जाहिरात-9423439946
निवडणूक

खा.लोखंडे यांची…या गावातून हकालपट्टी ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात सुरु झाला असताना आज राहाता तालुक्यातील पिंप्री निर्मळ येथे आज सकाळी ०९ वाजेच्या सुमारास महायुतीचे खासदार व उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्याअसता तेथे उपस्थित मतदारांनी त्यांना निळवंडे धरणाचे पाणी अन्यत्र सोडल्या प्रकरणी व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील १८२ गावांचे पाणी आरक्षण न टाकल्या प्रकरणी त्यांना चांगलेच धारेवर धरून गावातून हुसकावून दिले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.या शिवाय कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथेही प्रश्नांची सरबत्ती करून तेथून बाहेर जाण्यास भाग पाडले असून समर्थकांची बोलती बंद केली असल्याची बातमी आहे.

राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथे मतदारांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर काढता पाय घेताना खा.सदाशीव लोखंडे दिसत आहे.

  

पिंप्री निर्मळ येथील मतदारांनी त्यांना पहिला सवाल हा निळवंडेचे पाणी लाभक्षेत्र सोडून अन्यत्र कसे वर्ग केले व परस्पर का सोडले ? असा साधा सरळ प्रश्न विचारला असून लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ असताना उजव्या व डाव्या कालव्यात दुसऱ्या आवर्तनाचे पाणी पण का सोडले नाही ? ५४ वर्षे  उलटूनही दुष्काळी १८२ गावांचे पिण्याचे पाण्याचे आरक्षण मागणी करूनही का टाकले नाही ? त्या साठी आपण दहा वर्ष काय केले ? अकोले तालुक्यातील कालव्यांच्या (०) शून्य ते २८ कि.मी.च्या अस्तरींकरणाची निविदा काढूनही त्याचे काम तातडीने का सुरु केले नाही ? अशी प्रश्नांची सरबत्ती केली आहे.त्यामळे काढता पाय घ्यावा लागला आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघ हा अ.नगर जिल्ह्यातील उत्तर भागात येत असला तरी आरक्षणात असल्याने अ.नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार येथे आरक्षणामुळे देण्यात येताना दिसून येत आहे.ठाकरे गटाने येथे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना महाआघाडीकडून उमेदवारी दिली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विद्यमान खा.सदाशिव लोखंडे यांच्यावर पुन्हा एकदा ना-ना म्हणत विश्वास दाखवला आहे.वंचित बहुजन आघाडीनेही येथून काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी दिली असून प्रहार-जनशक्ती अभिजित पोटे यांना उमेदवारी देऊन आपली शक्ती आजमावत आहे.तर सर्व मिळून वीस जण आपले नशीब आजमावत आहे.मात्र या मतदारसंघात तिरंगी की चौरंगी लढत होणार ? असा सवाल निर्माण झाला आहे.

  गेल्या दोन-तीन निवडणुकांचे चित्र पाहिले तर इच्छुक उमेदवारांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात बेडूक मारलेल्या उड्यांनी हा मतदार संघ चांगलाच लक्षात राहतो.शिर्डीतील साईबाबा देवस्थानामुळे प्रसिद्ध असलेला शिर्डी मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नेते रामदास आठवले यांच्या पराभवामुळे २००९ मुळे पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता.या मतदारसंघात कोणत्याही पक्षाचे कोणतेही उमेदवार असले तरी लढत अप्रत्यक्षपणे रंगते ती राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात या दोन पारंपरिक विरोधक असलेल्या (रेवडी ) पहिलवांनामध्येच रंगल्याची मुद्रित प्रसिद्धी माध्यमात चर्चा रंगते.(याला कारण काय आहे हे मतदारांनी ओळखलेले बरे.)त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोण कुणाला मदत करणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.हि चौथ्या टप्प्यातील निवडणूक दि.१३ मे रोजी संपन्न होत आहे.त्यामुळे मतदारांची आणि राजकीय निरीक्षकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत.

पहिल्या घटनेची पुनरावृत्ती कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी अंजनापूर येथील हनुमान मंदिरात घडली असून त्या ठिकाणी तेथील शेतकऱ्यांनी त्यांना याच प्रश्नांची सरबत्ती केली असून त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने त्यांना तब्बल वीस मिनिटे धारेवर धरले असून खा.सदाशिव लोखंडे यांना चुरमुऱ्याचे लाडू खाण्याच्या अनास्था प्रसंग गुदरला आहे.त्यास मध्येच हस्तक्षेप करणाऱ्या कुडमुड्या समितीच्या कार्यकर्त्याची बोलती बंद केली आहे.

