जाहिरात-9423439946
निवडणूक

भाजपाने स्वतंत्रपणेच लढावे-…या नेत्याची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


     लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणांत किंमत चुकवावी लागली असून त्यातून मोठे नुकसान सोसावे लागले आहे.महाराष्ट्रातील मतदार व भाजपा आणि रा.स्व.संघ कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेता,यानंतर महाराष्ट्रात तरी भाजपाने एकला चलो भूमिका घ्यावी अशी महत्वपूर्ण मागणी भाजप नेते व कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच एक प्रसिद्धी पत्रकांनव्ये केली आहे.

  

“महाराष्ट्रातील भाजपाच्या ज्या माजी आमदार-माजी मंत्री-पदाधिकारी यांनी लोकसभा निवडणुक प्रचार कार्यात सहभाग घेतला नाही-टाळाटाळ केली-पक्ष श्रेष्ठींना विनवण्या करायला भाग पाडले व अपेक्षित मताधिक्य दिले नाही अशांवर भाजपने कठोर कारवाया केल्या पाहिजे.तरच मतदार व कार्यकर्त्यांत चांगला संदेश जाऊन आगामी निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळेल”-विजय वहाडणे,भाजप नेते,कोपरगाव.

  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने नुकतीच भाकरी फिरवली असल्याचे मानले जात आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल ४२ जागांवर यश आलं होतं.पण हाच आकडा १८ वर येऊन ठेपला आहे.या निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.महाराष्ट्र भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे,सुधीर मुनगुंटीवार,पंकजा मुंडे यांनाही या निवडणुकीत मोठा झटका बसला व त्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे.त्यामुळे सरकारमधील पंतप्रधान,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आदींनी याबाबत बैठकांबाबत धडाका उठवला आहे.त्यातून आपले नेमके काय चुकले याचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.मात्र यावर स्पष्ट बोलण्यास कोणी तयार नाही.मात्र याचा एक अपवाद ठरला आहे.कोपरगाव येथील भाजपचे युती शासनातील प्रदेशाध्यक्ष स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे पुत्र व कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी यास वाचा फोडली आहे व त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस देऊन भाजपने राज्यात भ्रष्ट सहकार सम्राटांना व काँग्रेसी पुढाऱ्यांना बरोबर घेण्यापेक्षा स्वतंत्र लढण्याचा सल्ला दिला आहे.

   प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे म्हटलें आहे की,”गत लोकसभा निवडणुकीत भाजपाने इतर पक्षांशी केलेली महायुती अनेक एकनिष्ठ-जेष्ठ कार्यकर्त्यांना मान्यच नव्हती.त्यामुळेच अनेक जेष्ठ-अनुभवी कार्यकर्ते प्रचारांत सक्रिय होते.पण मनापासून प्रचार करणे व बळेबळेच प्रचारात सहभाग घेणे यात फार मोठे अंतर असल्याचे स्पष्ट केले आहे.आयुष्यभर एका विचाराला धरून,विपरीत परिस्थितीतही न डगमगता निःस्वार्थपणे राष्ट्र व धर्म यासाठी भाजपात कार्यरत राहणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये तडजोडीच्या राजकारणामुळे आलेली हतबलता-शिथिलता-नैराश्य हानिकारकच बनली असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

   भाजपाचे सन-१९८२ साली देशात फक्त दोनच खासदार असतानाही कार्यकर्ते कधीही पक्षापासून-विचारांपासून दूर गेले नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे निःस्वार्थ नेते असतांना महाराष्ट्रात भाजपाने एकला चलो भूमिका घेऊन विधानसभा निवडणूक लढविली तरी सर्वसामान्य मतदार व भाजपाचे १००टक्के कार्यकर्ते निवडणुकीत यशच मिळवून देतील यात शंकाच नाही.जनतेला महायुती-महाआघाडी मान्यच नसल्याने मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर घसरत चालली असल्याचा दावा केला आहे.

         पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी राजीनामा द्यायची गरजच नाही.खरे तर महाराष्ट्रातील भाजपाच्या ज्या माजी आमदार-माजी मंत्री-पदाधिकारी यांनी लोकसभा निवडणुक प्रचार कार्यात सहभाग घेतला नाही-टाळाटाळ केली-पक्ष श्रेष्ठींना विनवण्या करायला भाग पाडले-अपेक्षित मताधिक्य दिले नाही अशांवर पक्षाने कठोर कारवाया केल्या पाहिजे.तरच मतदार व कार्यकर्त्यांत चांगला संदेश जाऊन आगामी निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळेल.जर बहुमत मिळालेच नाही तर पाच वर्षे प्रभावी विरोधक म्हणून जनतेत जाऊन काम करावे.जनता भाजपाला स्विकारल्याशिवाय राहणार नाही.
निवडणूकपूर्व युती करून जागा वाटप केले तर मित्रपक्षांच्या वाट्याला गेलेल्या जागांवरील भाजपाच्या कर्तृत्ववान-उमेदीच्या कार्यकर्ते-नेत्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का ? असा रास्त सवाल त्यांनी विचारला आहे.हाच सवाल बहुतांश भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात आहे.पक्षशिस्त म्हणून कुणीही बोलत नसल्यानेच पक्षश्रेष्ठींपर्यंत या भावना पोहोचतच नाहीत.अनैसर्गिक युत्या व आघाड्या म्हणजे एकप्रकारे अनैतिक संबंधच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.व हीच भावना सर्वदूर भाजप कार्यकर्त्यांत पसरली असल्याचा दावा केला आहे.निवडणूकपुर्व युती नकोच पण अपरिहार्यताच असेल तर निवडणुकीनंतरही काही निर्णय घेता येऊ शकतात असा दावा माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केला असून स्वतंत्र लढण्याचा सल्ला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close