जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

नाशिक शिक्षक मतदार संघात अजब उमेदवार !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  

   लोकसभा निवडणुक संपल्यावर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.या निवडणुकीसाठी एकूण ८८ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध तहरले होते.यातील ३३ उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.त्यामुळे ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागणार आहे.यात अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेसह,समता पार्टीचे भागवत धोंडिबा गायकवाड यांचेसह एकूण २१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.

“भ्रष्टाचाराचे अड्डे बनलेले देशातील सर्व सहकारी साखर कारखाने व नगर नाशिक जिल्ह्यातील सहकारातून निर्माण झालेल्या रुग्णालयांचे राष्ट्रीयकरण केले जाईल असे आश्वासित केले आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नंतर आपले अन्य राजकीय गुरू म्हणून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आहे”-भागवत गायकवाड,समता पार्टी उमेदवार,नाशिक पदवीधर मतदार संघ.

   यात भागवत गायकवाड या उमेदवाराने आज पर्यंत राष्ट्रपती पदापासून लोकसभा,विधानसभा,आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवली असून शिक्षकांनी फुकटच्या पैठण्या आणि जेवणावळ्या यांच्या पाठीमागे न जाता नाशिक मतदार संघात स्वच्छ प्रामाणिक उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले आहे.त्यांची नाशिक मतदार संघातील सर्व जिल्ह्यात चर्चा घडून येत आहे.

 

  निवडणूक आयोगाने विधान परिषद आणि पदवीधर शिक्षण मतदार संघाच्या निवडणुका जाहिर केल्या आहेत.यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर,नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ या ४ जागांकरिता निवडणूक होणार आहे.काल अर्ज माघारीचा शेवटच्या दिवशी ३३ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने ५५ जण निवडणूक रिंगणात राहिले आहे.मुंबई पदवीधर मतदारसंघात ८,कोकण विभाग पदवीधर मतदार संघात १३,नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात २१,तर मुंबईतील शिक्षक मतदारसंघात एकूण १३ उमेदवार आपले भविष्य आजमवणार आहेत.जून महिन्याच्या २६ तारखेला सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या चार मतदारसंघात मतदान होणार आहे.सोमवारी १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे तर ५ जुलै रोजी निकाल लागणार आहेत.मात्र यातील अनेक उमेदवार आपले नशीब आजमावत असून त्यात एक समता पार्टीचे उमेदवार भागवत धोंडिबा गायकवाड हे संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागातील कासारे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जांभूळवाडी हद्दीतील रहिवासी असून त्यांनी आज पर्यंत राष्ट्रपती पदापासून लोकसभा,विधानसभा,ग्रामपंचायत आदी अनेक निवडणुका लढवलेल्या असून त्यांचा याबाबत दांडगा अनुभव असून त्यांनी आपण सामान्य कुटुंबातील असून आपणच खऱ्या अर्थाने शिक्षकांना न्याय देऊ शकणार असल्याचा दावा केला आहे.त्यांना देशाचा राष्ट्रपती आणि पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे.त्यासाठी ते आशावादी आहेत.त्यासाठी त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असून आपले मनोगत व्यक्त केले आहे.

    

भागवत गायकवाड यांनी मुंबईत राहून यांनी सलग २५ वर्ष संगमनेर तालुक्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या कासारे ग्रामपंचायतीत सदस्य व सरपंच पद (सन-२००० ते २००५) पर्यंत भूषवले आहे.या शिवाय त्यांची पत्नी सन-२०१५-२० या दरम्यान सरपंच होत्या त्यांच्याच काळात त्यांनी गत ५४ वर्ष उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या मात्र आपल्या दारू कारखान्यासाठी राजकीय नेत्यांनी प्रलंबित ठेवलेल्या निळवंडे कालव्यांसाठी पुढाऱ्यांना निळवंडे कालवा कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली गावबंदी केली होती.त्याची देशभर चर्चा झाली होती.

   त्यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की,”आपला जन्म १९६६च्या आषाढ अमावस्येला झाल्याचे सांगून आपले शिक्षण बी.कॉम आणि जी.डी.सी.अँड ए.झाल्याची माहिती दिली आहे.ते मुंबई येथील दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक येथे १९९१ रोजी सेवेत रुजू झाले होते.त्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी २०१९ पर्यंत आपली सेवा बजावली आहे.त्यांची तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याच बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.व सहकार क्षेत्र वाचविण्याचे काम त्यांच्या हातून घडविले होते.आज बहुतांश सहकारी क्षेत्र भ्रष्टाचाराने बजबजले आहे.त्यात त्यांचे कार्य उठून दिसत आहे.त्यामुळे ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गुरुस्थानी मानतात.सहकारात संस्थानिक तयार झाले असल्याचा त्यांचा दावा असून शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण झाले असून त्यांचे त्यांना मोठे दुःख आहे.त्यामुळे आपण निवडून आल्यावर आपण हे चित्र बदलून शिक्षण क्षेत्राचे सरकारीकरण करू असे शिक्षक मतदारांना ते आश्वासित करत आहे.

भागवत गायकवाड,समता पार्टी उमेदवार,नाशिक शिक्षक मतदार संघ.

