निवडणूक
आ.दराडे यांच्यावर असलेल्या गुन्हाचा तपास करा-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ज्या तत्परतेने आमच्या संस्थावर धाडी पडल्या त्याच तत्परतेने विद्यमान आ.किशोर दराडे यांच्यावर फसवणूक,पैशांचे गैरव्यवहार, जमीन बळकावणे व खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच तत्परतेने आ.दराडे यांच्यावर असलेल्या गुन्हाचा तपास केला पाहिजे अशी मागणी नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत केली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जूनला मतदान होणार आहे.काल आपले नामनिर्देशन मागे घेण्याची अखेरची वेळ होती.त्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठ्या राजकीय घडमोडी घडतांना पाहायला मिळत आहे.नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पडद्यामागे अनेक हालचाली घडल्या असून यात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार या निवडणुकीत उतरले होते.काँग्रेसचे दिलीप पाटील आणि ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांनी अर्ज दाखल केला होता.पण शेवटच्या क्षणी काँग्रेस आणि ठाकरे गटात दिलजमाई झाली.यातून काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली.त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे हे इथे मविआचे अधिकृत उमेदवार आहेत.नाशिकमध्ये महायुतीच्या गोटातदेखील नाशिक शिक्षक मतदारसंघात शेवटच्या क्षणी वेगवान घडामोडी घडल्या.भाजपचे राजेंद्र विखे,धनराज विसपुते यांनी माघार घेतली.या निवडणुकीसाठी आता महायुतीमधील अजित पवार गटाचे महेंद्र भावसार,शिंदे गटाचे किशोर दराडे,मूळचे भाजपचे मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले विवेक कोल्हे मैदानात आहेत.मात्र त्यांनी भाजपकडून अर्ज न भरल्याने वरिष्ठ नेते दुःखावले असल्याचे दिसून येत आहे.त्यातून आता जिरवाजिरवीचे राजकारण सुरू झाले असल्याचे दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अध्यक्ष असलेल्या संजीवनी अर्थात शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याशी संबंधित संस्थांवर तीन जून पासून तीन वेळा धाडी पडल्या असल्याने नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखनदारीत खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित करून आपली दिशा स्पष्ट केली आहे.
विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे की,”आमच्या संस्थांवर धाडी पडल्या हे नक्की आहे.तो त्यांचा अधिकार आहे.मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडे विशिष्ट खाती आहेत.त्या खात्यांमार्फत धाडी टाकण्यात आल्या आहे.शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आ.किशोर दराडे यांचे बंधूही आमदार आहेत.त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाठिंबा दिलेला होता.ते दराडे आहे त्या पक्षाचे झाले नाही.ते शिक्षकांचे काय होणार असा सवाल करून त्यांनी किशोर दराडे आता ते महायुतीत आले असल्याचे सांगून,मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना उमेदवारी दिली.परंतू या निवडणूकीत आम्ही त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे,त्यामुळेच धाडी पडल्या असाव्यात असा संशय व्यक्त केला आहे.प्रथम ०२ जूनला धाड पडली,नंतर ०७ तारखेला परत चौकशी केली.११ जूनला दुपारी तीन वाजता कागदपत्रांची तपासणी सुरू केली ती १२ जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत चालली.पुणे,छत्रपती संभाजीनगर,सोलापूर आणि जालना या ठिकाणचे पथक उपस्थित होते.त्यांनी सखोल चौकशी केली असल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे.व “आमच्या कोणत्याही संस्थेत कुठलेही अनियमितता होत नाही.गेल्या ६० वर्षात अशा धाडी झालेल्या नाहीत सुट्टीच्या दिवशी १० -१० तास चौकशी केली मात्र त्यांना काहीही त्रुटी सापडली नाही.असून सहकार चळवळ स्व.शंकरराव कोल्हे सुरु केलेली आहे.अशा पद्धतीच्या धाडी पाडणे दुर्दैवी आहे.आ.किशोर दराडे यांच्यावर फसवणूक,खाेटे दस्ताऐवज बनविणे,फौजदारी कट रचणे,जमिन बळकावणे व खुना सारखे गुन्हे दाखल आहेत.या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.सन-२००१ मध्ये संतोष साखर कारखाना लिमिटेड नावाने जवळपास दोन कोटीचे शेअर्स विकून पैसा गोळा केला आणि अद्यापही साखर कारखाना विद्यमान आमदारांनी उभा केलेला नाही.त्याची देखील चौकशी व्हावी व गोळा केलेली रक्कम व्याजासहित परत करावी अशी देखील मागणी कोल्हे यांनी शेवटी केली आहे.त्यामुळे आगामी काळात हे धाड प्रकरण कुठपर्यंत जाणार हे काळच ठरवणार असल्याचे दिसून येत आहे.