जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

शिडीत खासदार कोण ? सत्ताधारी माजी नगरसेवकांचा खा.लोखंडेना घरचा आहेर ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   शिर्डी लोकसभा मतदार संघात गेली दहा वर्ष खासदार कोण आहेत ?  (गेली दहा वर्षे आम्हाला ते पाहायला मिळाले नाही) अशी उपरोधिक मागणी कोपरगाव नगरपरिषदेतील वर्तमान अजित पवार राष्ट्रवादी गटाचे माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी भरसभेत केल्याने सत्ताधारी गटाचा हा घरचा आहेर असल्याचे मतदार संघात बोलले जात आहे.त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघात सत्ताधारी गोटात खळबळ उडाली आहे.त्या मागणीची सामाजिक संकेतस्थळावर सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघात गेली दहा वर्ष खासदार कोण आहेत ? असा घरचा आहेर केल्यावर निर्माण झालेला वाद छायाचित्रात दिसत आहे.

 

कोपरगाव येथे राज्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे व आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांच्या वातूनुकुलीत आलिशान प्रचार कार्यालयाचे उद्घाटन,’कृष्णाई बँक्वेट हॉल’ येथील कार्यालयात मोठया उत्साहात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांना शांत करताना युवा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव दिसत आहे.

  सदर प्रसंगी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे,माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप,शिर्डी लोकसभा मतदार संघाचे बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार व खा.सदाशिव लोखंडे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे,भाजपचे माजी शहर प्रमुख विनायक गायकवाड,एकनाथ सेनेचे जिल्हा प्रमुख नितीन औताडे,युवा राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख कृष्णा आढाव,माजी नगरसेवक दिनार कुदळे,तालुका प्रमुख रावसाहेब थोरात या शिवाय महायुतीचे अनेक पदाधिकारीं,कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यावेळी एकनाथ सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबतीत मेहमूद सय्यद यांच्या या मागणीस हरकत घेतली व सदर माजी नगर सेवक मेहमूद सय्यद यांना कोणी बोलवले असा सवाल करून ते विरोधी महाआघाडीचे उमेदवार व माजी खा.भाऊसाहेब वाकचोरे यांचे हस्तक असल्याचा आरोप औताडे यांनी केला व त्या संबधी भ्रमणध्वनीवर असलेला त्यांच्या समवेत असलेला पुरावा माध्यम प्रतिनिधींना दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र मेहमूद सय्यद यांनी त्यास विरोध केला असून आपण राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे यांच्या निमंत्रणावरून आलो असल्याचा जोरदार दावा केला आहे.व माजी खा.वाकचौरे आपला संबंध नाही असे सुनावले आहे.आपणाला व व्यासपीठावरून जोरदार विरोध केल्याने सभेत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.अखेर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यात हस्तक्षेप करून त्यांची ओळख करून देऊ असा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे व या वादावर पांघरून घातले असल्याचे दिसून आले आहे.

   दरम्यान या वादाचा संदर्भ देऊन आ.आशुतोष काळे यांनीही आपल्या भाषणात कोपरगाव तालुक्याने खा.लोखंडे यांना आपल्या तालुक्याने २०१४ च्या निवडणुकीत ५० हजार तर २०१९ च्या निवडणूंकीत ४० हजारांच्या असे दोनदा मोठ्या मताधिक्याने निवडून दिले असल्याचे स्मरण करून दिले आहे.मात्र आता मागील प्रमाणे (म्हणजे मतदार संघातील प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही) काम करता येणार नाही.असे म्हणून अप्रत्यक्ष मेहमूद सय्यद यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे.त्यामुळे मेहमूद सय्यद यांना विरोध करणाऱ्यांना अंतर्मुख होण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.

