निवडणूक
आम्हाला कार्यकर्त्यांची सायंकाळची सोयही करावी लागते…!
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
शहापूर गावाने ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे मार्गदर्शनाखालीअखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून तरुण पिढीला व्यसन मुक्त करण्यासाठी मोठे काम केले असून आम्हाला मात्र निवडणूक प्रचार काळात कार्यकर्त्यांची दिवसाची सोय करताना सायंकाळची सोयही करावी लागत असल्याची खंत कोपरगाव तालुक्याचे युवा आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव तालुक्यातील एका कार्यक्रमात केली आहे.
देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.या निवडणुकीच्या काळातच श्री क्षेत्र शहापूर संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा व श्री क्षेत्र ताहाराबाद पायी दिंडी सोहळा तपपुर्ती सोहळा व हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त आळंदी येथील ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे मर्गदर्शनाखाली व शहापुर ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या मदतीने अखंड हरींनाम सप्ताहाचा सांगता ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने नुकतीच झाली त्यावेळी ते बोलत होते.त्यावेळी त्यांच्या तोंडून सत्य ते बाहेर पडले असल्याने तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्याच्या निवडणुका तशा राज्याला नव्या नाहींत.आणि येथील विविध राजकीय प्रयोगही नवे नाहीत.या तालुक्यातूनच सर्व प्रथम मतदारांना सन-१९७२ साली मताचे पैसे वाटण्याचा मोठा प्रताप सुरू झाला होता नंतर तो राज्यभर पसरला होता.त्यानंतर विरोधी पक्षात राहूनही सत्ताधारी पक्षाशी अंतर्गत तडजोडी करून कार्यकर्त्यांना वेड्यात काढण्याचे कारखाने येथूनच सुरू आले होते व तह्यात सुरू आहे.शेतकऱ्यांना सहकारी साखर कारखाण्याचे मालक बनिवण्याचे स्वप्न येथूनही उगम पावले होते.त्याची माती येथूनच सुरू झाली होती.शतकापूर्वी इंग्रजांनी शेती सिंचनासाठी निर्माण केलेली धरणे आता केवळ महापालिका आणि उद्योगासाठी उरली आहे.त्यात मतदारांना विकत घेऊन त्यांना गुलाम बनविण्याचे तंत्र येथूनच उगम पावले आहे.येथील शेतकऱ्यांच्या उसातून टनामागे कपात करून शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या असल्या तरी आज येथील शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी आज येथील संस्था चालक या शेतकऱ्यांनाच डोनेशनच्या नावाखाली नागवत आहे.प्रश्न शेती सिंचन पाण्याचा असो की पिण्याचा,रस्त्याचा असो की,शेती पिकाच्या भावाचा असो की ऊस दराचा,प्रत्येक उप पदार्थ निर्मिती बरोबर तुम्हाला प्रति टन दोनशे चा भाव जास्त देणार हे सांगणारे नेते येथीलच आणि त्यांना प्रत्येक वेळी अंगठा दाखविणारे नेते येथीलच.प्रश्न निर्माण करून त्या भोवती मतदारांना अनेक दशके फिरत ठेवण्याचे कसब यांचेच.या सर्वांसाठी मतदार महत्वाचा असला तरी त्यास प्रसन्न करण्यासाठी करण्यात येणारे प्रयोग नवे नाही त्यात पैशा बरोबर मद्य हा महत्वाचा घटक आहे.आणि त्यासाठी मद्य कारखाने यांचेच.त्यामुळे मतदान तारीख जवळ येई पर्यंत तो शुद्धीवर येऊ नये व तो आपला कायम गुलाम रहावा यासाठी सर्व काही करण्याची येथील शासकांची तयारी आहे.त्यातून त्यांना सर्व काही पुरवले जाते नेमके हेच खरे वाक्य आ.आशुतोष काळे बोलून गेले आहे.त्यांचे मानावे तेवढे आभार थोडे आहे.या पूर्वी आमच्या प्रतिनिधीने अनेक वेळा या बाबत वाचा फोडली आहे.मात्र अधिकृत पातळीवर पहिल्यांदा याची कबुली दिली आहे. आणि विशेष म्हणजे ती ही धार्मिक व्यासपीठावरून हे विशेष ! त्यामुळे ती खोटी असण्याची शक्यता तशी फार कमी आहे. त्यावेळी उपस्थित आळंदीचे कीर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी तोंडात जीभ न चावली तर नवल.त्यामुळे आ.काळे यांचे सत्य बोलल्या बद्दल ग्रामस्थांसह भाविकांनी आभार न मानले तर नवल.
त्यावेळी त्यांनी त्यावेळी पुढे बोलतांना शहापूर येथील भाविकांचे आणि ग्रामस्थांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे.आ.काळे यांच्या या विधानामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.सदर प्रसंगी माजी.आ.स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थित संत सज्जन आणि उपस्थित भाविकांचे व आयोजकांचे आभार मानले आहे.