते त्यातून हे तात्कालिक निमित्त शोधत असताना ही घटना उघड झाली आहे.त्यामुळे त्यांनी हि संधी शोधली असल्याचे समजले जात आहे.
दरम्यान भाजप मध्ये कोंडी झालेल्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांची लोकसभा निवडणुकीत त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खा.सुजय विखे यांचे विरुद्ध माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाच्या सोबत राहून जोरदार काम केले असल्याचे मानले जात आहे.व तसे अहवाल भाजपच्या वरिष्ठ गोटात गेले आहे.त्या पाठोपाठ नाशिक विधानपरिषद शिक्षक मतदार संघात भाजप वरिष्ठ नेत्यांचा आदेश डावलून त्यांनी अपक्ष उमेदवारी,गणेश सहकारी साखर कारखान्यात काँग्रेसचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे बोट धरून लढवलेली निवडणूक त्यांचे अवघड जागेचे दुःखने ठरले आहे.परिणामी त्यांच्या पाठोपाठ भाजपने साखर कारखाना चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले होते.त्याची चौकशी अद्याप गुलदस्त्यात (राखीव हत्यार) ठेवलेले असताना या घटना उघड होत आहे.दरम्यान ही ठसठस विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता कुठेतरी बाहेर पडू लागली असून तेही भाजपमधून बाहेर पडण्याची संधी शोधत आहेत.त्यासाठी त्यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली असून त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना टाळून त्यांच्या थोरल्या पातीस (नितीन कोल्हेंना) युवा नेते सुमित कोल्हेंसाठी विचारणा झाली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.मात्र तत्पूर्वी विवेक कोल्हे यांनी मात्र एक चाल खेळली असून गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ऍड.नारायण कार्ले यांना शिष्टमंडळ सोबत देऊन त्यांना आधी ऊबाठा गटाचे प्रवक्ते खा.संजय राऊत व नंतर जेष्ठ नेते शरद पवार यांचेकडे पाठवून चाचपणी केली आहे.मात्र त्या रांगेत आधीच दिल्ली दरबारी हजेरी लावून प्रवक्ते संदीप वर्पे ठाण मांडून बसले आहे.त्यातले त्यात खा.राउतांनी त्यांना अंगठा दाखवला असल्याची माहिती आहे.’आधीच पिराचे पिराला पडले त्यात फकिराला कोण विचारणार’ अशी स्थिती कोल्हे गटाची मुस्लिम समाजाची झाली असून त्यांनी आगामी काळात,”थांबा,पहा आणि जा” ची भूमिका घेतली तर नवल वाटावयास नको.त्यामुळे तूर्त तरी आ.आशुतोष काळे यांचेवरील संकट टळणार असल्याचे दिसत असून आगामी काळात त्यांना आपली राजकीय वाट सुकर करण्यास संधी मिळणार असल्याचे दिसत आहे.त्यामुळे ते आगामी काळात मुस्लिम समाजाचे दुःखने दूर करू शकतात.मात्र तरीही देश आणि राज्य पातळीवर विचार करता मुस्लिम समाज महाआघाडी बरोबर जाण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांच्या या दबावाने कोल्हे गटास शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर तुतारी वाजविण्यासाठी भाग पाडले (नाही तरी त्यांना वगळा मार्ग उरला नव्हताच) आहे.परिणामी मतदार संघातील मुस्लिम समाजातील सुमारे चाळीस हजार मतांनी कोल्हे गटाची झोप उडवली असून त्यांचा त्यावर डोळा असून मागील पराभव त्यांना स्वस्थ बसू देत नाही.त्या साठी त्यांना आपल्या एकगठ्ठा मतबरोबर कोपरगाव तालुक्यातील एक गट बरोबर असला तरच आपली विधानसभेची बेरीज जुळत असल्याने त्यांना शिवसेनेपेक्षा हा एकगठ्ठा मतदार अधिक लोभस वाटू लागला आहे.परिणामी त्यांनी त्या दिशेने कूच करणे सुरू केले असल्याचे मानले जात आहे.तर इकडे शिवसेनेने (उबाठा) आपल्या स्वतंत्र निवडणुकीच्या दंडाच्या बेटकुळ्या दाखविण्यास सुरुवात केली असून कोपरगाव विधानसभा मतदार संघात त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.(या डरकाळ्या टिकत नाही हा भाग वेगळा) त्यामुळे हे दोन गट या मतदार संघाचे किंग मेकर ठरू शकत असल्यास नवल नाही.त्यासाठी सर्वच पक्ष गळ टाकून बसले आहे.
आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा-9423439946.