सदर सभा आटोपल्यावर सदर कृष्णाई मंगल कार्यालयाच्या बाहेर महसूल मंत्री हे पत्रकारांना आपली मुलाखत देत असताना माजी नगरसेवक मेहमूद सय्यद व त्यांचे मुलाचे विरुद्ध वादावादी निर्माण झाली त्यावेळी त्यांचे विरुद्ध,’जय श्रीराम’च्या घोषणा देताना जमाव दिसत आहे.

  दरम्यान सदर सभा आटोपल्यावर सदर कृष्णाई मंगल कार्यालयाच्या बाहेर माजी नगरसेवक मेहमूद सय्यद व त्यांचे मुलाचे विरुद्ध वादावादी निर्माण झाली होती.त्यावेळी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी मध्यस्थी करून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काही तरुणांनी,”जय श्रीराम” च्या घोषणा देऊन वातावरण तापवले असल्याचे प्रवेश द्वारावर दिसून आले आहे.

   दरम्यान आ.आशुतोष  काळे यांनीही खा.लोखंडे यांच्या कामाबाबद नागरिकांत नाराजी असल्याचे सूतोवाच करून पुढे म्हटले आहे की,”२०१४ ला सेनेचे खा.लोखंडे यांना उमेदवारी मिळविण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत जबाबदारी पार पाडली हे संपूर्ण मतदार संघाने पाहिले आहे.(मात्र ते त्या ऋणास किती पात्र झाले हे सांगितले असते तर बरे झाले असते) आमच्या जे पोटात असते तेच आमच्या ओठावर असते त्यामुळे आमचं ठरलं ते ठरलं त्यापासून मागे हटायचे नाही जे ठरलं ते करून दाखवायचं.त्यामुळे आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.तुम्हाला जास्तीत जास्त मतदान घडवून आणतील तुम्ही बिनधास्त रहा असा शेवटी दिलासा देण्याचा व मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला आहे.


   यावेळी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे बाबत बोलताना नाव न घेता आ.काळे यांनी म्हटले आहे की,”मात्र काहींच्या पोटात एक आणि ओठात एक असते ते लोक आजही व्यासपीठावर कुठे दिसत नाही त्यामुळे मला काळजी वाटते तुम्ही पण काळजी घ्यावी असा चिमटा काढण्यास शेवटी ते विसरले नाही.त्यामुळे निवडणूक सुरु झाल्यापासून सुरु झालेली खा.लोखंडे यांची साडेसाती थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.त्यांचे गावोगाव असेच संमिश्र स्वागत होताना दिसत असून अनेक ठिकाणी घोषणा देऊन त्यांना नागरिक व मतदार पिटाळताना दिसत आहे.त्यामुळे गेली दहा वर्ष आरामात मिळालेली खासदारकी यावेळी चांगलीच निचरताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.

  दरम्यान या सभेत माजी खा.शंकरराव काळे यांच्या विरुद्ध केलेल्या एप्रिल सन-२००० कोपरगाव सहकारी कारखाना नामांतर आंदोलनानंतर पहिल्यांदा आ.आशुतोष काळे व त्यांचे विरोधक नितीन औताडे एकाच व्यासपीठावर दिसून आले आहे.त्यांचे तीन पिढ्या विळ्याभोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे.मात्र ते किती काळ एकत्र दिसणार हे काळच ठरवणार असला तरी लोकसभा निवडणुकी नंतर हे नाते फार दिवस टिकणार नाही असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

  दरम्यान लोकसभा निवडणूक सुरु होऊन अनेक दिवस उलटूनही गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीनंतर सुरु झालेला कोल्हे विरुद्ध विखे यांचा पंगा अद्याप मिटण्याचें नाव घेताना दिसत नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डीत माजी आ.स्नेहलता कोल्हे यांची भेट घेऊनही त्यात कोल्हे-विखे यांना एकत्र आणण्यात यश आलेले नाही.लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना हा शिमगा भाजप आणि मित्र पक्षांना किती महागात पडणार ? हे आगामी १३ मे रोजी समजणार आहे.मात्र याबाबत मतदार संघातील चौकाचौकात चविष्ट चर्चा सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close