जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

राजकीय व्यक्तींचा शिरकाव,शिक्षकांवर अन्याय करणारा ठरणार-…या उमेदवाराचा आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   नाशिक विधानपरिषद शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत राजकीय व्यक्ती आणि संस्थाचालक यांचा शिरकाव झाल्याने मूळ शिक्षकांवर मोठा अन्याय होणार असून ही शिक्षक मतदार संघातील घुसखोरी शिक्षक मतदारांनी आता थांबवायला हवी अशी अपेक्षा टी.डी.एफ.संघटनेचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कचरे यांनी व्यक्त केली आहे.

  

“संस्थाचालकांना कुठल्याही शिक्षकांच्या वेदना,प्रश्न माहिती नाही.त्यांनी कधी हातात खडू घेतलेला नाही.विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला नाही.शिक्षकांना संस्थाचालक वेळेवर पगार देतात की नाही याची माहिती नाही.बिगर अनुदानित शाळा शिक्षक कसे जगतात याची माहिती नाही,पेन्शनचे प्रश्न काय आहेत ? त्यांच्या चुली पेटतात कधी ? याची त्यांना जाण नाही अशी माणसे शिक्षकांचे नेतृत्व करणार हा मोठा राजकीय विनोद निर्माण होणार आहे”-भाऊसाहेब कचरे,उमेदवार,टी.डी.एफ.संघटना.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२४ ची निवेडणूक अंतिम टप्प्यात आली असून या निवडणुकीत माघारीनंतर एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत.यात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे,शिवसेना ठाकरे गटाचे ॲड.संदीप गुळवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर भावसार यांच्यासह अपक्ष उमेदवार भागवतराव गायकवाड,अनिल तेजा,अमृतराव उर्फ अण्णासाहेब शिंदे,इरफान इसहाक,भाऊसाहेब कचरे,विवेक कोल्हे,सागरदादा कोल्हे,संदीप कोल्हे,गजानन गव्हारे,संदीप गुरुळे,सचिन झगडे,डॉ.छगन पानसरे,रणजित बोठे,महेश शिरुडे,रतन चावला,आर.डी.निकम संदीप गुळवे (पाटील) यांचा समावेश आहे.

   दरम्यान या निवडणुकीत विविध पक्ष आणि त्यांच्या संघटना आपले घोडे दामटताना दिसत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत असून मूळ शिक्षक मात्र या प्रक्रियेपासून दुरावला की काय अशी शंका उपस्थित व्हावी अशी स्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने टी.डी.एफ.संघटनेचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कचरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

  त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”शिक्षक मतदार संघात वास्तविक ‘शिक्षक’ हा मतदार असून त्याला नैतिक दृष्ट्या निवडणूक लढण्याचा अधिकार आहे.मात्र अलीकडील काळात संस्थाचालकांनी या निवडणुकीत उतरून या क्षेत्राचा राजकीय आखाडा बनवला आहे.त्यामुळे या स्वच्छ क्षेत्रात आता अनेक कुप्रथा सुरू होण्याचा धोका वाढला आहे.ज्यांना शिक्षकांचे प्रश्न माहिती नाही अशा प्रवृत्या यात उतरून या क्षेत्राचा ऱ्हास करत असताना शिक्षकांना पहावे लागणार असून आता नाशिक मतदार संघातील शिक्षक बळी पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.त्यासाठी त्यांनी पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे उदाहरण दिले असून त्या ठिकाणी मराठी विभागाचा प्राध्यापक शिकवत होता.अशीच स्थिती आगामी काळात शिक्षक मतदार संघात होणार असल्याची साधार भीती त्यांनी व्यक्त केली आहे.संस्थाचालकांना कुठल्याही शिक्षकांच्या वेदना,प्रश्न माहिती नाही.त्यांनी कधी हातात खडू घेतलेला नाही.विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला नाही.शिक्षकांना संस्थाचालक वेळेवर पगार देतात की नाही याची माहिती नाही.बिगर अनुदानित शाळा शिक्षक कसे जगतात याची माहिती नाही,पेन्शनचे प्रश्न काय आहेत ? त्यांच्या चुली कधी पेटतात ? याची त्यांना जाण नाही अशी माणसे शिक्षकांचे नेतृत्व करणार हा मोठा राजकीय विनोद निर्माण होणार आहे.निवडणुकीत केवळ पैसा हा घटक महत्वाचा ठरणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे या बाबत शिक्षक जागृत असून ते अशा प्रलोभणाला बळी पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.हा मतदार संघ केवळ शिक्षकांना राखीव असून त्यात ही राजकीय मंडळी आपले भविष्य शोधण्यासाठी आली आहे.त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात भविष्य राहिलेले नाही.मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली असल्याने ही मंडळी इकडे धुरली आहे खरी यातील गोम आहे.त्यामुळे त्यांनी एका नावाचे अनेक उमेदवार उभे करून मतदारांच्या मनांत संभ्रम निर्माण करण्याचा पर्यंत करण्याचे काम मनोभावे करत आहेत.मात्र यावर कोणी बोलावयास तयार नाही.त्यामुळे ही मंडळी या पवित्र क्षेत्रात येऊन अल्पावधीत या क्षेत्राचे गटार करतील असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.मात्र शिक्षक मतदार हा सुज्ञ असून तो अतिरेकी विचारला बळी पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.या निवडणुकीत शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या लोकशाही शिक्षक आघाडीकडून शिक्षक असलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे आता टी.डी.एफ.संघटनेत फूट पडली नसल्याचे स्पष्ट करत आता टी.डी.एफ.संघटना एकमेव उमेदवाराच्या मागे उभी राहणार आणि शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असणार आहे असे बजावले आहे.मत टी.डी.एफ.संघटनेचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कचरे यांनी व्यक्त केले आहे.टी.डी.एफने अधिकृत उमेदवार दिला आहे.अन्य बनावट व राजकीय पार्श्वभुमी असणाऱ्या उमेदवारांना निवडून देऊ नये पश्चाताप करण्याचा प्रसंग येऊ शकतो असा ईशारा त्यांनी दिला आहे व टी.डी.एफ.संघटनेचे अधिकृत उमेदवारच शिक्षक मतदार विजयी करतील असा विश्वास शेवटी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close