“पुढील वीस वर्ष नद्यांमधील वाळू उपसा पूर्ण बंद केला जाईल.झाडे कापण्याच्या मशीनच्या बंदुकीप्रमाणे परवाना पद्धत लागू केली जाईल व त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल.सर्वांना जी.एस.टी.एकसमान केला जाईल.कर्जमुक्त व भिकारी मुक्त भारत निर्माण केला जाईल.संपूर्ण भारतात दारू बंदी केली जाईल.सर्वांना आरोग्य सेवा मोफत दिली जाईल.डॉ.स्वामिनाथन समितीच्या शिफारशी प्रमाणे शेतीमालाला भाव व सर्वांना भेसळ मुक्त अन्नपदार्थ दिले जातील.२५% आमदार आणि खासदार यांची निवड यु.पी.एस.सी.केली जाईल”-भागवत गायकवाड,समता पार्टी उमेदवार,नाशिक शिक्षक मतदार संघ.

   दरम्यान त्यांनी मुंबईत राहून यांनी सलग २५ वर्ष संगमनेर तालुक्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या कासारे ग्रामपंचायतीत सदस्य व सरपंच पद (सन-२००० ते २००५) पर्यंत भूषवले आहे.या शिवाय त्यांची पत्नी सन-२०१५-२० या दरम्यान सरपंच होत्या त्यांच्याच काळात त्यांनी गत ५४ वर्ष उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या मात्र आपल्या दारू कारखान्यासाठी राजकीय नेत्यांनी प्रलंबित ठेवलेल्या निळवंडे कालव्यांसाठी पुढाऱ्यांना निळवंडे कालवा कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली गावबंदी केली होती.सदर विषय देश आणि राज्यात गाजला होता.त्यांनी समाज कार्यासाठी सन-२०१९ साली नोकरीचा पाच वर्ष आधी राजीनामा दिला आहे.त्यांनी दोन मुलींवर कुटुंब नियोजन केले असून त्यांच्या दोन्ही मुली उच्च शिक्षित आहेत.त्यांना कुठलेही व्यसन नाही.त्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या दक्षिण लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मधून उमेदवारी भरून जवळपास पाच हजार मते खेचुन आणली होती.व मोलाची भूमिका निभावली असल्याचा त्यांचा दावा आहे.गतवर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यावरही त्यांनी आपले कार्य पुढे सुरू ठेवले आहे.

   त्यांनी आपल्या समता पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपण सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणार आहे.सर्व शिक्षण संस्थांचे राष्ट्रीयकरण करणार आहे.बारावी पर्यंत शिक्षण सुविधा दहा कि.मी.च्या आत निर्माण करणार आहे.शाळेत एक विद्यार्थी असला तरी शाळा बंद होऊ देणार नाही.शिक्षकांना निवडणूक व इतर कामातून मुक्ती देणार आहे.शिक्षण सेवेत रुजू झाल्यावर एक वर्षात कायम केले जाणार आहे.पाच दिवसांचा आठवडा केला जाणार आहे.महिन्याचा पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला दिला जाणार आहे.शिक्षक पती-पत्नी यांचे आवडीप्रमाणे एकत्रीकरण केले जाईल.सर्वांना उच्च शिक्षण दिले जाईल.राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पर्यावरण रक्षणासाठी शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल.पुढील वीस वर्ष नद्यांमधील वाळू उपसा पूर्ण बंद केला जाईल.झाडे कापण्याच्या मशीनच्या बंदुकीप्रमाणे परवाना पद्धत लागू केली जाईल व त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल.सर्वांना जी.एस.टी.एकसमान केला जाईल.कर्जमुक्त व भिकारी मुक्त भारत निर्माण केला जाईल.संपूर्ण भारतात दारू बंदी केली जाईल.सर्वांना आरोग्य सेवा मोफत दिली जाईल.डॉ.स्वामिनाथन समितीच्या शिफारशी प्रमाणे शेतीमालाला भाव व सर्वांना भेसळ मुक्त अन्नपदार्थ दिले जातील.२५% आमदार आणि खासदार यांची निवड यु.पी.एस.सी.केली जाईल.
   राज्य परिवहन मंडळाच्या बस मध्ये महिलांप्रमाणे पुरुषांना ५० टक्के सवलत दिली जाईल.गंभीर गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाईल.विशेष म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे बनलेले देशातील सर्व सहकारी साखर कारखाने व नगर-नाशिकसह मतदार संघातील सहकारातून निर्माण झालेल्या रुग्णालयांचे राष्ट्रीयकरण केले जाईल असे आश्वासित केले आहे.त्यांनी आपले अन्य राजकीय गुरू म्हणून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना घोषित केले आहे.

   शेवटी भागवत गायकवाड यांनी आपण सामान्य मतदार नसून शिक्षक आहे.मतदानात आपले संस्कार आणि नीती स्पष्ट दिसायला हवी अशी विनंती करून गुंड आणि भ्रष्टाचारी नेत्यांना आज पर्यंत निवडुन देऊन आपल्या पायावर धोंडा पाडून आपले नुकसान करून घेतले असल्याची आठवण करून दिली आहे.व पैठण्या,फुकटच्या जेवणावळ्या आर्थिक प्रलोभणाला बळी न पडण्याचे व स्वच्छ उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले असून आपला मतपत्रिकेत अनुक्रमांक हा ०४ असून आपल्याला पहिल्या पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.न जमल्यास दुसऱ्या क्रमांकाचे दिले तरी हरकत नाही अशी सवलत देण्यास ते विसरले नाही हे विशेष ! संपर्कासाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांक दिला असून तो-9969 31 5443 असा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close