  दरम्यान या निवडणुकीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे.यात दोन दिवसापूर्वी कोपरगाव येथील आज खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार वातानुकूलित कार्यालयाचे उदघाटन झाले त्यावेळी तेथील सत्ताधारी राष्ट्रवादी गटाचे माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी सुरुवात केली असून खासदार कोण आहे ? आम्हाला ओळख करून द्या अशी मागणी करून थेट पालकमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित नेत्यांसह सर्वांना चकित व अंतर्मुख केले होते.आज सकाळी राहाता तालुक्यातून पहिली सुरुवात पिंप्री निर्मळ येथून केली आहे.त्यात त्यांची पुन्हा एकदा साडेसाती आडवी आल्याचे दिसून आले आहे.भल्या सकाळी त्यांनी त्या गावात हजेरी लावली असता त्या ठिकाणी उपस्थित मतदारांनी त्यांना पहिला सवाल हा निळवंडेचे पाणी लाभक्षेत्र सोडून अन्यत्र कसे वर्ग केले व परस्पर का सोडले ? असा साधा सरळ प्रश्न विचारला असून लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ असताना उजव्या व डाव्या कालव्यात दुसऱ्या आवर्तनाचे पाणी पण का सोडले नाही ? ५४ वर्षे  उलटूनही दुष्काळी १८२ गावांचे पिण्याचे पाण्याचे आरक्षण मागणी करूनही का टाकले नाही ? त्या साठी आपण दहा वर्ष काय केले ? अकोले तालुक्यातील कालव्यांच्या (०) शून्य ते २८ कि.मी.च्या अस्तरींकरणाची निविदा काढूनही त्याचे काम तातडीने का सुरु केले नाही ? निळवंडे कालव्यांचा पाण्यामुळे अकोले तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक वर्ष उलटूनही त्यांना प्रांताधिकारी संगमनेर यांनी नुकसान भरपाई का दिली नाही ? त्यास कोण आडवे आले आहे ? शिवाय सन-२००८ पासून निळवंडे धरणात साठवले जात असलेले पाणी आता उच्च न्यायालयात निळवंडे कालवा कृती समितीमुळे पूर्ण झाले असताना ते पाणी आता अ.नगर जलसंपदा विभागाकडून निळवंडे विभागाकडे का वर्ग केले नाही ? अशी प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

   दरम्यान या सर्व प्रश्नाचे एकही उत्तर खा.लोखंडे यांचेकडे अर्थातच नव्हते.त्यांना पिंप्री निर्मळ येथून ग्रामस्थानीं शब्दशः हुसकावून दिले आहे.त्याचे चलचित्रण समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले आहे.

कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी अंजनापूर येथील हनुमान मंदिरात खा.लोखंडे यांचे समोर दुष्काळी जनतेच्या व्यथा मांडताना शेतकरी दिसत आहे.

 

दरम्यान आता उशिराने आलेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील वेस येथील हनुमान मंदिरातही तेथील शेतकऱ्यांनी निळवंडे धरणाचे दुसऱ्या आवर्तनाचे पाणी डाव्या व उजव्या कालव्यात न सोडल्याने खा.लोखंडे यांचा आप्पासाहेब कोल्हे यांनी समाचार घेतला असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे खा.लोखंडे यांच्या बाबत सर्वत्र नाराजी असल्याचे दिसू लागले आहे.दरम्यान जाताना सदर उमेदवाराने एका गावाने काही फरक पडत नाही”अशी माहिती विजय गोर्डे यांनी दिली आहे.त्यानंतर तेथून काढता पाय घेतला असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान याच घटनेची पुनरावृत्ती कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी अंजनापूर येथील हनुमान मंदिरात घडली असून त्या ठिकाणी तेथील शेतकऱ्यांनी त्यांना याच प्रश्नांची सरबत्ती केली असून त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने त्यांना तब्बल वीस मिनिटे धारेवर धरले असून खा.सदाशिव लोखंडे यांना चुरमुऱ्याचे लाडू खाण्याच्या अनास्था प्रसंग गुदरला आहे.त्यास मध्येच हस्तक्षेप करणाऱ्या कुडमुड्या समितीच्या कार्यकर्त्याची बोलती बंद केली आहे.अनेक ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नही त्यांना अडचणीत आणीत असल्याच्या बातम्या आहे.

कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील आठवडे बाजारात काही महायुतीच्या महिला खा.लोखंडे यांच्या प्रचार साहित्याचे वितरण करत असताना एका फुटाण्यावाल्याने,”खा.लोखंडे कोण आहेत अद्याप ते पाहिले नाही” आणि त्यांनी दुष्काळी जनतेचे कोणतेही प्रश्न सोडवले नाही” त्यामुळे त्यांना मते देणार नाही असे तोंडावर सुनावले आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   दरम्यान कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील आठवडे बाजारात काही महायुतीच्या महिला खा.लोखंडे यांच्या प्रचार साहित्याचे वितरण करत असताना एका फुटाण्यावाल्यास आपले प्रचार साहित्याचे पत्रक वितरित केले असता त्याने रोखठोक बोलताना,”आम्ही कोण खा.लोखंडे आहेत अद्याप पाहिले नाही” आणि त्यांनी दुष्काळी जनतेचे कोणतेही प्रश्न सोडवले नाही” त्यामुळे त्यांना मते देणार नाही असे तोंडावर सुनावले असल्याची बातमी तेथील साक्षीदारांनीं आमच्या प्रतिनिधीस कळवली आहे.तर सोमवारच्या कोपरगावच्या आठवडे बाजारातही तेथील बाजार करुनी खा.लोखंडे यांना ओळखलेच नाही अशी माहिती हाती आली आहे.त्यामुळे पहिल्या टप्पात खा.लोखंडे यांना मोठ्या धक्क्यांचा सामना करावा लागत असल्याच्या बातम्या असून सर्वत्र हेच चित्र कमीअधिक फरकाने असल्याच्या बातम्या हाती आल्या आहेत.महायुतीस हि निवडणूक मोठी कठीण जात असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.पंतप्रधान मोदींना पाहून जनतेने दहा वर्ष खा.लोखंडे यांना मतदान दिले पण त्यांनी मतदार संघात कोणतेही विकासकामे केली नाही शेतकऱ्यांच्या शेतीमालास व दुधास भाव दिला नाही त्यामुळे मतदारांत मोठा रोष असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात या घटनांची सर्वत्र चविष्ट पणे उलटपालट चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close